राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर उद्या नांदेड दौऱ्यावर
रासप नांदेड जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके, भगवान मुंढे यांची माहिती
नांदेड : दिनांक ५ डिसेंबर २०२४ गुरूवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांचा नांदेड दौरा असुन दुपारी १२.०० वाजता मातोश्री मंगल कार्यालयात कौठा येथे उपस्थित राहाणार आहेत . नंतर दुपारी १.०० वाजता छत्रपती चौक बंदखडके कोचींग क्लासेस बिल्डींगमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकिला उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत निवडणूक लढविलेल्या उमेदवाराचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक माजी मंत्री मा.महादेवजी जानकर साहेब यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय संघटक तेलंगणा राज्य प्रभारी मा गोविंदराम शूरनर उपस्थित राहाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक हितचिंतक व निवडणूक उमेदवार वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन उतर नांदेड जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके व दक्षिण नांदेड जिल्हाध्यक्ष भगवान मुंढे, जिल्हा महासचिव चंद्रकांत रोडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment