धर्मनिरपेक्ष काँग्रेसचा रासपच्या उर्दू प्रचार साहित्यावर आक्षेप
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रचारही विखारी होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात प्रचारांमध्ये जाती धर्माचा उघड उल्लेख होत असल्याचे दिसून येते, परंतु धर्मनिरपेक्ष असल्याचा टेंबा मिरवणाऱ्या काँग्रेसने मुस्लिम उमेदवाराच्या उर्दू भाषेतील प्रचार साहित्यावर आक्षेप घेतल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार नफिस शेख एल्गार यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामठीतील राजकीय वातावरण तापले.
राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणुकीत जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारामुळे काँग्रेस उमेदवार हादरले आहे. मी छापलेल्या उर्दू भाषेतील प्रचार साहित्यावर कामठीतील काँग्रेस नेते पदाधिकारी मुस्लिम उलेमा (धर्मगुरू) यांच्यामार्फत दबाव टाकत आहेत. मुस्लिम मतदारांना पत्रके वाटप करताना अनेक ठिकाणी वादविवाद करत आहे, असा आरोप कामठी विधानसभा मतदारसंघ रासपचे उमेदवार नफिस शेख एल्गार यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment