नागपुरात मंत्रीपदाचा शपथविधी पार पडलाय पण...
मोठी व्होट बँक असलेला धनगर, ओबीसी समाज संतापलाय
#gopichandpadalkar #Devendrafadanvis #bjp #maharashtra #minister #government #mla
मुंबई : आज नागपुरात महाराष्ट्र मंत्रीमंडळ शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. मराठा समाजानंतर मोठी व्होट बँक असणाऱ्या धनगर समाजाला भारतीय जनता पक्षाकडून संधी न मिळाल्यामुळे धनगर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण नेते असणारे गोपीचंद पडळकर यांचे नाव संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत नाव झळकत होते. जत विधानसभेतून गोपीचंद पडळकर मोठया मताधिक्याने निवडून आल्याने मंत्री पद भेटेल, असे वाटत असतानाच आज झालेल्या मंत्र्यांच्या यादीत गोपीचंद पडळकर यांचे नाव नसल्याने, भाजपच्या विरोधात धनगर समाजातून नाराजीचा सूर उमतटत आहे. अभ्यासू मंत्री व ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारा नेता असणाऱ्या छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी समाजाकडून तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. भुजबळ आणि पडळकर यांना मंत्रीमंडळात डावल्याने महायुती सरकार विरोधात समाज माध्यमातून प्रचंड रोष व्यक्त होत आहेत. गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात विस्तारात डावल्याने धनगर समाजाचे युवक भडकले आहेत,भाजपच्या विरोधात समाज माध्यमातून नाराजीचे सुर उमटत आहेत. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे ओबीसी समाज भयभीत झाला होता, त्यावेळी त्यांना धीर देण्याचे काम छगन भुजबळ, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांनी केले होते. शासकीय निधी वाटप होत असताना ओबीसी, धनगर समाजाला सापत्नुक वागणूक दिली जात आहे, अशी जनभावना सर्वसामान्य ओबीसी, धनगर समाजात आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने अजित पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले जात आहेत.
गोपीचंद पडळकर यांना डावलणे म्हणजे वाचाळ, मर्यादा सोडून बोलणाऱ्यांना स्थान मिळणार नाही, असा संदेश देण्यात आला असेही म्हणता येणार नाही, कारण तिकडे नितेश राणे, जयकुमार गोरे यांच्यासारख्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत.
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न होणे धक्कादायक मानले जात आहे. राज्यातील माळी समाज भुजबळ यांनाच आपला नेता मानतो. ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात भुजबळ यांना नेता मानतो. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्याच्या बाबतीत उघड भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने खटके उडाले आहेत.
धनगर, ओबीसी समाजाला मंत्रिमंडळात डावल्याने आगामी निवडणुकांत भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल. कोणताही राजकीय पक्ष मोठी व्होट बँक दुखावणार नाही.
खालील गोष्टींमुळे भाजपने फसवल्याची भावना धनगर समाजाच्या मनामनात रुजतेय..
1.एसटी आरक्षण अंमलबजावणी बाबतीत फसवणूक
2.योजना लागु करुन बजेट दिलं नाही तिथं फसवणूक
3.गेल्या अडीच वर्षांत मंत्री पद दिलं नाही तिथं फसवणूक
4.तिकीट वाटपात फक्त दोनच तिकीट दिले तिथं फसवणूक
5.आताच्या मंत्री मंडळात डावललं तिथं फसवणूक
6.धनगर नेत्याला भाजपच्या कोअर कमिटीत संधी नाही.
7.भाजपच्या निर्णय प्रक्रियेत धनगर नेत्यांचा सहभाग करुन घेत नाहीत.
सामाजिक कार्यकर्ते निवांत कोळेकर म्हणतात, सत्तेत आणायला बीजेपीस धनगर चालतो. सत्ता चालवायला नको. निवडणुकीत भरभरुन मते द्यायला धनगर चालतो. धनगरांच्या मतामुळे बीजेपीस खुर्च्या मिळाल्यावर त्या खुर्च्याचा भागीदार मात्र धनगर नको. राबायला आम्ही आणि मलिद्याला फक्त तुम्ही... हा जमातीवरील अन्याय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतपेटीतून व्यक्त झालेला दिसेल. येणार्या जिल्हापरिषदा आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत ती मते मागायला धनगर जमातीस या... मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचा धनगर जमातीचा रोष स्थानिक स्वराज्य संस्थांत पहा. विधानसभेत वाजवी यश मिळालेले बीजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ धनगर मतामुळे दिवसा चांदण्या बघायला लावू.
No comments:
Post a Comment