Monday, December 9, 2024

रथी महारथीना गारद करण्याची ताकद लोकांत आहे; बारामतीत संदीप चोपडे विजयी होणार : महादेव जानकर

रथी महारथीना गारद करण्याची ताकद लोकांत आहे; बारामतीत संदीप चोपडे विजयी होणार : महादेव जानकर 

बारामती | 9/11/2024 : लोकशाहीत कोणीही माणूस विजयी होऊ शकतो, रथी महारथीना गारद करण्याची ताकद जनतेत आहे, असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. कन्हेरी तालुका बारामती येथे महादेव जानकर यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिरातून बारामती विधानसभा रासपचे उमेदवार संदीप (दादा) चोपडे व  इंदापूर विधानसभा रासपचे उमेदवार तानाजीशेठ शिंगाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. जानकर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, बारामती तालुकाध्यक्ष एड. अमोल सातकर, गिरिधर ठोंबरे, इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, एड. दिलीप धायगुडे, पै.अविभाऊ मासाळ व अन्य रासप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात 288 ठिकाणी दंड थोपटले आहे. बारामतीवर माझे खास प्रेम आहे. जर लोकांच्या मनात आलं तर, रथी महारथीना गारद करण्याची ताकद लोकशाहीमध्ये आहे. पवारांचा पराभव करायला वेळ लागणार नाही, पण बारामतीतल्या जनतेनं मनावर घेतलं पाहिजे. आणि तोच आशीर्वाद मागण्यासाठी बारामतीत आलोय. या जगात कोणीही मोठं नसतं. जगात पहिले राजेशाही होती, आता राजेशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीत कोणीही निवडून येऊ शकतो, हा विश्वास आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला भविष्य नाही, वंशपरंपरेची मतांची बेगमी आहे. काँगेस, भाजप, सेना, राष्ट्रवादीची एकाधिकारशाही आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने बऱ्यापैकी मोडीत काढली आहे. घराणेशाही संपवणे हे आमचं धोरण आहे. उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणे हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.

जानकर पुढे म्हणाले, काका पुतण्या पराजित होणार, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार संदीप चोपडे निवडून येणार. महाराष्ट्रात एकेरी नाही तर दुहेरी आकड्यात रासपचे उमेदवार विजयी होतील. आजपर्यंत पवारांना कन्हेरीचा मारुती पावत होता, पण आता मी मारुतीचाच ब्रम्हचारी भक्त असल्याने मलाच पावेल असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...