Tuesday, December 31, 2024

स्व. लक्ष्मण अक्कीसागर व गंगूबाई अक्कीसागर संयुक्त पुण्यस्मरण

 कै. लक्ष्मण सिध्दप्पा अक्कीसागर (२९/६/२०१७)
कै. गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर (२५/१२/२०२२)

यांच्यामुळेच 'सिद्धप्पा अक्कीसागर' राष्ट्रीय समाजाला मिळाले. महामानव सिद्धप्पा अक्कीसागर यांच्यामुळेच आम्हाला छ. शिवाजीराजे, महात्मा फुले, छ. शाहूराजे, डॉ. बी. आर. आंबेडकर, पेरियार, उमाजी नाईक, संगोळी रायन्ना, गोखले, टिळक, रानडे, आगरकर, जिना माहीत झाले. 


डावे, उजवे, सत्य, असत्य, ढोंगी, नकली, असली, पुरोगामी, प्रतिगामी सर्व काही ओळखता आले. बलशाली भारत राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेणारे 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांच्यासारख्या खणखणीत नेतृत्व व राष्ट्रीय समाजाचे राजकारणाचा पाया रचला गेला.

*कै. लक्ष्मण अक्कीसागर व कै. गंगूबाई अक्कीसागर यांच्या सयुक्त पुण्यस्मरण दिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!* 🌷

 - यशवंत नायक परिवार 

५/१२/२०२४

ऑल इंडिया आरबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे महासचिव शैलेश मेस्त्री यांचे दुःखद निधन

ऑल इंडिया आरबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे महासचिव शैलेश मेस्त्री यांचे दुःखद निधन 



मुंबई : ऑल इंडिया आरबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य माननीय शैलेश मेस्त्री यांचे २१ जून २०२४ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. सागर सम्राट, ए विंग, ६ वा मजला, माहिम काॅजवे मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

दिवंगत शैलेश मेस्त्री ऑल इंडिया आरबीआय ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे संघटनेत संस्थापक सदस्य व अनेक वर्ष महासचिव होते. त्यांचा रिझर्व बँकेत, सामाजिक क्षेत्रात, कामगार संघटनेत बहुमूल्य योगदान होते. एस. एल. अक्कीसागर यांच्या बँकिंग सेवा, सामाजिक, राजकीय कार्यात दिवंगत शैलेश मेस्त्री यांची मोठी साथ होती. त्यांच्या सहकार्यामुळेच मी बरेच काही काम करू शकलो, अशी भावना श्री. अक्कीसागर यांनी व्यक्त केली आहे. माझे सहकारी, मित्र, भाऊ आज नाही याचे मला खूप दुःख होत आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा परिवार संघटना, सहकारी व हितचिंतक सहभागी आहेत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची हानी झाली आहे. या दुःखातून बाहेर पडण्याची परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करतो, असे श्री. अक्कीसागर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी शिवलिंगप्पा जोगीन यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी शिवलिंगप्पा जोगीन यांची नियुक्ती


मुंबई :  राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी शिवलिंगप्पा जोगीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. जोगीन बेंगलोरचे रहिवाशी आहेत, गत २५ वर्षापासून स्थानिक इलेक्ट्रोनिक कंपनीसोबत काम करतात. गदग जिल्ह्याचे ते भूमिपुत्र आहेत. श्री.जोगीन हे तरुण तडफदार युवा नेते आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे पाळेमुळे राज्यभर रुजवतील.कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. जोगीन यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे आभार व्यक्त केलेत. 'यशवंत नायक'शी बोलताना श्री. जोगीन म्हणाले, पक्षाध्यक्ष महादेव जानकर, एस. एल. अक्कीसागर यांच्या सोबत भेट व्हायची. कर्नाटकात राष्ट्रीय समाज पक्ष पक्षाला अपेक्षित यश मिळालेली नाही. माझ्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यभरात संघटन बांधणीची जबाबदारी सोपवलेली आहे. कितीही आव्हाने असली तरी राष्ट्रीय समाज पक्षाने दिलेली जबाबदारी निभवू, असा विश्वास व्यक्त केला.

आसामध्ये दीर्घ काळ प्रचारक राहिलेले “श्री सुभाष जी सरवटे”यांचे निधन

आसामध्ये दीर्घ काळ प्रचारक राहिलेले “श्री सुभाष जी सरवटे”यांचे पाच डिसेंबर ला नागपूर च्या मुख्य संघ कार्यालयात निधन झाले. त्यांच्या भाच्याने म्हणजेच श्रीराम लाखे जी यांनी लिहिलेला लेख..👇


“सुभाष सरवटे... नाही चिरा नाही पणती...”


५ डिसेंबरला सुभाष मामा गेल्याची बातमी आली. त्यानी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसं पाहिलं तर त्यानी आपला देह राष्ट्राला १९७० साली, म्हणजे जेव्हा त्यानी रिझर्व बँकेची नोकरी सोडून आसामला संघाचा प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच अर्पण केला होता आणि तेही "बुद्ध्याचि वाण धरिले...." प्रमाणे. सख्खा मामा असला तरी त्याचा आणि माझा संबंध फारसा आला नाही, कारण तो आसामला गेला तेव्हा मी तीन ते चार वर्षांचा असेल. लहानपणापासून त्याच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असायची. माझी त्याच्याशी ओळख ही अप्रत्यक्षपणे आई आणि आजी त्याच्याबद्दल जे बोलायच्या त्या माध्यमातून झाली.माझी पहाडासारखी ताठ आणि कणखर आजी त्याच्या आठवणीने मात्र कातर झालेली मी बघितली होती. त्याच्याशी गप्पा मारण्या इतपत धारिष्ट यायला मला वयाची पस्तिशी गाठावी लागली. लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्याला जेव्हाही बघितलं तो एकटा असला की वाचनात गर्क असायचा. त्याचं वाचन प्रचंड होतं आमची आई आणि मामाच्या सांगण्यानुसार त्याला वाचनाला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, अगदी आपल्या भावंडांच्या शालेय पुस्तकांपासून ते गीता उपनिषद, इतिहास, क्रीडा सर्वांगीण वाचन होतं. टेनिस, फुटबॉल, क्रिकेट कबड्डी सर्वच खेळांचा अभ्यास होता. तिथले सर्व रेकॉर्ड्स तोंडपाठ होते. ब्रिज कबड्डी कॅरम आणि क्रिकेट तर तो छानच खेळायचा. घोषामध्ये असताना तो बरीच वाद्य वाजवत असे.नागपूर घोष कार्यवाह म्हणूनही काही दिवस त्याच्याकडे जवाबदारी होती. गणित आणि ज्योतिष त्याचे आवडते विषय होते. ज्योतिषशास्त्राचा तर त्याचा फार चांगला अभ्यास होता. राज्यक्रांतीचे इतिहास पाठ आणि या सर्व वाचनाला जोड मिळाली भाषांची. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, बांगला, उडिया, भोजपुरी या सर्व भाषा त्याला लिहिता वाचता आणि बोलता यायच्या ही माझी माहिती. याव्यतिरिक्त आणखीन कुठल्या भाषा असतील तर मला कल्पना नाही. याव्यतिरिक्त त्याचं वेगळेपण अधोरेखित करणारे बरेच गुण त्याच्यात होते त्यातील एक म्हणजे तो दोन्ही हाताने लिहायचा.


त्याच्याशी बोलताना त्यानी एकदा सांगितलं की आसाम हा एकमेव प्रदेश असा आहे की जो कधीच कुणाच्या गुलामगिरीत गेला नाही. आसामवर त्याचं फार प्रेम होतं तिथलीच दिनचर्या तो शेवटपर्यंत जगत होता (म्हणजे सकाळी तीन वाजता उठणे आणि संध्याकाळी सात ते साडेसात पर्यंत झोपी जाणे.) असं श्री.अजयजी जलतारे यांनी शेवटच्या भाषणात सांगितलं. आसामवर फारशी पुस्तके नाहीत किंवा फार माहिती देखील उपलब्ध नाही. सुभाष मामाने आसामचा संपूर्ण इतिहास लिहून काढला त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्याला झालेल्या फोडांमुळे बसता सुद्धा येत नसताना देखील आठ आठ तास उभे राहून ते लिखाण त्यानं पूर्ण केलं. हे हस्तलिखित जेव्हा त्यानी बाबासाहेब पुरंदरेंना दाखवलं तेव्हा बाबासाहेब म्हणाले सुभाषराव फार सुंदर आणि मोठं काम केलत.


रोज अंघोळ झाल्यावर न चुकता गीतेचा नववा अध्याय आणि सुंदर कांड म्हणायचा. कुणाही कडे अंत्य दर्शनाला गेल्यावर एका कोपऱ्यात बसून गीतेचा पंधरावा अध्याय एकटाच म्हणायचा. रुग्ण सेवा करण्याकरता एक वेगळीच मानसिकता आणि धीर लागतो हे गुण त्याच्यामध्ये पुरेपूर होते, लोकांनी त्याचा अनुभव देखील घेतला असेल. आमच्या आजीच्या शेवटच्या आजारपणात त्यानी तिची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. तिच्या औषधांचा टाईम टेबल, तिचं दर तासाला टेंपरेचर आणि इतर सर्व माहिती इतकी सुंदर रेकॉर्ड करून ठेवली होती की ते बघून डॉक्टर सुद्धा थक्क झाले.


बिहारमध्ये प्रचारक असताना तो आजारी पडला. अगदी सुरुवातीचे दिवस होते. ओळखी फारशा नव्हत्या. फोन नव्हते आणि सुभाष मामा औषध घेणं टाळायचा. तेव्हा त्याच्या खोली जवळ आवळ्याचे झाड होते. तेव्हा जवळजवळ दोन महिने तो नुसत्या आवळ्यांवर जगला.


सुभाष मामा १९६६ ला रिझर्व बँकेत रुजू झाला आणि १९७० साली लहान मामाला नोकरी लागल्यावर त्याने रिझर्व बँकेचा राजीनामा देऊन प्रचारक जाण्याचा निर्णय घेतला.या चार वर्षाच्या कालखंडात दोन घटना त्याचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या घडल्या. त्या म्हणजे रिझर्व बँकेच्या इंटरव्यू मध्ये त्याला जे प्रश्न विचारण्यात आले त्यात आई-वडिलांची माहिती विचारली. वडील नाहीत हे सांगितल्यावर तुमचं पालनपोषण कोणी केलं? हा प्रश्न आला. त्यावर मामानी उत्तर दिलं. माझ्या आजोबांनी. आजोबा कोण ते काय करतात? तेव्हा सुभाष मामानी आजोबा *माधवराव गोळवलकर* आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक आहेत असे स्पष्ट सांगितलं. तुम्ही संघात जाता का? या प्रश्नाला देखील होय उत्तर दिल. नंतर नोकरी देखील मिळाली. पण इंटरव्यू देऊन घरी आल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी वेड्यात काढलं की तू संघाचं नाव टाळायला हवं होतं. कारण घरची परिस्थिती बेताची होती नोकरीची गरज होती आणि तो काळ संघाला अतिशय प्रतिकूल होता. नुसतं संघात जातो म्हटलं तरी लोकांच्या नजरा बदलायच्या. पण सुभाष मामानी घरच्यांना स्पष्ट सांगितलं माझ्या आजोबांनी माझं पालन पोषण केलं ते मी का लपवायचं? जे खरं आहे ते सांगितलं. हेच धोरण त्यानी आयुष्यभर राबवलं. कधी त्याचा त्याला तर कधी सोबत्यांनादेखील त्रास झाला.


दुसरा अनुभव असा की सुभाष मामा रिझर्व बँकेत ज्या विभागात काम करत होता त्या विभागाची एन्क्वायरी झाली, ज्या करता खुद्द गव्हर्नर नागपूरला आले होते. जेव्हा त्यांनी सर्व कागदपत्र फाइल्स चेक केल्या तेव्हा त्यांनी विचारलं की 'हे सगळं डॉक्युमेंटेशन कोणी केलं?'. तेव्हा सुभाष मामाने, 'ते मीच केलंय' म्हणून सांगितलं. त्यावर गव्हर्नर म्हणाले तुमचं काम अप्रतिम आहे आणि तुमची जागा इथे नाही. मी तुम्हाला मुंबईला घेऊन चालतो. त्यावर सुभाष मामाने त्यांना सांगितलं की काही दिवसातच मी ही नोकरी सोडून संघाचा प्रचारक म्हणून जाणार आहे. *त्यावेळी संघाबद्दल फारशी माहिती नसलेले ते गव्हर्नर सुभाष मामाला एवढेच म्हणाले की मला संघाबद्दल माहिती नाही पण मला एवढंच जाणवतं की तुम्ही जिथे जात आहात ती निश्चितच रिझर्व बँकेपेक्षा चांगली ‌जागा असावी.*


खऱ्या अर्थाने प्रसिद्धी परांगमुख असं हे व्यक्तिमत्व होतं पैसा आणि प्रसिद्धी यापासून नेहमीच दूर राहिलेलं. कधीही फोटो काढून घेतला नाही आश्चर्य वाटेल पण त्याच्या निधनाची वार्ता पेपर मध्ये देताना त्याचा फोटो शोधावा लागला. घरच्या समारंभात देखील तो फोटो काढू द्यायचा नाही. वयाच्या आठव्या वर्षी त्याची मुंज झाली त्यानंतर त्याच्याकरता असा कुठलाही समारंभ झाला नाही. आजच्या जगात त्याचं वागणं किंवा असं असणं हे कल्पने बाहेरचं वाटतं. शेवटच्या दिवसात तो अतिशय अशक्त झाला होता आवाज पण क्षीण झाला होता पण कधीही आपल्या तब्येतीबद्दल किंवा वैयक्तिक त्रासाबद्दल तक्रार त्यानं केलेली आम्ही ऐकली नाही. शेवटचे दोन दिवस त्यानी अन्न त्याग केला होता. जाण्याच्या एक दिवस आधी परमपूजनीय सरसंघचालक त्याला भेटायला गेले. त्यांच्या हातून वरणाचं पाणी प्यायला आणि दुसऱ्या दिवशी मोहनजी प्रवासाला निघण्यापूर्वी त्याने प्राण सोडले. मला वाटतं एका निष्ठावान स्वयंसेवकाच्या आयुष्याचा शेवट यापेक्षा चांगला काय असू शकतो? ज्या कार्याकरता आयुष्य समर्पित केलं, जे कार्यालय त्याचं श्रद्धास्थान होतं तिथे परमपूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघून गेला. एक वारकरी संघाच्या पंढरीत वैकुंठवासी झाला.🙏🏽

-श्रीराम लाखे.

*हा आहे संघ! निष्काम व प्रसिद्धीची हॊस नसलेल्या लोकांच्या त्यागामुळे आज आपल्या देशाची स्थिती भक्कम होत आहे. आम्ही सदैव ॠणी व नतमस्तक आहोत आणि कायम राहणार.🙏🏻🙏🏻

Sunday, December 29, 2024

धनगर समाजाचे आमदार नाहीत म्हणून तक्रार करणारे आज एक आमदाराला मंत्रीपद मीळालं नाही म्हणून तक्रार करतांय.

 “धनगर समाजाचे आमदार नाहीत म्हणून तक्रार करणारे आज एक आमदाराला मंत्रीपद मीळालं नाही म्हणून तक्रार करतांय.छगन भुजबळ साहेबांसारख्या ७ वेळा आमदार दोन वेळा विधानपरीषद महापौर मुंबई,नगरसेवक कायम सत्तेत असलेल्या जेष्ठ अनुभवी ओबीसी नेत्याला मंत्रीमंडळात डावलंल गेलं म्हणून आज ओबीसी समाज आक्रमक होतोय. 

आज त्या त्यागी नेतृत्वाच्या वाक्यांची आठवण होतेय. *”माझा पक्ष छोटा असेल पण मी त्याचा मालक आहे.”माझी झोपडी आहे ईतरांचे महाल आहेत पण मी माझा झोपडीचा मालक आहे.*

ना तीकाटासाठी भीक,आलो निवडून तर ना मंत्रीपदासाठी भीक,ना कुणाच्या सतरंज्या उचलायच्या ना पदाचा मोह.

*होय पदाचा मोह या त्यागी माणसाला असता तर २०१४ ला बारामतीत आणी दुसर्यांदा २०२४ ला परभणीतच हा माणूस भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढला असता. पण”लढेल तर माझाच पक्षाच्या चिन्हावर पडलो तरी चालेल,असे ठणकावून सांगायला स्वभीमानासाठी पद ओवाळून टाकावे लागते.*

हा स्वाभीमान फक्त एकट्या महादेव जानकरांचा नाही हा स्वभीमान त्यांच्या मागे असणार्या लाखों विस्थापीत,वंचीत,उपेक्षीत घटकांचा आहे त्यांच प्रतीनिधीत्व करत असतांना कधीच आपल्या तत्वांशी तडजोड या माणसाने केली नाही.

स्वर्गीय गोपीनाथ राव गेल्यानंतर त्यांच्या लेकीच्या वाट्याला आलेला संघर्ष आणी आता पराभव समोर दिसू लागताच ओबीसी कार्ड खेळून विजयी 

झाल्यावर त्याच गोपीनाथरावांच्या घरात सरळ थेट २ मंत्रीपद यावरून गरज असेल तेव्हा वापरा ही भाजपची निती भाजपमधील धनगर नेत्यांनी  देखील ओळखायला हवी होती. खरच फडणविसांचे तुमच्यावर प्रेम होते की फक्त आगोदरच्या धनगर नेत्यांचे बळ कमी व्हावे कींवा पंख छाटावे. धनगर मतांच विभाजन व्हावं म्हणून तुमचा वापर सुरू होता हे तुम्ही ओळखायला हवं होतं.

भुजबळ साहेबांना तर आयुष्यभर संघर्ष पुरला मात्र त्यांनी देखील पुन्हा प्रस्थापीतांच्याच गोटात राहून ओबीसी ना न्याय देण्याची भुमीका नेहमी स्वीकारली पण तिथेही डोईजड झाले की छाटले पंख हे त्यांच्यासाठी आता नविन नाही कॅांग्रेस असो वा भाजपा ओबीसी व ईतर उपेक्षीत वंचीतांच्या वाट्याला कायम हाच न्याय आला आहे.

*महादेव जानकर एकदा बोलले होते स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडेंनी व भुजबळ साहेबांनी पक्ष काढला असता स्वतः चा तर मी ही नसती उठाठेव करत बसलो नसतो त्यांच्याबरोबर काम केलं असतं.*

आज हे वाक्य भुजबळ साहेबांनाही आठवत असेल आणी त्यांच्या मागे असणर्या त्यांच्या समर्थकांना देखील.

मात्र आज खर्या अर्थाने महादेवराव जानकरांचा विचार कीती व्यापक कीती दुरदृष्टीचा आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.तिकीटासाठी रडणार्यांच्या नंतर मंत्रीपदासाठी रडणारे देखील बघायला मीळाले पण आमचा नेता आज ही स्वाभीमानाने म्हणतो *” वि आर नॅाट डीमांडर वि आर कमांडर.,”आम्ही भीक मागणारे नाहीत,लढवून मीळवनारे आहोत.*

आज या झोपडीच महत्व महालात राहणार्यांना आणी महालात राहण्याच स्वप्न पाहणार्यांना देखील समजल असेलच.

वंचित,उपेक्षीत,विस्थापितांच्या न्याय हक्कांसाठी त्यांना राजपाट मीळवून देण्यासाठी निर्माण झालेला हा पक्ष फक्त या घटकांपुरता आता मर्यादीत राहीलेला नही प्रस्थापीत घटकांतले देखील वंचीत,अन्यायग्रस्त,उपेक्षीत घटक आज महादेवराव जानकर साहेबांच्या  मागे ठाम पणे उभे आहेत.

मीर्झापूर (उत्तर प्रदेश) मध्ये लोकसभा लढवली तरी निवडून येऊ शकतो, असे म्हणनार्या महादेव जानकरांनी २८ नगरसेवक बडोदा गुजरात येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून आणले आहेत.तेलंगणा,बिहार,झारखंड,राजस्थान म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशव्यापी सुरू असलेली ही चळवळ एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाला ३ रा राष्ट्रीय सर्वात मोठा पक्षा बनवल्या शिवाय राहणार नाही.

धिरज पाटील 

नाशीक

महादेव जानकर यांची अतुल भुसारी पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट

महादेव जानकर यांची अतुल भुसारी पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट 


बारलिगा (१७/१२/२४) : येथील रहिवासी बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख अतुलभाऊ भुसारी पाटील यांचे वडील कै. दिनकर नामदेव भुसारी पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. भुसारी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.





      यावेळी माजी विदर्भ अध्यक्ष डॉ. तौफिक शेख, रामदास गुरव, सुभाष दराडे, विठ्ठल गिलवकर, कारभारी गायकवाड, संतोषभाऊ वनवे, सुनिल गोरे, माजी सरपंच, गावचे नागरिक आदी उपस्थित होते.

महादेव जानकर यांची रासपचे माजी युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट

महादेव जानकर यांची रासपचे माजी युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट



अकोला (१७/१२/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेटमंत्री महादेव जानकर अकोला दौऱ्यावर आले होते. रा.स.प. चे माजी युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांचे वडील श्रीकृष्ण मुळे यांना दिनांक 10 नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली, त्यांच्या दुःखात सहभागी होऊन जानकर यांनी कार्यकर्त्यासह केशव मुळे यांच्या मोठी उमरी, विठ्ठल नगर अकोला या निवास्थानी स्व. श्रीकृष्ण मुळे यांच्या प्रतिमेचे भावुक होऊन पूजन केले व त्याना श्रद्धांजली अर्पण केली. माजी विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसिफ शेख व सर्वांनी सामूहिक श्रद्धांजली देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. सुख दुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे महादेव जानकर यांनी सांगितले.  यावेळी सज्जाद भाई, गणेश मानकर, दादाराव ढगे,  प्रदीप गावंडे, सुनील वानखडे, अंकित ढोरे, राजू डोंजेकर, अंकुश बाळापुरे, विजय शाहाकार, उमेश मोहरकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

महादेव जानकर यांच्या निधीतून माण खटाव तालुक्यात डिजिटल शाळासाठी १२ शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

महादेव जानकर यांच्या निधीतून माण खटाव तालुक्यात डिजिटल शाळासाठी १२ शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

 रासप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कोकरेवाडी (वडगांव), मोगराळे शाळेत 'ई. डी बोर्ड'चे उद्घाटन


दहिवडी : २८/१२/२०२४

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विधान परिषद निधीतून माण-खटाव मधील १२ शाळांना डिजीटल क्लासरुम करण्यासाठी ई.डी बोर्ड सह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. काल कोकरेवाडी (वडगांव) व मोगराळे ता-माण या दोन जि. प शाळामध्ये याचे उद्घाटन झाले. महादेवजी जानकर साहेब यांच्या निधीतून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थांना आजच्या इंटरनेटच्या व डिजीटल युगामध्ये प्रचंड फायदा होणार असल्याचे, रासप विद्यार्थी आघाडी माजी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी सांगितले. 

      यावेळी कोकरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर व मोगराळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी महादेवजी जानकर यांचे अभिनंदन केले व विशेष आभार मानले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस, रासप नेते महादेव राऊत, अशोक कोकरे तसेच वडगांवचे माजी सरपंच नानासो कोकरे, ग्रा पं सदस्य विष्णू कोकरे, शाळा व्यवस्थापक कमिटी अध्यक्षा करिष्मा कोकरे, मोहन कोकरे, महेश कोकरे, बाजीराव कोकरे, दादा कोकरे कोकरेवाडी जि. प. शिक्षक पवार सर तसेच मोगराळे गावचे उपसरपंच अमोल भोसले, विकास सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, योगेश जठार, गुलाब शिंगाडे, काका राऊत, जालिंदर जगदाळे, हणमंत राऊत आदी उपस्थित होते.

अहिल्याबाई होळकर यांनी देशभर उभारलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून विकास करा : महादेव जानकर

अहिल्याबाई होळकर यांनी देशभर उभारलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून विकास करा : महादेव जानकर 

आंबेगाव (२४/१२/२०२४) : भारताच्या पहिल्या महिला आदर्श राज्यकर्त्या महाराणी अहिल्यामाई होळकर यांची यांच्या जयंतीचे येणारे वर्ष ३०० वी शताब्दी असून, त्यांनी देशभरातील उभारलेल्या ऐतिहासिक वास्तुचे जतन करून त्याचा विकास करावा, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मांडली. महादेव जानकर पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुका दौऱ्यावर आले होते. त्यांनी होळकर यांनी बांधलेल्या वास्तूंना भेट देऊन पाहणी केली.

खडकी, ता-आंबेगाव येथे होळकरवाडा राजे मल्हारराव होळकर यांनी आपल्या काळात बांधला होता. खडकी गाव उदाबाई यांना चोळी बांगडी म्हणून होळकर कुटुंबाने बक्षीस स्वरूपात दिले होते. या ठिकाणी असलेल्या पुरातन घोड नदी घाट व बिरोबा मंदिर, काळभैरवनाथ मंदिराची राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्ते समवेत पाहणी करून दर्शन घेतले. 

वर्सोवा येथे मुंबई रासप महिला आघाडीची संविधान यात्रा

वर्सोवा येथे मुंबई रासप महिला आघाडीची संविधान यात्रा 


अमित शाह माफी मागा : मुंबई महिला आघाडी रासप 

मुंबई (२३/१२/२४) : वर्सोवा, मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माजी मुंबई महिला आघाडी अध्यक्षा अभिनेत्री महक चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संविधान यात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष महिला आघाडीने काढलेल्या संविधान यात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महादेव जानकर यांचे फोटो असलेले फलक, भारताचा तिरंगा ध्वज, 'आमचा अभिमान - भारतीय संविधान' असा मजकूर लिहिला फलक महक चौधरी यांच्या हातात होतात. यात्रेत कार्यकर्त्याकडून 'जय भीम' अशा घोषणा देण्यात आल्या. राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या सभागृहात देव स्वर्गाची गोष्ट करून एकेरी नाव घेत अपमान केलेला आहे, त्यांनी माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका रासप मुंबई महिला आघाडी माजी अध्यक्षा महक चौधरी यांनी व्यक्त केली.

मातृतिर्थाचा विकास शक्य नाही का ? : महादेव जानकर

मातृतिर्थाचा विकास शक्य नाही का ? : महादेव जानकर 

सिंदखेडराजा (१७/१२/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी आई जिजाऊंच्या जन्मस्थान असणाऱ्या शहराच्या विकासावरून नाराजी व्यक्त केली. महादेव जानकर म्हणाले, सत्व आणि स्वाभिमानाचे बाळकडू पाजून छत्रपती शिवरायांद्वारे रयतेचे समतामुलक स्वराज्य निर्माण करणाऱ्या आई जिजाऊंचे जन्मगाव विकासापासून वंचीत राहता कामा नये. मातृतीर्थ म्हटल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या गावाची दुरावस्था पाहून कायमच दुःख होते. येथे अनेक वेळा येणे झाले. जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेऊन या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. शहराचा सर्वांगीण विकास शक्य नाही का, असा सवाल ही त्यांनी केला.

राजकारणात पैशाचा बोलबाला झाला आहे. मतांची खरेदी हा सार्वत्रिक चिंतनाचा विषय आहे. हे जर असेच होत राहिले तर लोकशाही धोक्यात येईल, असे सांगून त्यांनी या विषयावर सर्वसमावेशक चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली. लाडकी बहीण मदतिला आली हे खरे असले, तरीही मतदानयंत्रात दोष नव्हता, असे तितके स्पष्टपणे म्हणता येणार नाही.

धनशक्तीच्या जोरावर लोकशाहीची हत्या होत आहे : महादेव जानकर

धनशक्तीच्या जोरावर लोकशाहीची हत्या होत आहे : महादेव जानकर 


रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचा पूर्वांचल उत्तर प्रदेश दौरा


मिर्झापूर (२८/११/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पूर्वांचल उत्तर प्रदेश चा दौरा केला. 2024 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांची बैठक जिल्हाध्यक्ष अनिल कुमार पाल यांच्या घरी बरकछ कला या गावी आयोजित केली होती. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले, आज चारही बाजूने धनशक्तीच्या जोरावर लोकशाहीची हत्या चालू आहे. गरीब क्षत्रिय, दलित, मागास समाज विचारांची व तत्वांची लढाई लढत आहे, परंतु अर्थहीन असलेला समाज खडतर जीवन जगत आहे. पैशाच्या जोरावर धनदांडगे लोक तिकीट मिळवत आहेत तसेच मागास समजाला पाठीमागे ढकलत आहे. सर्वसामान्य लोकांचे खासदार, मंत्री बनून शोषण करत आहेत.

मोठमोठे राजकीय पक्ष सर्वसामान्य आपल्याच कार्यकर्त्यांना तिकीट देत नाहीत, पैशावर तिकीट वाटत आहेत. काँग्रेस भाजप आयात निर्यातीत व्यस्त आहे तर सपा बसपा परिवारदात मस्त आहे. बहुसंख्य समाजाची दिशाभूल करून दलित मागासांच्या नेत्यांना फसवून आपला स्वार्थ साधत आहे. सत्तेत येण्यासाठी मागासांची मते घेतात, मात्र भागीदारी देताना दुट्टपी भूमिका घेतात. प्रस्थापित पक्षांची मस्ती राष्ट्रीय समाज पक्ष उतरवेल, असा इशारा महादेव जानकर यांनी यावेळी दिला. गावामध्ये बँक, पाणी, विजेची सोय नाही. शेतकरी आपला अंधारात जीवन जगत आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांनी छोटे-मोठे आश्वासन देऊन शेतकरी, बेरोजगार, मजूर, युवकांना फसवले आहे, परंतु गावागावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जनजागृती करून यांना उघडे पडणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची १ हजार कोटींची संपत्ती मोकळी

उपमुख्यमंत्री अजित पवारांची १ हजार कोटींची संपत्ती मोकळी

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीला लवादाने मोठा दिलासा दिला आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता दिल्लीतील लावादाने हे मालमत्ता परत केली आहे. आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयाशी संबंधित असलेले सुमारे 1 हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्या मालमत्तासह नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉईंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त केल्या होत्या. शपथ विधीपूर्वी एक दिवस आधी अजित पवार दिल्लीला गेले होते, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेल्याचे वृत्त पसरले होते. परंतु आपण खाजगी कामासाठी गेल्याचा खुलासा अजित पवारांनी शपथविधीनंतर केला होता.

यावरून आता सामान्य माणसांमध्ये 'भाजपचा पहिल्याच दिवशी एक चांगला पारदर्शक निर्णय', एका गरीब निर्दोष मराठी माणसाला न्याय मिळाला, काबाडकष्ट करून कमावलेली, जप्त केलेली मिळकत पुन्हा परत त्यांच्या स्वाधीन केल्याने आता महाराष्ट्र थांबणार नाही, अशा प्रकारची चर्चा सुरू आहेत.

जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष जिंकत नाही, तोपर्यंत संघर्ष संपणार नाही : ज्ञानेश्वर सलगर

जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष जिंकत नाही, तोपर्यंत संघर्ष संपणार नाही : ज्ञानेश्वर सलगर 


मुंबई (१०/१२/२४): महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत आणि पुरस्कृत असे 117 उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले. त्यांच्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जीवाचे रान करून प्रचार केला. परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीने अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवले, मग ते धनशक्तीचा वापर करून असेल, ईव्हीएमचा वापर करून असेल, सत्तेचा वापर करून असेल. शेवटी यश हे यश असतं. परंतु हे सरकार केवळ निव्वळ जनमताच्या आधारावर आलेलं सरकार नाही, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते जरी कमी दिसत असली, तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ केलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराची 90% मतं ही महायुतीच्या उमेदवाराला ट्रान्सफर मारलेली आहेत आणि दहाच टक्के मतं आपल्या उमेदवाराच्या रेकॉर्डला लागलेली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा लवकरच होणाऱ्या  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या लढ्यासाठी मैदानात उतरून संघर्षासाठी तयार राहायचे आहे. कारण आपण जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही.तरी तात्काळ आपल्या विभागातील बैठकीचे आयोजन करावे आम्ही लवकरच आपल्या भेटीस येत आहोत असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी रासप पदाधिकारी/कार्यकर्ते यांना समाज माध्यमातून केले आहे.

चिंतन बैठकीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे विधानसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा जाहीर सत्कार

चिंतन बैठकीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे विधानसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा जाहीर सत्कार 

पुणे (२/१२/२४) : आज मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक सभागृह पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ लढवलेल्या सर्व उमेदवार यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. तसेच राष्ट्रीय समाज पदाधिकारी यांची सार्वत्रिक विधानसभा निवडणुक -२०२४ चिंतन बैठक रासपचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडली. या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य कार्यकारणी तर्फे केले होते. विधानसभा निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार मैदानात असतानाही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात यावे, पक्षाचा आदेश डावलनाऱ्या पदाधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करावी. अशा प्रकारची चर्चा पार पडली. विधानसभा निवडणूक आलेले अनुभव, निकाल व परिणाम यावर विचार मंथन व चिंतन करण्यात आले.  निवडणुक लढवलेल्या उमेदवारांनी मनोगते व्यक्त केली. पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी काळातील पक्षाची रणनीती यावरही भाष्य करण्यात आले.








परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाला फायदा

परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाला फायदा

विधानसभा निवडणुकीच्या मतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष दुसऱ्या स्थानी

परभणी : विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात चारही मतदारसंघात उमेदवार देऊन दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रीय समाज पक्षाने मिळवल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. उद्धव सेना यांच्या पक्षाला अव्वल स्थान मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व काँग्रेसची कामगिरी निराशजनक राहिली. तिसऱ्या क्रमांकावर भाजप, चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, पाचव्या क्रमांकावर वंचित, सहाव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे शिवसेना, सातव्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार गट, आठव्या क्रमांकावर काँग्रेस तर नव्या क्रमांकावर मनसे ने मते मिळवली आहेत. रासपने गंगाखेड मधून रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला तर पात्रे तर अशोकच्या सहीतकान्याने चांगले लढत दिली व तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळवली. सईद खान यांचा विजय होईल, असे सर्वत्र बोलले जात होते. पण त्यांना देखील परभवाला सामोरे जावे लागले.

संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी : शिवलिंगप्पा किन्नूर

संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी : शिवलिंगप्पा किन्नूर

जिल्हा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शिवलिंगप्पा किन्नुर, बसवराज दोडमनी, देवेंद्र चिगरळली, महांतेश व अन्य.

कलबुर्गी (६/१२/२४) : देशाचे संविधान बदलण्याबाबत उघड वक्तव्य करणाऱ्या पासून सावध राहून, संविधानाचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांनी केले.

कलबुर्गी शहरातील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात संविधानाचे शिल्पकार डॉ बी. आर. आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिन निमीत्त अभिवादन करण्यात आले. श्री. शिवलिंगप्पा यांनी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी केंद्रात सत्तेवर असलेले सरकार जनताविरोधी, गरीबविरोधी असून भांडवलदारांचे सरकार सुरू असल्याचा टोला लगावला.

आपण डोळे झाकून संविधान नष्ट करणाऱ्यांना साथ द्यायची का? की संविधानाच्या रक्षणासाठी झटणाऱ्यांना साथ द्यायची? ते आपण समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. येत्या काळात प्रत्येक गावागावात संविधानाबाबत जनजागृती करण्यात येणार असून या देशाचे संविधान धोक्यात असून त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य प्रदेश सरचिटणीस शरणबसप्पा दोडमणी, जिल्हा अध्यक्ष देविंद्र चिगरअल्ली, जेवरगी तालुकाध्यक्ष महांतेश आवारदी, बसवराज राव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक सह इतर राज्य कार्यकारणी बरखास्त

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक सह इतर राज्य कार्यकारणी बरखास्त 

मुंबई (९/१२/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली रासप केंद्रीय कार्यालयात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी अथक परिश्रम घेतल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच पक्षाच्या संघटनात्मक धोरणाबाबत विशेष विचार मतदान केल्यानंतर संघटनात्मक पुनर्रचनेसाठी महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक बिहार मध्य प्रदेश तेलंगाना तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ गोवा राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब राज्यातील सर्व राज्य विभाग जिल्हा तालुका लोकसभा विधानसभा कार्य करणे त्वरित बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकरयांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारणी सह महाराष्ट्र राज्यातील सर्व आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे, असे पत्रक यशवंत नायकला प्रसिद्धीस दिले आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष आगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष आगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार : महादेव जानकर


नांदेड (५/१२/२४) : येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. नांदेड दौऱ्यात मातोश्री मंगल कार्यालयात कौठा येथे हरिभाऊ शेळके व लक्ष्मी मंगल कार्यालय तरोडा बु. येथे मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानोबा ताटे यांच्या येथील लग्नं समारंभात उपस्थित होते. यानंतर दुपारी २.०० वाजता छत्रपती चौक बंदखडके कोचींग क्लासेस बिल्डींगमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकिला उपस्थित राहुन जानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. श्री. जानकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर काम वाढवावे, यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासुनच कामाला लागावे, असे आवाहन केले. बैठकीत निवडणूक लढविलेल्या उमेदवाराचा सत्कार महादेव जानकर यांच्याहस्ते करण्यात  आला. कार्यक्रम राष्ट्रीय संघटक तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 

बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बापुरावजी वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच महिला जिल्हाध्यक्षा म्हणून सौ. स्वराज्यताई मराठे यांची तर नायगाव, देगलुर, मुखेड मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आनंदराव राजूरे, हदगाव तालुकाध्यक्ष तुळशीराम चोंडे यांची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला उतर नांदेडचे जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके, देगलर तालुकाध्यक्ष आनंद राजुरे, भोकर तालुकाध्यक्ष मारोती वरणे, सौ. स्वराज मराठे, बापुराव वाकोडे, साहेबराव गोरठकर, संजय आलेवाड, राजेद्रं बंदखडके, डॉ  श्रीराम राठोड, प्रा. तुकाराम साठे, तुळशीराम चोंडे, बालाजी नारे, अशोक दालपे, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक राजकीय हितचिंतक  उपस्थित होते. बैठकीचे नियोजन व सुत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रकांत रोडे यांनी केले.

Wednesday, December 25, 2024

ख्रिसमस दिवशीच वासुदेव यांची आठवण काढून धर्म संस्कृती संकटात सांगणाऱ्यावर सुदर्शन अक्कीसागर संतापले

ख्रिसमस दिवशीच वासुदेव यांची आठवण काढून धर्म संस्कृती संकटात सांगणाऱ्यावर सुदर्शन अक्कीसागर संतापले 

श्री. सुदर्शन अक्कीसागर यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,

'वासुदेव, पिंगळा, पोतराज आदि. भटके समाजाचे सामाजिक प्रश्न आणि तसे समस्या/हाल वर्षभर कुणास आठवत नाही व तसे प्रयत्न ज्यांच्याकडून होताना दिसत नाही अशां काहींना मात्र ख्रिसमस दिवशी आपली धर्म-संस्कृती नेमकी आठवून धर्म संस्कृती खतरे में है, असे सांगताना ते दिसत आहेत. खरेच कमाल आहे अशांची.....

आपले गड-किल्ले, महादेवाची जुनी प्राचीन मंदिरे, आणि महापुरुषांचे आठवणी असलेले स्मृतीस्थळ दुर्लक्षित आणि भग्न अवस्थेत असताना उदा. पुणे येथील होळकर राजघराणेतील समाधीस्थळ आदि. असे सर्व काही असताना येथे नवीन मंदिरे व तसे स्मारक कशासाठी हवे आहे? 

हिंदु समाजाचा खरा उद्धार होणे असेल तर धर्माच्या नावाने चालेला बाजार व भंपकपणाहि बाजूस केला पाहिजे. आणि हे केवळ आपल्या हिंदु समाजातच नव्हे तर सर्वच धर्माच्या बाबतीत सुद्धा त्यांना त्यांना सांगावेसे वाटते.

आणि होय मी सुद्धा हिंदूच. पण कुणाचे तरी राजकीय अजेंडाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेवून जाणारा आणि आपली बुद्धी सोडून कसा हि नाचणारा मी अंधभक्त नाहीच, अशा शब्दांत त्यांनी ढोंगी लोकांवर हल्लाबोल केला आहे.

जय हिंद ~ जय भारत !

हर_हर_महादेव...

25 डिसेंबर : The Good Shepherd

25 डिसेंबर : The Good Shepherd

म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Jesus / येशू यांचा जन्मोत्सव म्हणून नाताळ / Christmas या सणाकडे पाहिले जाते.

जगभरात ख्रिस्ती बांधव हा सण आनंदाने साजरा करतात. Shepherds या शब्दाचा अर्थ मार्गदर्शक, आपल्या कळपाचा रक्षण असा हि होतो. आणि म्हणूनच समतावादी विचारधारेचे असलेले येशूस The Good Shepherd असे म्हणतात.

Shepherd अर्थात धनगर...भारतात हा समाज विविध नावाने ओळखला जातो. तो विविध धर्म, पंथ, भाषिक सुद्धा आहे. आपल्या भारतात Shepherds/धनगर समाज हा आदिवासी, हिंदु, शीख, मुस्लिम (बकरवाल), चांगपा (बौद्ध) आणि काही ठिकाणी तो ख्रिश्चन सुद्धा आहे. तसेच प. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या कर्नाटक राज्यास लागून असल्यास काही सीमा जवळील भागात हालमत (हाल म्हणजे दूध आणि मत म्हणजे त्या विचाराचे ) सारखे स्वतंत्र पंथ सुद्धा आहे.

आहे ना विशेष बात.

असो, जगभरातील ख्रिस्त बांधवांना विशेषत: ख्रिस्ती Shepherds बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

 सनी. ए 

प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन म्हणजे एक संघर्षयात्रा होती. दीन-दुबळे, अनाथ, अपंग, कुष्ठरोगी, समाजातील या दुर्बल घटकांवर प्रभूने मातेसारखी माया केली; परंतु जे प्रस्थापित होते, धर्माचे ठेकेदार बनले होते त्यांच्या माथा प्रभू येशूने काठी हाणली. त्यांच्या विरोधाची त्याने पर्वा केली नाही. डिवचलेल्या नागासारखे ते फुत्कार टाकू लागले. हा संघर्ष अखंड चालू होता. समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभूने स्वतःला झोकून दिले. सेवा आणि संघर्ष हा येशूच्या जीवनाचा कार्यक्रम होता.

- फादर फ्रान्सिस दिब्रिटो (ज्येष्ठ मराठी साहित्यिक)

Sunday, December 22, 2024

यशवंत नायक : नोव्हेंबर 2024

 





महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ 2024

 कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक - वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10.धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 


राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम - गृहराज्य शहर

39. पंकज भोयर - गृहनिर्माण,

उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न...

 उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न...


शहरात रहाणार्‍या एका टिपिकल, मध्यम वर्गीय,कुटुंबांत जन्मलेली  चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार.घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ.भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला.

*चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा जॉब सुरु झाला तिचे आई वडील व भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच अरमान सातवे आसमान तक पहुंच गये थे. आता तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले.*

मुलगा न्यूक्लियर फॅमिलीतला, वेल सेटल्डच हवा,इंजिनीयरच हवा,आय.टी.किंवा सॉफ्टवेअर मधलाच हवा याच अटींवर ( व मुलाचे आईवडील सोबत नको ही सुप्त अट ) मुले बघायला सुरवात झाली.

सुरूवातीलाच एक स्थळ आले ते त्यांच्या 'च’ च्या अटींमधे फिट्ट बसणारे होते. मुलगा एकुलता एक,आयटी इंजिनीयर,१० लाखांचे पॅकेज, देखणा,रुबाबदार व वेलसेटल्ड होता.आई वडील गावी रहाणारे भरपूर शेतीवाडी म्हणजे त्याची पण अडचण नव्हती. 

पण.....

*मुलाचे वय होते २८ तर मुलीचे वय २३.वयामधे ५ वर्षांचे अंतर.चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटले.तिच्या मते मुलाच्या व मुलीच्या वयामधे " २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त अंतर नको" तसेच आत्ता तर सुरूवात केली आहे मिळतील याहून चांगले असा विचार करून ‘क्षमस्व’ म्हणुन मुलाला नकार कळवण्यात आला.*

सुरुवातीलाच एवढे चांगले स्थळ चालून आल्याने व भरपूर चॉइस समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा आणखीन वाढल्या. मुलगी बी.ई. आहे एवढा पगार आहे तर मुलगा वेल एस्टॅब्लिश व तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा.नवऱ्याचे शिक्षण व पगार हे बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे असे चिमणीच्या आईला वाटू लागले त्यामुळे मुलगा एम.ई.,एम.टेक. एम.एस. किंवा पी. एचडी. झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली.आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुले वयाने जास्त,चष्मा लावणारी,टक्कल पडु लागलेली अशी होती.जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या व त्यांना याहून उत्तम स्थळे चालून येत असल्यामुळे ते चिमणीला नापसंत करत. *त्यामुळे जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे,आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला.*

बघता बघता या खेळात चार पाच वर्षे गेली चिमणीचे वय वाढत चालले.त्यामुळे थोडे कॉंप्रोमाईज करुन ‘ बी. ई. ला बी. ई. चालेल’ अशी अट शिथील करण्यात आली. पण पाच सहा वर्षांच्या जॉबमधे चिमणीचे पॅकेज चांगलेच वाढले होते.सांगुन येणार्‍या मुलांचे पॅकेज त्यापेक्षा कमी होते.चिमणीच्या आईच्या हो हो आईच्याच अटीत ती मुले बसत नव्हती.

*बिझनेस करणारी व चिमणीपेक्षा जास्त कमावणारी मुले सांगुन आली. पण बिझनेस करत असल्याने जॉइन्ट फॅमिली होती.मुलीच्या संसारात आईवडिलांची व बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू मनात असल्याने नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला.*

चिमणीचे वय २९ झाले आणि एक मोठ्ठा टर्निंग पॉइंट आला. चिमणीच्या भावाचे लग्न झाले. चिमणीलाही कंपनीने सहा महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवले.परत आल्यावर नाही म्हटल तरी मिळत असलेला पगार,परदेशवारी मुळे आलेला मीपणा व नणंद भावजयीच्या नात्यातील पूर्वापार चालत आलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्षे पुन्हा परदेशी गेली.

आणखीन काही वर्षे गेली....

*आता चिमणी तेहतीस वर्षांची झाली असून प्रौढ दिसु लागली आहे.वरसंशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तीशीतील बहुतेक मुले डायव्होर्स झालेली,काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा काही वाईट व्यसने असलेली आहेत.*

आता अटी बऱ्याच शिथील झाल्या आहेत....

आता  कोणताही मुलगा चालेल बी.ई.ऐवजी एमसीए किंवा एमसीएम असला तरी चालेल.

*त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही.,*

बट...स्टील देअर ईज नो लक !

*आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे ऊंबरठे झिजवायला सुरवात केली आहे.भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवुन झाली आहे. प्रत्येक ज्योतिष्यांनी सांगितलेले उपाय शांती व खडे वापरून झाले आहेत.*

बट.... स्टिल देअर इज नो लक

*चिमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणुनही स्वातंत्र्य देऊन झाले पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चिमणीत नाही.अजुनही चिमणीसाठी मुले पहाणे चालुच आहे.*

चिमणी आता ४० वर्षांची झाली आहे.तिच्याजवळ स्वतःचे सुंदर घर,गाडी व भरपूर बॅन्क बॅलन्स आहे.पण आयुष्य नासलय. काळजी करणारे कोणीही मायेचे माणूस जवळ नाही.

*वैराण झालय आयुष्य.*

*आता आई वडील पण वयोमाना नुसार थकलेत.*

( मुलीच्या संसारात सासू सासरे नको म्हणणार्‍या आईला सूनच सांभाळत आहे. )

*चिमणी एकटी पडलीय...* 

*कोण चुकले...*

*चिमणी ?*

*चिमणीचे वडील ?*

*चिमणीची आई ?*

*अपेक्षा व अटींचा हा खेळ सध्या अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्चशिक्षीत कुटुंबामधे अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे*

*ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही त्यामुळे योग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे.


*धन्यवाद ☞*

🌠 _संकलन_

*संजय* 

➖➖➖➖➖➖➖➖

Saturday, December 21, 2024

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली


परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार ;पोलीस अधिकारी निलंबित


*बीड, परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत*


नागपूर, दि. 20:-बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीड मध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे. 

बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यांतील भूमाफिया, वाळूमाफियांस गुन्हेगारीची पाळेमुळे खणू काढू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवी पेक्षा अधिक पोलीस बळाचा वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 


बीड, परभणी येथील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परंतु पोलीसांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे काय याची चौकशी केली जाईल. ही चौकशी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून करण्यात येईल. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकान, वाहन, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीची कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहींची तयार झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील योग्य कारवाई करावी. गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल


कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर, दि. २० - कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहे. शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. 

महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अश्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासहस मतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 *हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर*


विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासहस मतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर, दि. २१ : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हिरवळीवर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासह शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या अधिवेशनात मांडलेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना यापुढेही सुरु ठेवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपत्ती बाधीत ५५ हजार संत्रा शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कापसाला बोनस देण्यात आला आहे. सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली असून १२ जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. बाजारात कापूस आणि तुरीचे खरेदी दर जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहेत. विविध माध्यमांतून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेबरोबर प्रकल्प करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ०.७२ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी ३५८६ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, बांबू अभियान यासारख्या उपक्रमांना देखील आशियाई विकास बँक मदत करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात सर्वासामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडविणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्यांच्या-मायभगिनींच्या प्रगतीसाठी, रक्षणासाठी यापुढेही एक टीम म्हणून काम केले जाणार आहे. या अधिवेशनात नागरिकांच्या, राज्याच्या चौफेर विकासाचा संकल्प करण्यात आल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले आहे.

या परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, आशिष जयस्वाल, नितेश राणे आदी उपस्थित होते.

Friday, December 20, 2024

चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला 'टोल कर माफ व्हावे' यासाठी आंदोलन छेडणारा महादेव जानकर यांचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड

चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला 'टोल कर माफ व्हावे' यासाठी आंदोलन छेडणारा महादेव जानकर यांचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड



कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्कादेवी यात्रेसाठी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने जातात. विशेषता माणदेशी जनतेत चिंचणी मायाका यात्रा लोकप्रिय आहे. मायाक्का देवी आणि भक्ताचे नातेही अतूट आहे. सामान्य माणसांची, मेंढपाळांची देवी अशी मायाक्का देवीची ख्याती आहे. कृष्णा कोयना नदी काठावर मेंढ्यामागे फिरणारा मेंढपाळ समूहातील मुलांनी गिरणी कामगार म्हणून, पुढे माथाडी कामगार, रिक्षा ड्रायव्हर, रंग कामगार यासाठी मुंबईची वाट धरली. रानोमाळ स्वच्छ मोकळा श्वास घेणारा मेंढपाळ मुंबईत गुदमरलेला श्वास घेऊन जगायला लागला. त्यामुळे प्रत्येकाला गावाची ओढ असते, पण गावी जायचं तर ते निमित्त असतं यात्रेचे, देवधर्माचे. माघ पौर्णिमेला चिंचणी मायाक्काची यात्रा भरते. या यात्रेला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोणी गावावरून यात्रेला जातात तर कोणी मुंबईवरून थेट चिंचणीला जातात. मुंबईवरून जाणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशोक गलंडे हे मुंबईत पवई येथे राहत होते. अशोक गलंडे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते. महादेव जानकर यांना ते आपले नेता मानत होते. अशोक गलंडे यांना राष्ट्रीय समाज पक्षात 'गलंडे मामा' या नावाने ओळखले जायचे. चिंचणी मायाका यात्रेसाठी भाविक भक्तांना मोठा खर्च येतो. लोकांची यात्रा कमी खर्चात व्हावी, आनंदात व्हावी, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आपल्याला काही करता येईल का? असा त्यांनी विचार केला, यात्रा मार्गावर महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात टोल द्यावा लागतो. टोलचा खर्च वाचला तर यात्रेकरूंवर आर्थिक ताण येणार नाही. यासाठी अशोक गलंडे यांनी रासपचे राष्ट्रीय नेते महादेवजी जानकर यांच्या परवानगीने टोल कर माफीचे आंदोलन छेडन्याचा निर्णय घेतला. महादेव जानकर यांनीही तसा शासनाकडे पत्रव्यवहार केला.

आंदोलन करायचे म्हटले तर लोक रस्त्यावर आले पाहिजेत. टोल नाका बंद पाडला पाहिजे. आंदोलन यशस्वी झाले पाहिजे. आंदोलन दिवसा होणार नव्हते तर रात्रीचे होणार होते. चिंचणी मायाका यात्रेसाठी भक्त रात्रीच निघतात. गलांडे मामा यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याचे ठरवले. ठिकठिकाणी टोल नाक्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर झोपले. पोलिसांनी आपले बळ वापरून कार्यकर्त्यावर लाटीचार्ज करण्यास सुरू केले. काही कार्यकर्ते पोलीस बळाला घाबरले. रस्त्यावर आडवे होऊन आंदोलन करणारे आरपीआयचे कार्यकर्ते रासपच्या आंदोलनात सामील होते, टोल कर माफ झाल्याशिवाय इथून हटायचं नाही असा निर्धार पक्का केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेदेखील रस्त्यावरून तुसभर बाजूला झाले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी टोल प्रशासनाला ठणकावले, रात्रीचे बारा वाजतातयत. तुम्ही वीनाविलंब यात्रेकरूंची वाहने टोल न घेता सोडून द्या, अन्यथा आंदोलन हाताबाहेर जाऊ शकते. मुंबईतील ठीक ठीकाणच्या टोल नाक्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन पार पडले. महादेव जानकर यांच्या एका फोनवर चिंचणी मायाका यात्रेसाठीचा टोल कर माफ करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा लावलेल्या वाहनास चिंचणी मायाका यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रात टोल माफ करण्यात आला. 

टोल कर माफीसाठी आंदोलन छेडणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. गलांडे मामा यांना ९ हजार रुपये पेन्शन मिळायची. त्यातील दोन हजार रुपये राष्ट्रीय समाज पक्षासाठी ते राखून ठेवायचे. महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्ष याविषयी लोकांना ते भरभरून बोलायचे सांगायचे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी माढा लोकसभा लढवावी, असा त्यांचा आग्रह होता. माण विधानसभा मतदारसंघात मोजके कार्यकर्तेना सोबत घेऊन जनसंपर्क दौराही केला होता. एका दिवाळीला 'समाजाची दशा व दिशा' असे पत्रक काढून डॉ. घुटुकडे यांच्यासोबत त्यांनी गावोगाव वाटले होते. मुंबई महानगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते मुंबईला गेले होते.

राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप बरोबर युती करणे, हे गलंडे मामा यांना आवडले नाही. ते राष्ट्रीय समाज पक्षापासून दुरावले आणि बसपाशी जवळीक साधली. चळवळ आणि राजकीय तडजोड वेगळी असते, याचे बाळकडू रासप कार्यकर्त्याना नसल्याने पक्षाचे नुकसानही झाले. 2024 च्या विधानसभेत महादेव जानकर यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून भाजप पासून फारकत घेतली. गलांडे मामा यांच्यासारखे पक्ष व नेतृत्वाला जपणारे कार्यकर्ते तयार होतील का? हा प्रश्न आहे. 

गलंडे मामा मुळचे पुळकोटी, तालुका माण जिल्हा सातारा येथील रहिवाशी. म्हसवड परिसरात ते वावरायचे. माणदेशातील शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता माण देशातील प्रस्थापित व्यवस्थेला शह देण्यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करणारा एक लढवय्या शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी हरपला. गलंडे मामा यांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!

शोकाकुल : आबासो पुकळे व यशवंत नायक परिवार.

लाचखोरी गिळणार लोकशाहीला; पाच लाखाची लाच घेताना न्यायाधीशच अडकला जाळ्यात

लाचखोरी गिळणार लोकशाहीला; पाच लाखाची लाच घेताना न्यायाधीशच अडकला जाळ्यात 


#लाचलुचपत #acb #भ्रष्टाचार #bribe #corruption #democracy #sataraACB 

राष्ट्र भारती द्वारा  | 

भारत देशात लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते. मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे. पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयां विरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तीघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्य, देशभर खळबळ उडाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे, पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला, तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना जनतेची असते. मात्र, चक्क न्यायाधीशच लाच घेताना आढळून आल्याने,  लोकशाही भारतात विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस, शिक्षण, महसूल व अन्य प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वरील घटनेने न्यायालयावर आमचा विश्वास हे वाक्य आता गुळगुळीत ठरणार आहे. सातारा जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या, तहसील कार्यालय, भुमिअभिलेख, कार्यालयाच्या लाचखोरीच्या घटना घडत असतात, मात्र संपूर्ण न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी काशीनाथ शेवते यांची फेरनिवड

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल

महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी काशीनाथ शेवते यांची फेरनिवड



#rashtriyasamajpaksh #mahadevjankar #kashinathshevate #chandrapal #maharashtrarsppresident 

मुंबई (१३ डिसेंबर २०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात सह इतर राज्यातील कार्यकारणी निष्कासित करण्यात आली होती. आज राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे काही निवडी जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशचे माजी अध्यक्ष चंद्रपाल यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी वर्णी लागली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते यांची फेरनिवड करून त्यांच्या नेतृत्वावर रासपाने विश्वास दर्शवला आहे. गुजरात राज्य प्रदेश प्रभारीपदी सुशील शर्मा, कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक, मध्यप्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल, तेलंगणा राज्य प्रभारी रमाकांत करगतला, दिल्ली राज्य प्रभारी श्रीमती हेमलता पाल, उत्तर प्रदेश राज्य प्रभारी श्रीकांत गुरुजी यांची नियुक्ती केल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

या निवडीबद्दल रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के प्रसन्नाकुमार, शिवलिंगप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शुरनर यांच्यासह अन्य राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

नागपुरात मंत्रीपदाचा शपथविधी पार पडलाय पण... मोठी व्होट बँक असलेला धनगर, ओबीसी समाज संतापलाय

नागपुरात मंत्रीपदाचा शपथविधी पार पडलाय पण...
मोठी व्होट बँक असलेला धनगर, ओबीसी समाज संतापलाय 


#gopichandpadalkar #Devendrafadanvis #bjp #maharashtra #minister #government #mla

मुंबई : आज नागपुरात महाराष्ट्र मंत्रीमंडळ शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. मराठा समाजानंतर मोठी व्होट बँक असणाऱ्या धनगर समाजाला भारतीय जनता पक्षाकडून संधी न मिळाल्यामुळे धनगर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण नेते असणारे गोपीचंद पडळकर यांचे नाव संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत नाव झळकत होते. जत विधानसभेतून गोपीचंद पडळकर मोठया मताधिक्याने निवडून आल्याने मंत्री पद भेटेल, असे वाटत असतानाच आज झालेल्या मंत्र्यांच्या यादीत गोपीचंद पडळकर यांचे नाव नसल्याने, भाजपच्या विरोधात धनगर समाजातून नाराजीचा सूर उमतटत आहे. अभ्यासू मंत्री व ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारा नेता असणाऱ्या छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी समाजाकडून तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. भुजबळ आणि पडळकर यांना मंत्रीमंडळात डावल्याने महायुती सरकार विरोधात समाज माध्यमातून प्रचंड रोष व्यक्त होत आहेत. गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात विस्तारात डावल्याने धनगर समाजाचे युवक भडकले आहेत,भाजपच्या विरोधात समाज माध्यमातून नाराजीचे सुर उमटत आहेत. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे ओबीसी समाज भयभीत झाला होता, त्यावेळी त्यांना धीर देण्याचे काम छगन भुजबळ, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांनी केले होते. शासकीय निधी वाटप होत असताना ओबीसी, धनगर समाजाला सापत्नुक वागणूक दिली जात आहे, अशी जनभावना सर्वसामान्य ओबीसी, धनगर समाजात आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने अजित पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले जात आहेत.


गोपीचंद पडळकर यांना डावलणे म्हणजे वाचाळ, मर्यादा सोडून बोलणाऱ्यांना स्थान मिळणार नाही, असा संदेश देण्यात आला असेही म्हणता येणार नाही, कारण तिकडे नितेश राणे, जयकुमार गोरे यांच्यासारख्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत.


छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न होणे धक्कादायक मानले जात आहे. राज्यातील माळी समाज भुजबळ यांनाच आपला नेता मानतो. ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात भुजबळ यांना नेता मानतो. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्याच्या बाबतीत उघड भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने खटके उडाले आहेत. 


धनगर, ओबीसी समाजाला मंत्रिमंडळात डावल्याने आगामी निवडणुकांत भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल. कोणताही राजकीय पक्ष मोठी व्होट बँक दुखावणार नाही. 

खालील गोष्टींमुळे भाजपने फसवल्याची भावना धनगर समाजाच्या मनामनात रुजतेय..

1.एसटी आरक्षण अंमलबजावणी बाबतीत फसवणूक

2.योजना लागु करुन बजेट दिलं नाही तिथं फसवणूक 

3.गेल्या अडीच वर्षांत मंत्री पद दिलं नाही तिथं फसवणूक 

4.तिकीट वाटपात फक्त दोनच तिकीट दिले तिथं फसवणूक 

5.आताच्या मंत्री मंडळात डावललं तिथं फसवणूक 

6.धनगर नेत्याला भाजपच्या कोअर कमिटीत संधी नाही.

7.भाजपच्या निर्णय प्रक्रियेत धनगर नेत्यांचा सहभाग करुन घेत नाहीत.

सामाजिक कार्यकर्ते निवांत कोळेकर म्हणतात, सत्तेत आणायला बीजेपीस धनगर चालतो. सत्ता चालवायला नको. निवडणुकीत भरभरुन मते द्यायला धनगर चालतो. धनगरांच्या मतामुळे बीजेपीस खुर्च्या मिळाल्यावर त्या खुर्च्याचा भागीदार मात्र धनगर नको. राबायला आम्ही आणि मलिद्याला फक्त तुम्ही... हा जमातीवरील अन्याय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतपेटीतून व्यक्त झालेला दिसेल. येणार्‍या जिल्हापरिषदा आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत ती मते मागायला धनगर जमातीस या... मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचा धनगर जमातीचा रोष स्थानिक स्वराज्य संस्थांत पहा. विधानसभेत वाजवी यश मिळालेले बीजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ धनगर मतामुळे दिवसा चांदण्या बघायला लावू.

Wednesday, December 18, 2024

तेलंगणात कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष बुथ पातळीवर वाढवावे - महादेव जानकर






तेलंगणात कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष संघटन बुथ पातळीवर वाढवावे - महादेव जानकर 

हैद्राबाद :  येथे राष्ट्रीय समाज पक्ष तेलंगणा प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकिला मार्गदर्शन करण्यासाठी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष मा. सिद्धप्पा अक्कीसागर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी व मजुरांचा, कामगारांचा, शेतकर्यांचा मुलगा या लोकशाहीत राजा बनला पाहिजे, म्हणून पक्ष काढला आहे. कार्यकर्त्यांनी जिल्हा, तालुक्याच्या फादर बाॅडी, युवा आघाडी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी निर्माण करून बुथ बांधणी पर्यंत पुर्णपणे संघटन वाढवावे. येणाऱ्या सर्वं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करावी, असा संदेश दिला. तसेच रासेफचे अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर बोलताना म्हणाले, समाजातील बुद्धिजीवी लोकांनी गाव पातळीवर सत्यशोधन, समाज प्रबोधन व राष्ट्र संघटन करण्याचे काम करावे असे आवाहन केले. राष्ट्रीय संघटक गोविंदराम म्हणाले, तेलंगणात पक्षाचा विस्तार वन बुथ टेन युथ याप्रमाणे पक्षाचे संघटन वाढवून  विधानसभा निवडणूकीत रासपाची भागीदारी असेल, असे कार्य करतील असे प्रतिपादन केले.

या बैठकीत तेलंगणा प्रदेशचे प्रभारी म्हणून रमाकांत करगाटला यांची नियुक्ती झाल्याबदल राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

प्रथम मिडियाच्या पत्रकारानी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांची पत्रकार परिषद घेतली . यावेळी माजी प्रभारी दत्तराम खताळ, सदाशिव पाटील, रमेश दोडामणी, एल. के अशोक , तुकाराम धुळगंडे, जे अनिल, द्याल श्रीनिवास, जेथंप्पा, नवनाथ,  सुर्यकांत गुंडाळे, जयपाल कुरुमा राष्ट्रीय समाज एम्लाईज फेडरेशनचे  कार्यकर्ते  मदनेश्वर शूरनर, मायप्पा लवटे, मल्लिकार्जुन अबांमत, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Rashtriya Samaj Party (RSP) Telangana State Meeting concludes in Hyderabad!

Rashtriya Samaj Party (RSP) Telangana State Meeting concludes in Hyderabad!

Hyderabad: Rashtriya Samaj Party (RSP) Telangana State Meeting was held in Hyderabad on 14 December 2024. Telangana state in-charge Ramakant Kargatla had organized the event. The meeting was successfully completed under the chairmanship of national organizer and Telangana in-charge Govindram Shurnar. In this meeting, the chief guest - guide was Hon. Founder National President of Mahadev Jankar former Cabinet Minister, Hon. Siddappa Akshisagar National President National Society Employees Federation was present. In the beginning, the meeting was started by saluting the public welfare statesman Queen Ahilya Devi Holkar and the founder of the world famous Vijayanagara Empire, Maharaja Haq-Buk. 

In this meeting, Shri Akhisagar ji expressed his views on the party's principles of Satya Shodhan, Social Enlightenment, and National Organization and the party's commitment. Making the neglected deprived sections of the society the kings and rulers of the state and country is the main objective and goal of the National Social Party. Knowing Mahadev ji kept it. Emphasizing that maximum work should be done on the organization of the party, he said, he advised the organizers to quickly select the workers from the booth to the state executive in order to reach out to the voting public. 

Empowering farmers and ensuring fair benefits to them, Creating opportunities for education and employment of students, Reducing unemployment, Empowering marginalized and deprived communities and women, Encouraging equitable sharing of resources, Justice and The party stressed the need to involve youth leaders, women, girl students, policy makers and dedicated individuals to address institutional problems in governance and create a strong state and equitable society for Telangana. 

Journalist conference organized 

A press conference was organised. RASP National President Mahadev ji Jankar, RASF National President Shri Akhisagar ji and State in-charge Ramakant Kargatla ji addressed the press conference. The party appealed to the citizens to support and join hands with the mission of RSP, which is dedicated to solving grassroots level problems and upliftment of the deprived sections. Ramakant Kargatal ji, the newly appointed in-charge of Telangana state, was honored at the hands of the National President by knowing him as Rashtranayak Mahadevji. 

In this meeting, apart from Telangana state in-charge Ramakant Kargatlaji, chief member L. Of. Ashok, K. Dattaram, Sadashiv Patil, Madaneshwar Shoorner, J. Anil, Dayala Srinivas Suryakant Gundale, Vidyayal Srinivas, Ramesh Doddamani, Tukaram Dhulgande, Mallikarjun Abmanat, Jenthappa, Jaipal, Srinath and Mayappa Lovete etc. were present.

Thanks were expressed to the media friends, well-wishers, Praveen Dubey and his team, as well as Ma.Mahadevji Jankar Saheb and other leaders who helped in making this program successful. In this meeting, the party's resolve towards building Telangana based on equality, justice and development was reiterated.

Inauguration ceremony of Doddi Komarayya Kuruma Samaj Bhawan concluded

The inauguration ceremony of the revolutionary Doddi Komarayya Kuruma Samaj Bhawan organized by Telangana Kuruma Sangham was attended by Hon. Organizer Mr. Mahadev Jankar and Mr. S.L. Akshisagar. Yagge Mallesham-MLCG had invited. State Chief Minister Revanth Reddy, former Karnataka Minister HM Revanna, thinker Shri Kancha Illaya, other prominent social-politicians of the state were present on the stage. Virat Janasagar was present in the courtyard of the grand Kuruma Bhavan.

Monday, December 9, 2024

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -२०२४ या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार लढले

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -२०२४ या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार लढले 

मुंबई ( २०/११/२४) : मतदारसंघ अनुक्रमांक, मतदारसंघाचे व उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे :

१९ जामनेर विधानसभा - डॉ. प्रभाकर पंढरी साळवे 

२१ मलकापूर विधानसभा - प्रवीण पाटील 

२४ सिंदखेडराजा विधानसभा - प्रा. दत्ता चव्हाण

२९ बाळापूर विधानसभा - विश्वनाथ जवरकर

३३ रिसोड विधानसभा - दीपक तिरके 

३५ कारंजा विधानसभा - संतोष दुर्गे 

३७ बुलढाणा विधानसभा - डॉ. विकास नांदवे

४५ देवळी पुलगाव विधानसभा - सौ. अश्विनी शिरपुरकर 

४८ काटोल विधानसभा - संदीप लोखंडे

५१ उमरेड विधानसभा - संजय बोरकर

५३ नागपूर दक्षिण विधानसभा - प्रा. रमेश पिसे

५८ कामठी विधानसभा - नाफिस शेख

७२ बल्लारपूर विधानसभा - संजय कन्नावर

७३ ब्रह्मपुरी विधानसभा - सुधीर ठोंगे 

७७ राळेगाव विधानसभा - रामदास महुरे

७८ यवतमाळ विधानसभा - धर्मसिंह ठाकूर

८० आर्वी केळापूर विधानसभा - रामचंद्र आडते 

८२ उमरखेड  विधानसभा - प्रज्ञेश पाटील 

८३ कीनवट विधानसभा - गोविंदराव जेठेवाड 

८४ हदगाव विधानसभा - बापूराव वकोडे

८५ भोकर विधानसभा - साहेबराव गोरठकर 

८७ दक्षिण नांदेड विधानसभा- संजय आलेवर 

९० देगलुर विधानसभा - श्याम निलंगेकर 

९१ मुखेड विधानसभा - विजयकुमार पेठकर 

९२ वसमत विधानसभा - मुंजाजी बंडे 

९३ कळमनुरी विधानसभा - डॉ. संजय लोंढे

९४ हिंगोली विधानसभा - पंजाबराव हराळ 

९५ जिंतूर विधानसभा - डॉ. प्रभाकर बुधवंत 

९६ परभणी विधानसभा - सौ. सावित्री चकोर 

९७ गंगाखेड विधानसभा - डॉ. रत्नाकर गुट्टे 

९८ पाथरी विधानसभा - सईद खान

१०० घनसावंगी विधानसभा - रमेश वाघ

१०१ जालना विधानसभा - विनोद मावकर 

१०६ फुलंब्री विधानसभा - रमेश काटकर 

११० पैठण विधानसभा - प्रकाश दिलवाले 

११८ चांदवड विधानसभा - सखाराम राजनोर 

१२० सिन्नर विधानसभा - अशोक जाधव 

१२१ निफाड विधानसभा - ज्ञानेश्र्वर ढेपले 

१२३ नाशिक पूर्व विधानसभा - प्रसाद बोडके 

१३२ नालासोपारा विधानसभा - नरसिंह अदावळे 

१४० अंबरनाथ विधानसभा - रुपेश थोरात 

१४६ वर्सोवा विधानसभा - कु. महक चौधरी 

१५५ मुलुंड विधानसभा - नितीन कोळेकर 

१५६ विक्रोळी विधानसभा - हेमंत पवार 

१५७ भांडुप पश्चिम विधानसभा - विठ्ठल यमकर

१५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा - विजय यादव

१६१ चारकोप विधानसभा - स्वरूप शुक्ला 

१७५ कलिना विधानसभा - अजय घाडगे

१८७ कुलाबा विधानसभा - जीवाराम बघेल

२०० इंदापूर विधानसभा - तानाजी शिंगाडे 

२०१ बारामती विधानसभा - संदीप चोपडे 

२०२ पुरंदर हवेली विधानसभा - संजय निगडे 

२०८ - वडगांव शेरी विधानसभा - सतिश पाण्डेय 

२११ खडकवासला विधानसभा - बालाजी पवार

२१३ हडपसर विधानसभा - एड. मनोज माने

२१५ कसबा पेठ विधानसभा - शैलेश काची 

२१६ अकोले विधानसभा - पांडुरंग पथवे 

२२० श्रीरामपूर विधानसभा - सूर्यकांत आबंडकर 

२२२ शेवगाव पाथर्डी विधानसभा - आत्माराम कुंडकर 

२२४ पारनेर विधानसभा - सखाराम सरक

२२६ श्रीगोंदा विधानसभा - दादासाहेब कचरे

२२८ गेवराई विधानसभा - प्रा. आण्णासाहेब मतकर 

२२९ माजलगाव विधानसभा - मुक्तिराम आबुज 

२३० बीड विधानसभा - परशुराम काशीद

२३२ केज विधानसभा - सौ. शितल रोकडे 

२३४ लातूर ग्रामीण विधानसभा - बालकिशन अडसूळ

२३५ लातूर शहर विधानसभा - दादासाहेब करपे

२३८ निलंगा विधानसभा - नागनाथ बोडके 

२३९ औसा विधानसभा - श्याम गोरे

२४१ तुळजापूर विधानसभा - धनंजय तरकसे 

२४२ कळंब धाराशिव विधानसभा - श्रीहरी माळी

२४३ परांडा विधानसभा - डॉ. राहुल घुले 

२४६ बार्शी विधानसभा - किशोर गाढेकर 

२४७ मोहोळ विधानसभा नागनाथ क्षिरसागर 

२५० अक्कलकोट विधानसभा - सुनील बंडगर 

२५१ दक्षिण सोलापूर विधानसभा - उमेश काळे  

२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा - पंकज देवकाते 

२५४ माळशिरस विधानसभा - प्रा. डॉ. सुनील लोखंडे 

२५५ फलटण विधानसभा - दिंगबर आगवणे 

२५६ - वाई विधानसभा - सागर जानकर

२५७ कोरेगाव विधानसभा - उमेश चव्हाण

२५८ माण खटाव विधानसभा - दादासाहेब दोरगे 

२५९ कराड उत्तर विधानसभा- सोमनाथ चव्हाण

२६० कराड दक्षिण विधानसभा - महेश जिरंगे 

२६१ पाटण विधानसभा - विकास कदम

२६२ सातारा विधानसभा - शिवाजी माने

२६४ गुहागर विधानसभा - प्रमोड आंबरे 

२७४ कोल्हापूर दक्षिण विधानसभा - विशाल सरगर 

२७७ पन्हाळा शाहूवाडी विधानसभा - अभिषेक पाटील

२७९ इचलकरंजी विधानसभा - सचिन बेलेकर 

२८२ सांगली शहर विधानसभा - सतीश सनदी

२८३ वाळवा विधानसभा - सतीश इदाते

२८६ खानापूर विधानसभा - उमाजी चव्हाण

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...