Tuesday, July 1, 2025
Monday, June 30, 2025
मुंबई विद्यापीठातून शाहीराच्या मुलाने केली एल.एल.बी उत्तीर्ण
मुंबई विद्यापीठातून शाहीराच्या मुलाने केली एल.एल.बी उत्तीर्ण
कळंबोली : मराठी लोकसाहित्यात भर घालणारी, मौखिक पद्धतीने पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या धनगरी ओव्या गाणाऱ्या शाहिर ज्ञानेश्वर वाक्षे यांच्या मुलाने मुंबई विद्यापीठातून नुकतीच एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण केलीय.
प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून उदय लता ज्ञानेश्वर वाक्षे या युवकाने मुंबई विद्यापीठाच्या केएलई कॉलेज कळंबोली येथून एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मायाक्कादेवी मंदिरात सत्काराचे आयोजन केले होते. आर्थिक परिस्थितीचे कारण न देता उदय वाक्षे यांनी रावजी चहाचा व्यवसाय करत, ही परीक्षा उत्तीर्ण केल्याने, सर्वत्र कौतुक होत आहे. उदय वाक्षे यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल विश्वनायक फाऊंडेशन संस्थापक विजय ज्ञानेश्वर वाक्षे यांनी आनंद व्यक्त केला.
भगवान मोटे यांनी उदय वाक्षे यांना मानाचा फेटा बांधून, शाल श्रीफळ देत विशेष सत्कार केला. सत्कारप्रसंगी सुखदेव खांडेकर, वाक्षेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच आगतराव मोटे, प्राध्यापक एन. पी. खरजे, मायाक्कादेवी मंदिराचे पुजारी श्री. कोळेकर, सदाशिव मोटे, काशिनाथ पुकळे, किरण मोटे, दीपक मोटे, कुणाल मोटे,ओंकार मोटे व अन्य मित्र परिवार उपस्थित होते.
Sunday, June 29, 2025
11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, ३० जून पासून प्रवेशाला सुरुवात
इयत्ता 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, ३० जून पासून प्रवेशाला सुरुवात
#11th admission #maharashtraeducation #11वी प्रवेश
मुंबई : शैक्षणिक वर्ष 2025 - 26 मधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. दहावीच्या लवकर निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेश लवकर होणे अपेक्षित होते, मात्र दीड महिन्याहून कालावधी लोटला तरी ११ वी प्रवेश होऊ शकलेले नाहीत. आज सायंकाळी 5 वाजता 11 वी प्रवेशासाठी गुणवत्तेनुसार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे, प्रसिध्दीपत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर जाहीर केले आहे. ११ वी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थी व पालकांनी यादीत आपला नाव तपासून पहावे.
आज सायंकाळी पाच वाजता गुणवत्तेनुसार पहिली यादी जाहीर होणार असली तरी, दिनांक ३० जून पासून प्रवेशास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ७ सात जुलै पर्यंत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
Tuesday, June 24, 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर रासपाची निदर्शने
शेतकरी कर्जमाफीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर रासपाची निदर्शने
उद्योगपतींची कर्जे माफ करता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही? : राष्ट्रीय समाज पक्ष
अलिबाग (२३/६/२०२५) : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व सातबारा कोरा करा या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. उद्योगपतींची कर्जे माफ करता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही? असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी माजी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रसार माध्यमांशी बोलताना केला. अदानी अंबानी यासारखे उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी आंदोलन, मोर्चे काढावे लागत नाही, निवेदन द्यावे लागत नाही अशी बोचरी टीका शरद दडस यांनी राज्यसरकारविरोधात केली.
शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. आज शेतकऱ्यावर वाईट वेळ आली आहे, राज्य सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करून, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून दिलेली आश्वासने पाळावीत, असे रासपच्यावतीने सांगण्यात आले. रायगड जिल्हा महसूल तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी रासपचे निवेदन स्वीकारत आपल्या मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहचवू, असे आश्वासन रासपच्या शिष्टमंडळास दिले.यावेळी रासपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, राज्य कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, राज्य विद्यार्थी आघाडी मा. प्रदेशाध्यक्ष शरद दडस, कोकण प्रांत अध्यक्ष सुशांत पवार, कळंबोली शहराध्यक्ष अण्णासाहेब वावरे, पनवेल तालुका युवक आघाडी अध्यक्ष शशिकांत मोरे, प्रा. दत्ता अनुसे सर, अशोक कोकरे आदी पदाधिकारी/ कार्यकर्ते उपस्थित होते. रासपाचे आंदोलनास शेतकरी संघटनेचे मुस्ताक गट्टे, छवा संघटना खालापुर यांनी पाठिंबा दिला.
Thursday, June 19, 2025
शिस्तवान आणि ज्ञानवान विद्यार्थी घडवणारे शिक्षक श्री. सावंत सर यांचे निधन..!
शिस्तवान आणि ज्ञानवान विद्यार्थी घडवणारे शिक्षक श्री. सावंत सर यांचे निधन..!
रयत शिक्षण संस्थेचे श्री. शंभू महादेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुकुडवाड च्या विद्यालयात गणित आणि विज्ञान विषयाचे ज्ञानदान करणारे शिक्षक श्री. सावंत सर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. शासनाने नेमून दिलेल्या विहित वेळेपलिकडे जाऊन उपेक्षित, वंचित, शेतकरी, मेंढपाळ यांच्या मुलांसाठी विशेष परिश्रम घ्यायचे. सर शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय असो किंवा परीक्षेतील मार्क असो, पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्यांला मार्क समान असायची. वाडी वस्तीवरच्या विद्यार्थ्यांना बाह्य जगातील शिस्त, शाळेची शिस्त, वर्गातील शिस्तीचे धडे सर द्यायचे. भूमितीचे प्रमेय असो किंवा एखादे अवघड गणित असो, नाहीतर सायन्स मधील Concept त्यांच्या तासाला सर्व सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना सोपे वाटायचे. केवळ पुस्तकात दिलेल्या प्रश्न न विचारता संपूर्ण पाठातील अभ्यासक्रमावर कोणताही स्वतः प्रश्न तयार करून विद्यार्थ्याला विचारायचे आणि परिपूर्ण पाठची उजळणी घ्यायचे.
सरांचा मोठा मुलगा रोहित आमच्या वर्गात होता. त्याकाळात आजच्या सारखा टिपिन वैगेरे असले काही माहित नव्हते. दुपारच्या सुट्टीत जेवायला जुन्या फाटक्या कपड्यात बांधून आणलेली ज्वारीची नाहीतर बाजरीची भाकरी, त्यावर तेल चटणी असायची, सरांनी हे सर्व पाहिले. सरांनी दुपारच्या जेवणाला भाकरी सोबत पालेभाज्या आणायला सांगून आहारातील पालेभाजीचे महत्व सांगितले. गृहपाठ नित्यनेमाने असायचा, न करणाऱ्यांना आगळी वेगळी शिक्षा असायची. सरांचे गाव हिवरवाडी ता - खटाव जिल्हा सातारा. २०१९ मध्ये म्हसवड येथे सरांची शेवटची भेट झालेली. सरांच्या धाकट्या मुलाचे हिवरवाडी- पडळ रस्त्यावर मेडिकल स्टोअर आहे. सराना एनकुळ येथे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मिळाली होती. सावंत सर मोटरसायकलवरून कुकुडवाड ला यायचे. शाळेची घंटा वाजण्याअगोदर सरांचा एक स्पेशल तास अगोदर भरायचा, नाहीतर दिलेला अभ्यास असायचा. त्यांची कडक शिस्त असली तरी, ते अत्यंत प्रेमळ शिक्षक होते. सर्व विद्यार्थ्यांशी आपुलकीने बोलायचे. सर्वांचे आदर्श आणि लाडके सर म्हणून त्यांची ओळख होती. पालकांना मार्गदर्शन करायचे.
सावंत सर केवळ शाळेतले शिक्षण देणारे एक शिक्षक नव्हते तर जीवनाचे मार्गदर्शक गुरू होते. आदरणीय, सर्वांचे लाडके, आदर्श शिक्षक श्री. अरुण भाऊराव सावंत सर यांचे अकाली जाणे दुःखदायक आहे. मनाला वेदना देणारे आहे. सरांच्या आत्म्यास शांती मिळावी, त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सरांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!💐
- आबासो पुकळे,१९/६/२०२५.
शि- म्हणजे शिस्तप्रिय
क्ष- क्षमाशिल
क - म्हणजे कर्तव्यदक्ष
असे आदर्श शिक्षकाचे गुण असणारे सावंत सर आज आपल्यातून निघून गेलेत यावर विश्वास बसत नाही.
सर तुमच्याबद्दल थोडस...
एका दशका पेक्षा जास्त वर्षे श्री शंभु महादेव विद्यालय कुकुडवाड या शाळेतील मुलांना एक हाती शिस्त लावण्यात सर तुमचा मोलाचा वाटा आहे. तुमचा आवाज जरी कानावर पडला की जी शांतता याची ती पुन्हा कुठे अनुभवता नाही आली. तुमच्या शिकवण्यात जी तळमळ होती, ती आज पहायला मिळत नाही.सावंत सरांचा आज तास आहे ही अभ्यास करणाऱ्या साठी आनंदाचा तास अन अभ्यास न करणाऱ्या मुलांसाठी प्रचंड भीती.भूमिती विषय शिकवताना दिलेली उदाहरणे आजही जशीच्या तशी आठवतात * मी सर्वांना दिसलोच पाहिजे
आमचे डोळे तीक्ष्ण आहेत.
आम्ही तुम्हाला दुमते करू,
लेट कमर्स म्हणताना उजव्या हाताच्या चार बोटानी इशारा करून बोलावणे,
भूमितीचे प्रमेय सोडवताना फळ्यासमोर बोलवून बाजू दाखवायला लावताना मुलाने हात मागे पुढे केला की फळ्यावर काय वाघ बांधलाय का? असे सतत म्हणायचे, लाडू म्हणलं की येतंय, पुढे बोलावल्यावर खिश्यात हात घालून मुलगा उभा राहिला की खिश्यात काय पाहुण्याने चणे दिलेत काय? अशी अनेक उदाहरणे जशीच्या तशी आजही आठवतात. काही विद्यार्थी तुमच्या भीतीने लक्षात ठेवायचे अन काही जणांचे भीतीने लक्षातून जायचं. अनेकानी तुमच्या गाडीचा आवाज ऐकून सावंत सर आले पळा पळा एवढा तुमचा दबदबा होता. कारण आम्हाला तेव्हा आमच्या भविष्याविषयींचे काय वेध नव्हते. पण तुम्हाला मात्र माझा प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन मोठा व्हावा हा तुमचा प्रांजल हेतू होता. आज शिक्षण क्षेत्रात असे खूपच कमी शिक्षक पाहायला मिळतात. अभ्यासाविषयी मला तुम्ही दिलेली शिक्षा आठवत नाही. पण night study ला नाही आलो म्हणून एक कानाखाली तुम्ही मारलेली अजून स्पष्टपने आठवतंय.
सर मला खूप अभिमान वाटतो की मी तुमचा विद्यार्थी असल्याचा कारण शिक्षक म्हणून गेली 15 वर्षे सेवा करताना माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना आणि शिस्त लावताना तुमच्या अनेक उदाहरणाचा उपयोग मी आजही करत असतो. प्रत्येक शिक्षकाचे प्रत्येक वर्गात काही लाडके विध्यार्थी असतात पण सावंत सरांच्या मध्येमी पाहिलेला एक वेगळा गुण होता की त्यांचा कोणी लाडका विद्यार्थी आख्या शाळेत न्हवता कारण सर्व विद्यार्थी सारखेच.
तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष शिक्षकांमुळे शैक्षणिक क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर गेले.अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिस्त लावणारा
असा कडक शिस्तीचा रागीट आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला. सर तुमची आठवण सतत येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐👏👏👏
तुमचा विद्यार्थी
बिरा कोकरे
Wednesday, June 18, 2025
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन
![]() |
फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक व अन्य. |
मुंबई (१६/६/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने महाराष्ट्र राज्यभर विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन देण्यात आले, असल्याची माहिती रासपचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी यशवंत नायकाला दिली.
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकरी हा देशाचा कणा असून, सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व बाजारातील मंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करत राहील, असे श्री. पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यात पदाधिकारी यांनी निवेदन दिल्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी अभिनंदन केले.
प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनात राज्यातील खालील ठिकाणी निवेदने देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र विभागात सातारा जिल्ह्यात - माण, फलटण, सातारा, कराड, खटाव, पाटण. सोलापूर जिल्ह्यात- अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माढा, बार्शी, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, मोहोळ, सांगोला. पुणे जिल्ह्यात बारामती, हवेली, इंदापूर, दौंड, पिंपरी चिंचवड, मावळ, खेड, पुरंदर. कोल्हापूर जिल्ह्यात - शाहुवाडी, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, सांगली जिल्ह्यात- आटपाडी, जत, वाळवा, शिराळा. मराठवाडा विभागात धाराशिव जिल्ह्यात – धाराशिव, भूम, तुळजापूर, परंडा, कळम, वाशी. हिंगोली जिल्ह्यात – हिंगोली, सेनगाव, वसमत. लातूर जिल्ह्यात – लातूर, उदगीर. नांदेड जिल्ह्यात – देगलूर, बिलोली, मुखेड, नांदेड. बीड जिल्ह्यात – बीड, वडवणी, गेवराई, आंबेजोगाई, परळी, माजलगाव, शिरूर कासार. परभणी जिल्ह्यात – पूर्णा, सोनपेठ, पाथरी, परभणी, गंगाखेड. जालना जिल्ह्यात – जालना, अंबड, मंठा, घनसावंगी. छ. संभाजीनगर जिल्ह्यात – छत्रपती संभाजीनगर, पैठण. उत्तर महाराष्ट्र विभागात अहिल्यानगर जिल्ह्यात – श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत, जामखेड, राहुरी, अकोले, शेवगाव. नाशिक जिल्ह्यात – चांदवड, नाशिक, बागलाण, सिन्नर, निफाड. विदर्भ विभागात बुलढाणा जिल्ह्यात – सिंदखेडराजा, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, मूर्तीजापुर, तेल्हारा, यवतमाळ जिल्ह्यात – यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात - चंद्रपूर, वाशिम जिल्ह्यात - रिसोड. कोकण विभागात रायगड जिल्ह्यात – पनवेल, माणगाव, खालापूर, पेण, उरण, कर्जत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात – सावंतवाडी, वेंगुर्ला. पालघर जिल्ह्यात – वसई. ठाणे जिल्ह्यात – मुरबाड, शहापूर, कल्याण. मुंबई विभागात मुलुंड, बोरिवली, अंधेरी आदी तहसील कार्यालयात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी निवेदने देण्यात आली. या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा न केल्यास राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येईल, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिला आहे. निवेदन देणाऱ्या सर्व राज्यभरातील पदाधिकारी यांचे राज्य महासचिव श्री. सलगर यांनी अभिनंदन करून आभार यशवंत नायकशी बोलताना मानले.
रासपच्या स्वराज महारॅलीस मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा दिल्लीत उत्स्फूर्त प्रतिसाद
रासपच्या स्वराज महारॅलीस मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा दिल्लीत उत्स्फूर्त प्रतिसाद
![]() |
दिल्लीतून महाराष्ट्राच्या दिशेने परतीच्या प्रवासात स्वराज महारॅली समवेत रासपचे महादेव जानकर, अंकुश अनुसे, डी. के. पाटील |
![]() |
मध्यप्रदेश राज्यात सुंदरपूर जिल्हा मुरैना येथे स्वराज महारॅलीचे परतीच्या प्रवासात महादेव जानकर व रॅलीचे नागरिकांनी स्वागत केले. |
उत्तर प्रदेशात चीरघाट वृंदावन, आगरा किल्ला, धनगर समाज धर्मशाळा गोवर्धन मथुरा, गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील डुडेरा, ग्रेटर नोएडा, डी. ए. बी. स्कूल, हैबतपूर, गाजियाबाद जिल्ह्यात मवाई विजयनगर, भोहापुर कोसंबी आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. हरियाणा राज्यात पलवल जिल्ह्यात होडल, खिरवी, हसनपूर, खामी, घसेडा, गुधराणा, सेवली, मानपूर, गुदराणा, रेयार मोहल्ला या गावात स्वागत करण्यात आले. दिल्लीत गोयल डेअरी, गगन सिनेमा, नंदगिरी, ताहीर, मौजपूर, भगीरथ विहार, रोहिणी सेक्टर 18 आदी परिसरात स्वागत करण्यात आले. परतीच्या प्रवासात सुंदरपूर मुरैना, बदरवास शिवपुरी आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर येथे स्वराज महारॅलीतून श्री. महादेव जानकर हे गोपीनाथगड परळीकडे रवाना झाल्याचे विनायक रुपनवर कळवितात. पुणे येथील महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कार्यालयात स्वराज महारॅली सोबत ४२ दिवस प्रवास करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्याचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी सांगितले.
![]() |
मिसा पलवल हरियाणा येथे स्वराज महारॅलीचे स्वागत शाळकरी मुलांसह नागरिकांनी केले. |
![]() |
नंदनगिरी दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीचे स्वागत करताना स्थानिक नागरिक |
राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
नवी दिल्ली (३१/५/२५) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त, डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय समाज पक्षाची ग्रामपातळीवर भक्कम घोडदौड! मोगराळे सरपंचपदी नंदाताई राऊत
राष्ट्रीय समाज पक्षाची ग्रामपातळीवर भक्कम घोडदौड! मोगराळे सरपंचपदी नंदाताई राऊत
दहिवडी (१५/६/२५) : दोनच दिवसांपूर्वी मोगराळे ता. माण, जि. सातारा येथील गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव राऊत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मोगराळे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. नंदाताई संजय राऊत (राष्ट्रीय समाज पक्ष) यांची विजयी निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांच्या घरी भेट घेतली निवडीबद्दल अभिनंदन केले व सत्कार केला.
महादेव जानकर यांनी गावाच्या समग्र विकासासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना देत शासनाच्या योजनांचा योग्य लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मंत्र दिला. गावपातळीपासून विकासाची दिशा ठरते, आणि रासप त्यासाठी कार्यरत आहे!. माण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे, महादेव जानकर यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रूपनवर, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे (आबा), युवक आघाडी तालुकाध्यक्ष तात्याराम दडस, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
रासपा पुणे शहराच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ३ हजार फोटो फ्रेमचे वाटप
रासपा पुणे शहराच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ३ हजार फोटो फ्रेमचे वाटप
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, सामान्य माणसातील असामान्य जागृत करणारी ठिणगी असून महान आदर्श राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राला आणि कार्याला जनसामान्यपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे शहर, राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून तब्बल तीन हजार फोटो फ्रेमचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पुणे शहर राष्ट्रीय समाज पक्षाने सुरू केला आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे राजकीय सामाजिक कार्य आणि नेतृत्व आदर्श आहे. त्यांची प्रेरणा प्रत्येक घरात पोहचविणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे रासप पुणे शहर अध्यक्ष बालाजी दादा पवार यांनी सांगितले. श्री. पवार यांच्या संकल्पनेतून धनकवडी,आंबेगाव पठार येथून त्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी राजेश लवटे यांच्यासह पुणे शहर राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
जोपर्यंत सत्तेत शेतकर्यांची पोरं बसणार नाहीत, तोपर्यंत गरिबी हटणार नाही : महादेव जानकर
जोपर्यंत सत्तेत शेतकर्यांची पोरं बसणार नाहीत, तोपर्यंत गरिबी हटणार नाही : महादेव जानकर
४ थे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात
दौंड (१४/६/२५) : कांशीराम यांनी मला राजकारण शिकवले असून, जोपर्यंत सत्तेत शेतकर्यांची पोरं बसणार नाहीत, तोपर्यंत गरिबी हटणार नाही तसेच तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्ही चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करताय, सरकार म्हणते की, रस्ता देऊ, मेट्रो देऊ. परंतु, तुमचा विकास आमच्या कामाचा नाही, सन्मानाचा नाही.
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महाराष्ट्र राज्य महादेव जानकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण, स्वागताध्यक्ष प्रमोद ढमाले, संमेलनाचे प्रवर्तक दशरथ यादव, भीमथडी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक पवार, सुयश देशमुख, मोहन जाधव आदी उपस्थित होते. साहित्यिकांनी या देशाचे राजकारण बदलले पाहिजे यासाठी आपले लेखनीद्वारे लिखाण करावे असे आवाहन केले. आम्ही भाजपबरोबर गेलो ही आमची चूक झाली, अशी खंत व्यक्त करीत आमचे राज्य आणायचे आहे. दिल्ली हे माझे अंतिम लक्ष्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर येथे शनिवारी (दि. 14) आयोजित भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जानकर म्हणाले, मी दुग्धविकासमंत्री असताना दूध उत्पादकांच्या गायीच्या दुधाला अधिकार्यांचा विरोध डावलून 5 रुपये अनुदान दिले होते. आता मी दुग्धविकासमंत्री असतो तर गायीच्या दुधाला 100 रुपये दर दिला असता. त्यामुळे राज्य सरकारची नियत चांगली पाहिजे. सरकारची नियत खराब असेल तर शेतकर्यांची गरिबी कधीही हटणार नसल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले.
तसेच ज्याच्या जवळ येतेय, खांद्यावर बसतेय आणि लाथ मारतेय अशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली असल्याचा टोला नाव न घेता जानकर यांनी भाजपला लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय झाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काय झाले, पक्ष कोणी काढला, पक्ष कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे.
पक्ष फोडाफोडी नियतीला मान्य होत नसते. देशाची अवस्था काय आहे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आपले आहे का? असा सवाल उपस्थित करीत राज्यात कोण कोणाचा आणि कोण कोणाचा नाही हे कळत नसून चांगले काम करणार्या माणसाला न्याय मिळत नाही, तर त्यांची चापलुशी करणार्याला न्याय मिळतो, अशी खंत माजी मंत्री जानकर यांनी या वेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यस्तरीय बैठक संपन्न
महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यस्तरीय बैठक संपन्न
पुणे (११/६/२०२५) : येथील मध्यवर्ती कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी व विभागीय अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष आदरणीय काशिनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सोमवार, 16 जून 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तहसील कार्यालयांवर निवेदन देऊन "सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्या" ही मागणी जोरदारपणे मांडली जाईल. तसेच सोमवार, 23 जून 2025 राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकदिवसीय धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला जाईल. हे आंदोलन दोन टप्प्यांत राबवण्यात येणार असून लवकरच तिसऱ्या टप्प्याची दिशा जाहीर करण्यात येईल.
बैठकीस प्रदेश महासचिव : ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष : डॉ. प्रल्हाद पाटील, सोमा उर्फ आबा मोटे, प्रदेश सचिव सुनील बंडगर, जिवाजी लेंगरे, भाऊसाहेब वाघ, राज्य कार्यकारिणी सदस्य : सय्यद शेख, भानुदास हाके, बाळासाहेब कोकरे, सुनिता किरवे, ज्ञानोबा ताटे, भगवान ढेबे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष : आश्रुबा कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष : किरण गोफणे, संपर्क प्रमुख : विनायक रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र संघटक : कालिदास गाढवे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष : किसन टेंगले, राज्य सोशल मीडिया समन्वयक : लक्ष्मण ठोंबरे, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा : सुवर्णा जराड, युवक आघाडी अध्यक्ष : अशितोष जाधव, मुंबई विभागीय सदस्य : अंकुश अनुसे आदी उपस्थित होते.
तर सरकारचा बीपी वाढवू : महादेव जानकर यांचा इशारा
तर सरकारचा बीपी वाढवू : महादेव जानकर यांचा इशारा
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनास महादेव जानकर यांचा पाठिंबा
अमरावती (११/६/२५) : बच्चू कडूंची तब्येत बिघडली आहे. त्यांचा बीपी वाढत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन दिलेली आश्वासने पाळावीत, वेळप्रसंगी सरकारचा बीपी वाढवू, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनास भेट देऊन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रसह राज्यभर राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलन तीव्र करेल, असा इशारा दिला. यावेळी जानकर यांच्यासमवेत विदर्भ रासप नेते तोसीफ शेख व अन्य रासप पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे सरकार फसवे सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. आज अमेरिकेसारख्या देशात सरकार विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. इकडं आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी चार दिवसांपासून अन्नत्याग केलाय. आज हे उपोषण संयमानं सुरू आहे. या उपोषणाचं गांभीर्य सरकारनं घ्यायला हवं. संयमाचा बांध मात्र फुटू देऊ नका, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सरकारला दिलाय.
"विधानसभा निवडणुकीच्यावेळी सरकारनं जे वचन जनतेला दिलं होतं. त्याची वाचनपूर्ती सरकारनं करावी हीच आमची मागणी आहे. आम्ही एसीमध्ये बसून नेते झालो नाही. आम्हाला जनतेचं दुःख कळतं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, दिव्यांगांना न्याय देणार अशी अनेक वचने सरकारनं निवडणूक काळात दिलीत. आता जनता हुशार झाली आहे. जनतेनं ठरवलं तर जनता सरकारचा डोलारा उलथवू शकते," असा इशारा देखील महादेव जानकर यांनी दिला.
राष्ट्रीय समाज पक्षाचा ऐतिहासिक टप्पा!, दिल्ली केंद्रीय कार्यालयाचा शुभारंभ
राष्ट्रीय समाज पक्षाचा ऐतिहासिक टप्पा!, दिल्ली केंद्रीय कार्यालयाचा शुभारंभ
दिल्ली (३०/५/२०२५) : येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या इमारतीच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून पार पडला.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर, बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हा क्षण पक्षासाठी अभिमानाचा व भविष्यातील नवे क्षितिज उघडणारा ठरला आहे. एकसंध नेतृत्व, दृढ इच्छाशक्ती आणि पक्ष बांधणीच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल! असल्याचे मत रासप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर सारखा रांगडा माणूस दिल्लीत: हर्षवर्धन सपकाळ
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर सारखा रांगडा माणूस दिल्लीत: हर्षवर्धन सपकाळ
दिल्ली : दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर यांच्या सारखा रांगडा माणूस आज दिल्लीच्या तालकटोरा मैदानात अहिल्याबाई होळकर यांचा कार्यक्रम घेत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून हर्षवर्धन सपकाळ रासपच्या मंचावर उपस्थित होते.
श्री. सपकाळ म्हणाले, बहुजन हिताय बहुजन सुखाय, संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आमचे परममित्र महादेव जानकर साहेब यांची साथ घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे.
दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा आणि आज दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर सारखा रांगडा माणूस, तालकटोरा स्टेडियमध्ये कार्यक्रम घेतो, उर भरून आलेला आहे. जातीवादी विषाचा महाराष्ट्राला लागलेला कलंक जानकर साहेब महाराष्ट्रात आपल्याला केवळ हातात हात घेऊन भागणार नाही तर विचाराला विचार देऊन आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. जानकर साहेब, मैत्रीचा हात घेऊन, विचाराचा हात घेऊन मी आज आपल्यात उभा आहे.
अहिल्याबाई यांचा जीवनगौरव हा विचारांचा गौरव आहे. त्यांचा विचार भारत निर्माणसाठी महत्वाचा आहे. आज सामाजिक न्यायासाठी आरक्षण आहे, परंतु सगळीकडे आता शासकीय नोकऱ्या व अन्य क्षेत्रात खाजगीकरण होत आहे, खाजगीकरणात हे आरक्षणाची भागीदारी मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करावा लागेल.
दिल्लीवर रासपचे शासन आणणे हेच अंतिम लक्ष्य : महादेव जानकर
दिल्लीवर रासपचे शासन आणणे हेच अंतिम लक्ष्य : महादेव जानकर
![]() |
तालकटोरा मैदान दिल्लीतून मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर |
रासपतर्फे दिल्लीच्या तालकटोरा मैदानात महाराणी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी
दिल्ली (३१/५/२०२५) : समातामुलक समाजाची निर्मिती करण्यासाठी या देशावर राज्य करण्यासाठी दिल्लीवर शासन आणणे हेच अंतिम लक्ष्य असल्याचे, महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. दिल्लीच्या तालकटोरा मैदानात राष्ट्रीय समाज पक्षाने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त स्वराज महारॅलीचे आयोजन केले होते. यावेळी रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर बोलत होते.
महादेव जानकर दिल्लीतून भाषणात म्हणाले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मोहन जोशी, रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, दिल्लीचे वीरपाल, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर, छाया पाटील, राजदच्या सुशीलाताई मोराळे, लोकजनशक्ती पार्टीचे चौरसिया आणि देशभरातून आलेले भाऊ आणि बहीण, विचारवंत यांचे स्वागत.
![]() |
उपस्थित जनमाणसास हात उंचावून अभिवादन करताना डावीकडून एस. एल. अक्कीसागर, हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर, मोहन जोशी, काशिनाथ शेवते, अजित पाटील. |
श्री. जानकर पुढे म्हणाले, दोस्तहो, आजच्या कार्यक्रमासाठी हरियाणा, मध्यप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, दिल्ली, उत्तराखंड आदी राज्यातून निवडक लोक आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मी लोकांना पैसा काही दिला नाही, गाडीचे तिकिट दिले नाही. स्वतःच्या ताकदीवर हे लोक स्वाभिनाने आलेले आहेत. मी त्यांना धन्यवाद देईन. तुम्हाला वाटले असेल, राहुल जी, पवार साहेब, अखिलेशजी आले नाहीत, तुम्हाला सांगेन इंतजार का फल मिठा होता है! जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. जिस समाज का दल नहीं! उस समाज का बल नहीं!! तुमचे दल नसल्यामुळे या देशात तुम्ही बेदखल होता. आता दखल करण्याची वेळ आलेली आहे. मी ३० वर्षापूर्वी अकेला चला था! कारवा बनता गया! चार राज्यात आमच्या परतीला मान्यता मिळाली. महाराष्ट्रात चार आमदार जिंकले. गुजरात राज्यात २८ नगरसेवक जिंकले १ आमदार कमी मताने हरला. कर्नाटकात चांगले आहे. उत्तर प्रदेशात चांगले मते मिळवली. मध्य प्रदेशात पार्टीचा जनाधार वाढत आहे.
![]() |
दीपप्रज्वलन करताना रासप सर्वेसर्वा महादेव जानकर, महाराष्ट्र काँगेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मोहन जोशी, अत्तरसिंह पाल, राजद नेत्या सुशीलाताई मोराळे व अन्य. |
श्री. जानकर राजकीय भाष्य करताना म्हणाले, मागच्यावेळेस आम्ही एनडीए सोबत होतो. आमची मजबुरी होती. सपकाळ साहेब तुमची पार्टी त्यावेळी मोठी होती, त्यावेळी आम्हाला विचारत नव्हती, त्यामुळे आम्हाला काही वेगळे करावे लागले. आता आम्ही संघर्ष करू, संविधानवादी सरकार कसे येईल, यासाठी काम करू.
श्री. जानकर पुढे बोलताना म्हणाले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीची सुरुवात चोंडीत मीच केली होती. तिथेच राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणाही केली. तिथे महाराष्ट्र सरकार जयंती साजरी करायला लागल्यानंतर आम्ही चौंडी सोडून दिली. त्यानंतर आम्ही मुंबईत जयंती साजरी केली, तिथेही महाराष्ट्र सरकार जयंती साजरी करायला लागल्यानंतर, आम्ही दिल्लीत जयंती चालू केली. ज्या दिवशी केंद्र सरकार दिल्लीत अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करेल, त्या दिवशी मी अमेरिकेत जयंती साजरी करेन. केवळ जयंती साजरी करणे माझे ध्येय नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत भगवानबाबा यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या विचाराने चाललो आहोत. आम्ही महात्मा फुले यांना आयडॉल मानले आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, पुढील काळात आप आपल्या राज्यात पार्टीची ताकद वाढली पाहिजे.
![]() |
रासपच्या स्वराज महारॅली समवेत दिल्लीपर्यंत सारथ्य करणारे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना गोविंदराम शुरनर, एस. एल. अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे . |
आज सकाळी पत्रकारांनी विचारल्यावर सांगितले, मी एनडीए सोबत नाही, इंडियावाल्यांनी विचारले तर विचार करू असे सांगितले. आज राहुलजी, पवार साहेब, अखिलेशजी आले नाहीत म्हणून मी नाराज नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे आम्हाला खूप प्रवास करायचा आहे, देशावर राज्य करायचंय. अहिल्याबाई होळकर जयंती तो बहाणा है! दिल्ली मे शासन लाना मेरा आखरी निशाणा है! असे जानकर यांनी ठणकावून सांगितले.
ज्यावेळी मी चोंडीत जयंती चालू केली, त्यावेळेस आज साजरी करणारे विरोध करत होते, मला साथ देत नव्हते. २५ लोकांपासून जयंती चालू केली. जे आज साजरी करत आहेत, त्यावेळेस ते लोक विरोध करत होते. पहिल्यांदा तलवारधारी फोटो बनवला तर मला विरोध केला, त्यावर मी कमेंट दिली नाही. आज सर्वजण तलवारधारी अहिल्याबाई होळकर फोटो सर्वजण स्वीकारत आहेत. शिवलिंगधारी अहिल्याबाई पाहिजे, पण त्यासोबत ३० वर्ष या देशात राज्यकारभार केलाय, यासाठी मी दिल्लीच्या तालकटोरा मैदानात आलोय. समतामुलक समाज निर्माणासाठी अहिल्याबाई होळकर यांचा आदर्शवाद घेऊन चाललोय, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
जानकर पुढे म्हणाले, सकाळपासून लोक याठिकाणी येत आहेत. दिल्लीतील चारशे ऑटोवाले लोक आलेत, त्यांनाही धन्यवाद देईन. लाल किल्ल्यावरून भाषण देईच आहे. आम्ही प्रधानमंत्री बनलो नाही तर आमची डेड बॉडी कुठे जाती. यशवंतराव चव्हाण यांची डेडबॉडी कराडला गेली. आम्हाला राजघाटच्या बाजूला जागा मिळावी, इथेच अंत्यसंस्कार व्हावेत ही इच्छा आहे. सपकाळ साहेब, जोशी साहेब आम्ही तुम्हाला मदतीसाठी हात पुढे केलाय, तुम्ही हात द्या अगर न द्या एक दिवस आम्ही दिल्ली काबीज करणार हे आमचे मिशन आहे. मला समाजकारण राजकारण करायचे आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून मी बघतं आहे, ज्या समाजातून अहिल्याबाई होळकर घडल्या, त्या समाजातून एकही संसदेत खासदार निवडून आला नाही. कुणी तिकीटही दिले नाही. परंतु महादेव जानकरने तिकिट देणारी फॅक्टरी खोलली आहे. आम्ही आमच्याच तिकिटावर येण्याचा प्रयत्न करू. शिव्या देऊन काही होणार नाही, आमचा बुद्धीवर विश्वास आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचाराने राजकारण व्हायला पाहिजे. ज्यांनी आम्हाला धोका दिला, त्यांना आम्ही मोका आल्यावर हटऊ. तालकटोराचा इतिहास आहे. या ठिकाणी मल्हारराव होळकर, जिवाजी शिंदे आणि पेशव्यांनी दहा दिवस वेढा दिला होता, ही मराठ्यांची ऐतिहासिक भूमी आहे, म्हणून ठरवले महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती याच मैदानावर घेऊ, त्यात यशस्वी झालो. राष्ट्रीय समाज पार्टी देशात चांगल्या प्रकारे उभारेल, अहिल्याबाई होळकर यांचे विचार. देशभर घेऊन जाऊ. समाजातील विचारवंत यांचे आभार मानून जय हिंद जय भारत.
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त देशभरातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रेल्वे, बस, विमानाने प्रवास करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. ग्वाल्हेरहून जीवाराम बघेल यांनी खास माता भगिनीसंह बस, दोन चारचाकी दिल्लीत आणल्या होत्या. अहिल्याप्रेमी नागरिक, रासप सैनिकांच्या गर्दीने तालकटोरा स्टेडियम खचाखच भरले होते. राजे मल्हारराव होळकर यांच्या नंतर उत्तर भारतात सर्व भाषिक लोकांना जोडण्याचे काम महादेव जानकर यांनी केले. अहिल्याबाई होळकर यांनी तीन दशक आदर्श राजकारभार केला आहे. अहिल्याबाई होळकर यांची उपेक्षा झाली. पहिली जयंती महादेव जानकर यांनी चौंडीत साजरी केली. राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्लीवर राज्य करायचे आहे, म्हणून आम्ही आज दिल्लीत आलोय. आजच्या घडीला राष्ट्रीय समाज पक्ष, महादेव जानकर यांच्या सारखा सर्वात सुपर पक्ष व सुपर नेता दुसरा कोणी नाही. आम्हाला महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाला संसदेची सत्ता हस्तगत करायची आहे, आणि ती आम्ही मिळवू, असा विश्वास एस. एल. अक्कीसागर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
शरद पवार, राहुल गांधी, अखिलेश यादव गैरहजर
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेसचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. ३१ मे च्या कार्यक्रमास राहुल गांधीना घेऊन येऊ, असे शरद पवार यांनी कळविले असल्याचे रासपाच्या सूत्रांकडून यशवंत नायकला सांगण्यात आले होते. रासपाने मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसारही केला होता. मंचावर तिन्ही नेत्यांचे बॅनरवर फोटो झळकत होते. एकीकडे भाजपने देशभरात अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम घेतल्याने वरील नेत्यांना राजधानी दिल्लीत आयता रासपचा मंच मिळाला होता, मात्र अनुपस्थित राहिल्याने त्यांनी मोठी संधी गमावली.
लोहदा गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर पोहचले, पीडित कुटुंबीयांना केली एक लाख रुपयांची मदत
लोहदा गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर पोहचले, पीडित कुटुंबीयांना केली एक लाख रुपयांची मदत
कौशाम्बी (१८/६/२०२५) : उत्तर प्रदेशात कौशाम्बी जिल्ह्यातील लोहदा गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी कॅबिनेटमंत्री महाराष्ट्र हे पोहचले. सैनी कोतवाली क्षेत्रात येणाऱ्या लोहदा गावात पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना काल पोलिसांनी कलम १४४ लावून तेथे जाण्यास मज्जाव केला होता. आज महत्वपूर्ण घडामोडी पहायला मिळाल्या. लोहदा गावात ८ पोलीस ठाण्यातील फौजफाटा तैनात केला आहे. राखीव पोलीस बल, प्रांताधिकारी गस्त घालत आहेत. मात्र महादेव जानकर यांनी गनिमी काव्याने लोहदा गावात पीडित कुटुंबीयांना भेट देऊन, त्यांना धीर दिला. दिलेला चेक बालिकेच्या शिक्षणासाठी खर्च करा. तुमचे, तुमच्या कुटुंबाचे व गावाचे नाव रोशन करावे. पीडित बालिकेच्या नातेवाईकांना भेटून त्यांना मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांचा चेक देऊन शिक्षणासाठी मदत केली. पुढे चांगले शिक्षण द्या, प्रत्येक वेळी राष्ट्रीय समाज पक्ष तुमच्या सोबत असेल असा विश्वास श्री. जानकर यांनी पीडित कुटुंबीयांना दिला.करे।
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर!
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर!
पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना पोलिसांनी रोखले
प्रयागराज (१७/६/२०२५) : आज पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं. प्रयागराज विमानतळावरून कौशांबीकडे निघालेल्या महादेव जानकर यांचा ताफा पोलिसांनी अडवला. महादेव जानकर यांच्या दौऱ्याचा धसका घेऊन उत्तर प्रदेश सरकारने कलम 144 लागू केले. पीडित बालिकेच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना रोखण्यासाठी हजारो पोलिसांना रस्त्यावर उतरवले होते. महादेव जानकर यांनी प्रयगराज येथे स्थानिक कार्यकर्त्यांसोबत मीटिंग घेऊन पीडित कुटुंबीयांवर केलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांसह थेट रस्त्यावर उतरवून उतर प्रदेश सरकाच्या विरोधात निदर्शने केली. प्रयागराजच्या लाल गिरिजा घर चौकात पीडित कुटुंबीयांना न्याय द्या, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक मुर्दाबाद, योगी सरकारची तानाशाही नहीं चलेगी अशा प्रकारच्या जोरदार घोषणा दिल्या.
पक्षपाती कारभारावरून भाजपवर महादेव जानकर यांनी गंभीर आरोप केले. योगी आदित्यनाथ यांना कठोर शब्दात सुनावले तसेच ब्रिजेश पाठक यांच्या सांगण्यावरून पीडित कुटुंबावर अन्याय केल्याने तातडीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जिल्हा पोलिस अधीक्षकाचे निलंबन करावे. सदर घटनेची सीबीआय चौकशी करावी, असे मत श्री. जानकर यांनी स्थानिक वृत्तवाहीणीशी बोलताना केले.
अन्यायाविरोधात आवाज उठवणं हीच खरी समाजसेवा आहे! पीडितेला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे. श्री. जानकर यांनी प्रशासनाला कठोर कारवाईसाठी अल्टिमेटम दिला असून, दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “सामान्य माणसाच्या मुलीवर अन्याय होतो आणि सत्ताधारी गप्प राहतात, हे आम्ही खपवून घेणार नाही. समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक लढवय्याचे संघटनेचे आम्ही आभार मानतो. हा लढा फक्त एका मुलीसाठी नाही, तर प्रत्येक बहिणीसाठी आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एड. विवेक टायगर यांनी उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा इशारा दिला. यावेळी शेकडो राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Monday, June 16, 2025
उत्तर मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश
उत्तर मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश
मुंबई महिला आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष सचिवपदी रीमा मोहिते यांची वर्णी
मुंबई (१२/६/२०२५) : काही दिवसांवर येऊन ठेपलेली मुंबई महानगरपालिका निवडुकीत सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षानेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. आज सायंकाळी 5 वाजता दहिसर पश्चिम येथील आर के रोड, डेविड विल्ला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल यादव यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी रासप महाराष्ट्र प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे, रासप मुंबई महानगर कोषाध्यक्ष महावीर (आण्णा) वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर मुंबई जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. धडाकेबाज नेत्या रीमा मोहिते यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्यानंतर मुंबई महिला आघाडी सचिवपदी वर्णी लावत श्री. लेंगरे यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली. रीमा मोहिते यांच्या समवेत अली मोहम्मद शेख, नीलम सोलंकी, सुरेश जयसवाल, किशोर वाघरी, गणेश जैयसवाल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे हात बळकट करण्यासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन रणांगणात लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षात सर्वांना स्थान असून, सर्वापरि राष्ट्र मोठे मानून, राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या राष्ट्रीय समाज घटकाना राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.
उत्तर मुबई जिल्हा व्यापार आघाडी जिल्हाध्यक्षपदी अली मोहम्मद शेख, उत्तर मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ. नीलम सोलंकी, उत्तर मुंबई जिल्हा सचिव सुरेश जयसवाल, उत्तर मुंबई व्यापारी आघाडी जिल्हा सचिवपदी गणेश जैयसवाल, वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्षपदी किशोर वाघरी यांना राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; पनवेल तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; पनवेल तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन
पनवेल (१६/६/२०२५) : शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. राज्यात दिवसाला रोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे राज्यातील सरसकट शेकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्यांचे निवेदन पनवेल तहसीलदार श्री. पाटील यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आले.
निवेदनाची लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रासपने दिला आहे. निवेदनावर राज्य शाखेचे कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बलभिमशेठ सरक, माजी कळंबोली शहर अध्यक्ष अण्णासाहेब वावरे, रासपा नेते मच्छिंद्र मोरे, युवा नेते नारायण वीरकर, युवा नेते अंकुर जरग यांच्या सह्या आहेत.
Monday, May 26, 2025
मुंबईत सावधानतेचा इशारा ! पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार
मुंबईत सावधानतेचा इशारा ! पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार
मुंबई : (26/5/2025) | दिनांक रविवार 25 मे 2025 रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला खरा. पण, त्याआधीपासून राज्यात पावसाचा मारा मात्र सुरूच होता आणि मुंबईसुद्धा या माऱ्यापासून बचाव करु शकली नाही. रविवारपासूनच शहरात सुरु असणारी संततधार दिवस मावळतीला गेल्यानंतर मुसळधारीमध्ये रुपांतरीत झाली आणि रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणु उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला.
शहरातील सागरी किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, तर पश्चिम उपनगरांसह ठाणे आणि शहरालगत असणाऱ्या पालघरलाही पावसानं झोडपलं.
मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात पावसानं
26 मे 2025 रोजी सकाळी 6 ते 7 या कालावधीत मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली. यानंतर आय हॉस्पिटल (ग्रँट रोड) येथे 36 मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र आणि सी वॉर्ड कार्यालय येथे 35 मिमी, कोलाबा अग्निशमन केंद्र येथे 31 मिमी, बी वॉर्ड कार्यालय येथे 30 मिमी, मांडवी अग्निशमन केंद्र येथे 24 मिमी, भायखळा अग्निशमन केंद्र येथे 21 मिमी, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर येथे 18 मिमी आणि नायर हॉस्पिटल येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली.
याशिवाय, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पावासाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार असून सोसाट्याचे वारेही वाहतील असा इशारा देत हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वसईच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा; समुद्र खवळला, लाटांचे फटकारे, दहा मिनिटांत होत्याचे नव्हते
वसईच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा; समुद्र खवळला, लाटांचे फटकारे, दहा मिनिटांत होत्याचे नव्हते
वसई, 25/5/2025|आधीच अवकाळीने दाणादाण उडालेल्या वसईच्या किनारपट्टीला वादळी वाऱ्यांचा जबरदस्त तडाखा बसला. घोंघावत आलेला प्रचंड वारा आणि त्याच्या जोडीला मुसळधार पाऊस यामुळे अर्नाळा किल्ला परिसरात दाणादाण उडाली.
अनेक घरांचे पत्रे, छपरे, कौले उडून गेली. समुद्र खवळल्याने अवघ्या 10 मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. वादळी पावसाच्या तडाख्याने घरांची पडझड होऊन 12 कुटुंबे रस्त्यावर आली असून डोक्यावर वादळी पाऊस आणि डोळ्यात पाणी अशी या गरीब मच्छीमार कुटुंबांची अवस्था झाली आहे.
चार दिवसांपासून वसई, विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. शुक्रवार, शनिवारी अर्नाळा किनारपट्टीला जोराच्या वादळी वाऱ्याने तडाखा दिला. किनाऱ्याजवळच्या घरांना याचा मोठा फटका बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. मंदिराजवळील ध्वज खांबही वाकला. समुद्र खवळल्याने लाटांचे तडाखेही जोराने बसले. याचा 12 घरांना फटका बसला. वसई तहसील विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असल्याची माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली.
मुरुडमध्ये शक्ती वादळ धडकले
मुरुड – दक्षिण कोकण किनाऱ्यावर शक्ती वादळ धडकले. मुरुडसह नांदगाव, मजगाव, बोर्ली -मांडला परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले.
मासळी भिजली-कुजली
अर्नाळा किल्लात कोळी बांधवांची 435 घरे आहेत. अवेळी आलेल्या पाऊसाचा फटका सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या शेकडो कोळी बांधवांना बसला. सुकवण्यासाठी ठेवलेली पापलेट, सुरमई, बोंबील, मांदेली भिजून कुजली आणि तिचा अक्षरशः चिखल झाला.
Sunday, May 25, 2025
'चंबळ का शेर' जीवाराम बघेल ग्वाल्हेर मध्ये
राष्ट्रीय समाज पक्षाचा 'चंबळ का शेर' ग्वाल्हेर मध्ये
31 मे स्वराज महारॅली समर्थनार्थ दिल्लीकडे रवाना
मुंबई (२५/५/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे धुरंदर नेते अर्थातच चंबळ का शेर जीवाराम बघेल आज राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित 31 मे अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव दिल्लीसाठी रवाना झाले. ग्वाल्हेर मध्ये ते पोहचले आहेत. ग्वाल्हेर मधील समर्थकांना घेऊन ते लवकरच दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती यशवंत नायकशी बोलताना दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेवजी जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने दिल्लीला यावे, असे त्यांनी आवाहन केले.
Saturday, May 24, 2025
राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच
राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सीमा ओलांडून हरियाणा राज्यात प्रवेश
-
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर! पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना प...
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदनशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना ...
-
छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;* *स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - ग...