राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन ग्वाल्हेर येथे आयोजित : अशोककुमार बघेल
![]() |
पत्रकार परिषदेत बोलताना मध्य प्रदेश प्रधान सचिव अशोककुमार बघेल, बाजूस अर्चनासिंह राठोड, रणवीरसिंग चौहान. |
राष्ट्रीय अधिवेशनास देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार
भिंड (१३/८/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन २९ ऑगस्ट २०२५ रोजी ग्वाल्हेर येथे मानस भवन फुलबाग येथे आयोजित केला आहे, देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे मध्य प्रदेश महासचिव अशोककुमार बघेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगदीश मेरीज गार्डन येथे राष्ट्रीय समाज पक्षाने पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. यावेळी ग्वाल्हेर लोकसभा रासप उमेदवार इंजी. अर्चनासिंह राठोड, लोकसभा प्रभारी रणवीर सिंह चौहान, कॅप्टन राजेश्वर यादव, प्रदीपसिंह बघेल, राकेश सिंह बघेल, पुरुषोत्तम बघेल, छोटू बघेल, बंटी बघेल उपस्थित होते.
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंड येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे अभिवादन करण्यात आले. श्री. बघेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन देखील पार पडणार आहे. देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षात सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. हर हर महादेव - घर घर महादेव नारा देऊन कार्यकर्ता लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवत आहेत. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात शेतकरी, कामगार, शोषित, युवक, सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. ग्वाल्हेर क्रांतिकारकांची भूमी आहे. सर्व नागरिकांनी पक्ष वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कु. अर्चना सिंह राठोड म्हणाल्या, मत चोरी होणे ही लोकशाहीची हत्या आहे. उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मत कार्डला आधार कार्ड लिंक करावे.
No comments:
Post a Comment