Friday, August 22, 2025

करैरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जागरुकता रॅली

करैरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जागरुकता रॅली 

शिवपुरी (२०/७/२५) : सर्वसामान्यांना पिळवणूक करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करत मध्यप्रदेशातील करेरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती रॅली काढली. सर्वांना एक शिक्षण, मोफत आरोग्य सेवा, शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांना खते, बियाणे मोफत पुरवावीत, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आदी मागण्यावरून राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती रॅली काढली. राम राजा गार्डन येथे रॅलीची सांगता सभा झाली.  यावेळी पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमाची चर्चा, काँग्रेस भाजप पक्षात नाराज असलेल्या लोकांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या अधिवेशनसाठी प्रभारी म्हणून प्रदेश प्रधान महासचिव अशोक बघेल, सहप्रभारी कु. अर्चना राठोड, डी. एस. चौहान, मोहरसिंह केवट यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. काँग्रेसचे नगरसेवक सरवन आदिवासी, चंदेल खान, प्रजापती यांनी महादेव जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय समाज पक्ष प्रवेश केला. 

जनजागृती रॅलीत सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. करैरा येथील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या रॅलीत मध्यप्रदेश राज्य प्रदेश प्रभारी प्राण सिंह पाल, प्रदेशाध्यक्ष श्रीलाल बघेल, प्रदेश सचिव बादामसिंह, रणवीर चौहान, सोनू पुरोहित, शिवपुरी जिल्हाध्यक्ष मोहब्बतसिंह पाल, रामकृष्ण विश्वकर्मा, भूपेंद्र गुप्ता, रामगोपाल जाटव, के. पी परिहार, रामपाल, करेरा शहराध्यक्ष डॉक्टर मुकेश कोहली, कुसुम जोशी, अवंतीबाई लोधी, राजकुमारी वर्षा पाल, मीराबाई कोहली, सुनिता पाल, राणी साहू, कमलेश वाल्मीक, सत्यम आदिवासी, मानसिंह पाल, देवीलाल जाधव, मुकेश पाल, धर्मेंद्र कुशवाहा यांच्यासह शिवपुरी, अशोक नगर, ग्वालियर, दतिया, भिंड, मुरेना येथील पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...