Saturday, August 30, 2025

गुलाब पुकळे यांचे निधन ! गजी नृत्याचा कलाकार हरपला

गुलाब पुकळे यांचे निधन ! गजी नृत्याचा कलाकार हरपला

श्री. गुलाब दाजी पुकळे यांचे काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुकळेवाडीतील गजी नृत्याचा कलाकार हरपला. काही दिवसांपूर्वी त्यांचा कनिष्ठ चिरंजीव लक्ष्मण पुकळे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर श्री. गुलाब दाजी पुकळे यांचे मुंबईत रूममध्ये केलेले बाहारदार गजी नृत्य पाहून अनेकजण भारावले. त्यांच्याबद्दल अनेकांनी त्यावर भरभरून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मीही त्यावर माझे मत व्यक्त केले. 

गुलाब पुकळे यांचा खरा परिचय झाला, तो रेठरे कारखाना परिसरात मेंढरामागे. कारण त्याच दरम्यान कधीतरी त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव दाजी हा परागंदा झाला होता. त्याचा खूप शोध घेतला गेला, पण तो अद्याप मिळाला नाही.

गुलाब पुकळे यांना अफाट बुद्धीमत्ता लाभली होती. त्यांना बोलता येत नसले तरी, अगदी लहान मुलाला देखील चटकन समजेल, अशा सोप्या भाषेत एखादी गोष्ट सांगण्यात ते तरबेज होते. गावगाड्यातील सर्वांना ते ओळखायचे. लहान थोर सर्वांची माहिती त्यांना असायची. प्राण्यांबद्दल त्यांना आपुलकी होती.  चुकीची गोष्ट आपण करत असू तर त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला सावध करायचे. गुलाब पुकळे यांच्याबद्दल श्रद्धांजली लेख लिहावा यासाठी प्रा. आनंद पुकळे सर यांचे फोनवर बोलणे झाले. त्यांनीही गुलाब पुकळे यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पुकळेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून हळहळव्यक्त होत आहे. गुलाब पुकळे  यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!

💐

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...