शेतकरी हक्क परिषदेत रासपचे अजित पाटील म्हणाले, रामाचं नव्हे तर बळीचं राज्य हवे
पुणे (८/८/२५) : रामाचं नव्हे, तर बळीचं राज्य हवे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील यांनी शेतकरी हक्क परिषदेत मांडले. स्वाभिमानी शेतकरी संघटचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील, भारतीय किसान सभेचे अजित नवले, शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.
परिषदेतल्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस श्री. अजित पाटील बोलताना म्हणाले, "आपले युवक दिवसभर शेतात राबत असले तरी त्यांच्या उत्पन्नाची स्थिती समाधानकारक नाही. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यांकडे वळणे गरजेचे आहे. दूध उत्पादन, रेशीम शेती, मधमाशी पालन यांसारख्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही." श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जप्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. CIBIL स्कोअरच्या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. "कर्ज देताना या अटी रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे."
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पाटील म्हणाले, "राज्यात लोकशाही जिवंत नाही, विरोधी पक्षनेता निवडलेला नाही, हे दुर्दैवी आहे." "स्वयंसहाय्यता गट फक्त बचत करण्यापुरते नकोत, तर त्यातून व्यवसायवृद्धी व्हावी. महिलांना मार्केटिंग आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण मिळावे, त्यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा होईल. रामाचं नव्हे, तर बळीचं राज्य हवे.
No comments:
Post a Comment