गेवराईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शिबिर; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
गेवराई (१५/८/२५) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे मार्गदर्शन शिबिर व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. नव उद्योजक कार्यकर्त्यांना सन्मानित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्ष हा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धर्तीवर चालत आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे. जानकर साहेबांच्या विचारानुसार आम्ही नऊ उद्योजकांना सन्मानित केले आहे. समाजामध्ये अनेक तरुण उद्योजक झाले पाहिजेत, अनेक तरुण क्लास वन अधिकारी झाली पाहिजेत, अनेक तरुण आमदार खासदार झाले पाहिजेत ही शिकवण जानकर साहेबाची आहे .
जानकर साहेबांकडे दूरदृष्टी आहे आणि समाजात येणारे संकट त्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्य तरुणास प्रेरित करून स्वतःच्या पायावर उभा रहा असे सांगत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष ताकतीने उतरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण संघटन बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. अनेक तरुण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उभा राहण्यास तयार आहेत आणि काम करण्यासही तयार आहेत.
मार्गदर्शन शिबिरास प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, लोकसभा अध्यक्ष विक्रम सोनसळे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष भगवान माने, साईनाथ विग्ने, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष काशीद परशुराम,युवक जिल्हाध्यक्ष केदार मधुकर, शिवाजी चांगण आदी उपस्थित होते. अविनाश काकडे (तालुकाध्यक्ष), बालाजी सातपुते (तालुका अध्यक्ष), अशोक हप्ते (विधानसभाध्यक्ष), कृष्णा धापसे (युवकाध्यक्ष), शंकर गायकवाड (चकलांबा सर्कल प्रमुख) यांना नियुक्ती देण्यात आली.
No comments:
Post a Comment