मध्य प्रदेश रासप प्रधानसचिपदी अशोक सिंह बघेल यांची नियुक्ती
भोपाळ (१६/७/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष मध्य प्रदेश राज्य प्रधान सचिवपदी अशोकसिंह बघेल यांची नियुक्ती केल्याचे, यशवंत नायकशी प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले. अशोक सिंह बघेल हे भिंड जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करण्यापूर्वी श्री. बघेल हे आर्थिक समानता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात ते सक्रीय होते. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक सिंह बघेल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेश अध्यक्ष श्रीलाल बघेल, प्रदेश उपाध्यक्ष डी. एस. चौहान, प्रदेश सचिव मोहर सिंह केवट, बादाम सिंह बघेल, ग्वाल्हेर लोकसभा प्रभारी रणवीरसिंह चौहान, मिठ्ठनलाल वंशकार, रामकृष्ण विश्वकर्मा, हकिमसिंह रावत, मोहब्बत सिंह पाल, सोनू पुरोहित, प्रकाशसिंह बघेल, केपी परिहार, अनिश रघुवंशी, प्रताप बघेल, ज्ञानसिंह पाल, डॉक्टर मुकेश कोहली, ब्रिजेश प्रजापती, धर्मेंद्र कुशवाहा रवी रजक आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment