रासपच्या कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती
मुंबई (१५/७/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी बंगळुरू येथील डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी दिली. डॉ. रेणुका यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र श्री. जोगीन यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. रेणुका होराकेरी या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात, त्यांना "ब्यूटी विथ अ ब्रेव्ह हार्ट" म्हणून ओळखले जाते. त्या मिसेस इंडिया २०२० च्या उपविजेत्या आहेत. डॉ. रेणुका यांनी राजाजीनगर येथील एमईआय पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यांना महिला अचिव्हर्स पुरस्कार, वॉरियर्स पुरस्कार, कर्नाटक हेम्मे पुरस्कार, बंगळुरू महिला शक्ती पुरस्कार, श्री विश्वेश्वरय्या पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्कार, चिन्नाडा बेटे सीझन २ (कस्तुरी वाहिनी) येथे सुवर्ण आदि पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
डॉ. रेणुका होराकेरी यांची युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांची राष्ट्रीय समाज पक्षातून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला आहे. भारतात महिलांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या सर्वजण कल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्शवाद घेऊन चालणारा पक्ष आहे. डॉ. होराकेरी यांना राष्ट्रीय समाज पक्षात काम करण्याची मोठी संधी दिली आहे, त्या कशा पद्धतीने काम करतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment