Saturday, July 19, 2025

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर 

मुंबई : नाव गरीबांचे घ्यायचे आणि काम श्रीमंतांचे करायचे हे सरकारचे धोरण आहे, राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्य सरकारला फटकारले. श्री. महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी आपली भूमिका स्पष्ट केली.

श्री. मराठीच्या मुद्द्यावरून जानकर म्हणाले, आपल्याला सर्व भाषा आल्या पाहिजेत, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. जगात फिरण्यासाठी इंग्लिश आले पाहिजे. देशाचे राजकारण करण्यासाठी, दिल्लीवर सत्ता करायची असेल तर आपल्याला हिंदी आली पाहिजे. प्राथमिक शिक्षण नंतर हिंदी आणि इंग्रजी भाषा अभ्यासक्रमात असावी. न्यायालयात सर्व निवाडे मराठीतून नाहीत तर इंग्लिश मधून आहेत. जागतिक स्पर्धेत आपली मुले टिकली पाहिजेत, ही रासपची भूमिका आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जानकर म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेला वादा सरकारने पुरा करावा. मोठमोठ्या उद्योगपतींना बिल्डरला पैसे द्यायला आहेत. शेतकऱ्याला द्यायला नाहीत. हे सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. नाव घ्यायचे गरीबांचे, काम श्रीमंतांचे करायचे हे सरकारचे धोरण आहे. यावर जनतेने विचार करावा. एमपीएससी आणि युपीएससी करणारे विद्यार्थी परेशान आहेत. कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत. सर्वांना परेशान करून ठेवलेले आहे, वरून दाखवतात सर्व चांगले चालले आहे, पण असे काही नाही. आम्ही बांधावर फिरणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जनतेत फार आक्रोश निर्माण झालेला आहे. जनतेच्या असंतोषाला वाट करून देणे आमचे काम आहे. शेतकरी शक्तिपीठ नको, म्हणतात तर ते कॅबिनेटमध्ये पास केला, हे कितपत अन्याय करणार आहेत. मनी, मिडिया आणि माफिया यांच्या जोरावर चालले आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नसते. महाराष्ट्र ही फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. निश्चितपणे उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान सरकारच्या विरोधात लढणार आहे.

No comments:

Post a Comment

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर  मुंबई : नाव गरीबांचे घ्यायचे आणि का...