शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
मुंबई (२३/६/२०२५) : शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करा या मागण्यांचे राज्यातील तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजलेपासून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, सातबारा कोरा करा, अशा मागण्यासाठी राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरत सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी सह अन्य आश्वासने पाळावीत, राज्यातील सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. केवळ समित्या नेमायच्या वल्गना करून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे राज्यातील फसवे सरकार असल्याचे टिकास्त्र सोडले. रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या नेतृत्वात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास राज्यभरात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्री. शेवते यांनी दिला.
सोलापूर, बीड, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, अहिल्यानगर , छत्रपती संभाजी नगर, रायगड, मुंबई, नाशिक, अकोला, बुलढाणा, पुणे, धाराशिव, सिंधुदुर्ग आदी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले, शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करा अशी जोरदार घोषणाबाजी, निदर्शने केली. धनदांडग्या उद्योगपतींची कोणतीही आंदोलन मोर्चे न काढता कर्जेमाफ करता, मग शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आंदोलन, मोर्चे का काढावे लागते, असा बोचरा सवाल श्री. शरद दडस यांनी अलिबाग येथे यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलताना केला.
No comments:
Post a Comment