Sunday, September 28, 2025

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत करा : महादेव जानकर

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत करा : महादेव जानकर 



मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा; नांदेड, हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातून जानकरांची मागणी

नांदेड : राज्य सरकारने मुंबई पुण्यातील प्रोजेक्ट थांबवून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेतली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.  आज (दिनांक २८ ) सकाळ पासून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तोसीफ शेख, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.  

महादेव जानकर साहेब यांनी कंधार तालुक्यातील तेलुर व कवठा, मुखेड तालुक्यातील चिवळी आणि लोहा तालुक्यातील गोळेगाव भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत श्री. जानकर म्हणाले, शेतकऱ्यांना एकरी ₹५०,००० रुपयेची मदतीची घोषणा करावी, माती वाहून गेलेल्या क्षेत्रांना विशेष भरीव मदत द्यावी, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

नांदेड जिल्हा दौरा करून हिंगोली जिल्हा दौऱ्याकडे रवाना झाले. महादेव जानकर यांनी गिरगांव जि. हिंगोली येथे पूरग्रस्त व अतिवृष्टी भागाची भेट घेतली. अनेक गावात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना, शासनाचे महसूल कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने महादेव जानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...