माण तालुक्यात रासपची गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाची मोहीम
दहिवडी (१/९/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांच्या नेतृत्वात यावर्षीचा गणेश उत्सव हा पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेत साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. दिनांक 30 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी माण तालुक्यातील गणेश मंडळास वृक्षारोपणासाठी रोपे भेट देण्यात आली. खुटबाव, मोही, ठोंबरेवाडी, शिंगणापूर, थदाळे, वावरहिरे, डंगिरेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, राजवडी या गावातील गणेश मंडळांना वृक्ष वाटप करण्यात आले. यापूर्वी शरद दडस यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद येथील शाळांना विद्यार्थ्यांना शालेपयोगी वही, पेन सारखे साहित्य वाटप केले होते. आताही त्यांनी गणेश उत्सवात पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेऊन चांगला उपक्रम राबवला आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कालिदास गाढवे यांनी व्यक्त केले.
यावेळी रासपचे माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे, युवक तालुका अध्यक्ष तात्याराम दडस, प्रवचनकार प्रतीक भोसले, किशोर जगदाळे, लखन खुस्पे, गणेश दडस, आयुष्य दडस, विकास पवार, गौरव साळुंखे, मधुकर अवघडे, ओंकार चौगुले, आकाश मेनकुदळे, अजिंक्य शिंगाडे, तसेच सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश मंडळांनी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केल्यास तीन वर्षानंतर त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊ, असे शरद दडस यांनी जाहीर केले. वृक्षाची लागवड करणे हे शाश्वत काम आहे, त्यामुळे सर्वांना ऑक्सिजन मिळतो. पर्यावरणाचे रक्षण होऊन ममाण तालुक्यासारख्या प्रजन्यछायेच्या भागात वृक्ष लागवडीमुळे पावसाचे देखील प्रमाण वाढू शकते.
No comments:
Post a Comment