राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला : काशिनाथ शेवते
भिवडीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
पुरंदर (७/९/२५) : देशाच्या इतिहासात भिवडी येथे पहिली जयंती साजरी करून, राजे उमाजी नाईक यांचा खरा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला असे प्रतिपादन, राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे अभिवादन करण्यात आले.
श्री. शेवते म्हणाले, उमाजीराजे नाईक यांची पहिली जयंती महादेव जानकर यांनी साजरी केली. सुरुवातीच्या काळात येथे घाणीचे साम्राज्य होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी येथील ऊर्जास्थळाची स्वच्छता केली. हे ठिकाण जागृत केले. राजे उमाजी नाईक यांची प्रेरणा घेऊनच राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकाळ सुरू झाला. राजे उमाजी नाईक जयंतीच्या निमित्ताने रामोशी समाजात जागृती निर्माण होत आहे. आज शासन जयंती उत्सव साजरा करतेय, हाच आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. उपेक्षित समाजाचे महानायक प्रकाशझोतात आणण्याचे काम महादेव जानकर यांनी केलेले आहे. यापुढेदेखील राजे उमाजी नाईक यांचे काम महाराष्ट्रभर व्यापक पद्धतीने पुढे नेऊ.
रासपचे सरचिटणीस अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी राजे उमाजी नाईक यांचा विजय असो ! राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो !! अशा घोषणा दिल्या. यावेळी राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजित पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुनिताताई किरवे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे, पुणे शहर संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष परमेश्वर बुर्ले, पुणे शहर अध्यक्ष संतोष शिंदे, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे, तात्याराम दडस,रासेफचे महावीर सरक आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment