माणमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंतांना संधी देणार : इंजि. दादासाहेब दोरगे
![]() |
मुंबई (१५/१०/२५) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे, मत रासपचे सातारा जिल्हाउपाध्यक्ष इंजि. दादासाहेब दोरगे यांनी व्यक्त केले. श्री. दोरगे हे यशवंत नायक'शी बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला गेलेल्या लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन केले.
श्री. दोरगे पुढे म्हणाले, माण तालुक्यात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत अनेक मोठ्या समस्यांचा डोंगर आहे. शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. अतिवृष्टीने छोटे मोठे व्यावसायिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, नुकसानग्रस्तांना वंचित ठेवणे किंवा किरकोळ मदत देण्याचे काम शासन करत आहे. सोलापूर, सांगलीच्या मार्केटमध्ये कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नसल्याने माण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत. अनेक शासकीय कार्यालयात खासगी लोकांची सुळसुळ असून, अनेक शासकीय योजनांचा लाभ गरजू पर्यंत मिळत नाही. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे. गावटगे मार्फत लोकांची दिशाभूल सुरू आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून म्हसवड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत, माण पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊ. जनतेचे प्रश्न हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरू, असे श्री. दोरगे यांनी स्पष्ट केले.
Mahadev Jankar Official Dadaso Dorage #zpelection #mhaswad #nagarpalika #satara #manpanchayatsamiti
No comments:
Post a Comment