महादेव जानकर यांच्या पक्षास मजबुत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज सत्ताधारी बनू शकत नाही : सिद्धपा अक्कीसागर
हैदराबाद (११/१०/२५) : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि कार्यकर्त्यास मजबूत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज्याच्या हाती सत्ता येणार नाही. सत्ता नसेल तर समाजाच्या समस्या सुटणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धपा अक्कीसागर यांनी केले. श्री. अक्कीसागर तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आर्टस कॉलेज महबूबानगर, हैदराबाद येथे तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीचे आयोजन केले होते.
श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, जोपर्यंत बुद्धिजीवी वर्ग आपल्या उपेक्षित समाजवर्गासाठी मदत करणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समाजाच्या समस्या सुटणार नाहीत. बुद्धिजीवी वर्गाने पुढे येऊन समाज ऋण फेडण्याची आवश्यकता आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी तन मन धनाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू इच्छितो. तेलंगणा राज्यात सत्ता ताब्यात घेण्यासाठी गावा गावात बूथ पर्यंत पक्षाचे राजकीय संघटन मजबूत केले पाहिजे.
यावेळी तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रमाकांत करगतला, प्रदेश उपाध्यक्ष रमेश दोडामणी, प्राचार्य राम शेफर्ड, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पांडू कोंनगला, रमेश कुरमा, रासेफचे मदनेश्वर शुरनर, सूर्यकांत गुंडाळे व अन्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment