Thursday, January 30, 2025

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारणार

मुंबई 30/1/2025 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारेल, असा विश्वास राष्ट्रीय समाज पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला. काल सायंकाळी 7 वाजता गोवंडी येथील वैभवनगर येथे ईशान्य मुंबई जिल्हा व दक्षिण मध्य मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाने आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच पक्षाचा संघटनात्मक विस्तार करून नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आली. मनोगत व्यक्त करताना सर्वच आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने पक्षाचे काम वाढवण्याचा निर्धार केला. आढावा बैठकीचे आयोजन ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश डांगे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव महेश बोडके यांनी केले होते. 

मुंबई प्रदेश कोषाध्यक्षपदी रासपचे एकनिष्ठ सैनिक महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई कामगार आघाडी सचिवपदी तुकाराम पाटील, मुंबई महिला आघाडी सचिवपदी बायाक्का उर्फ विद्या दुधाळ, विक्रोळी विधानसभा अध्यक्षपदी हेमंत पवार, मानखुर्द महिला आघाडी तालुकाध्यक्षापदी मंदाताई जानकर, विक्रोळी महिला आघाडी तालुकाध्यक्षापदी सविता आहिरे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निखिल गायकवाड, ईशान्य मुंबई युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी विजय जैयस्वार, मानखुर्द शिवाजीनगर वाहतूक आघाडी तालुकाध्यक्षपदी मोहन करडे, मानखुर्द महिला आघाडी तालुका उपाध्यक्षपदी वनिता देवळे, चेंबुर महिला आघाडी तालुकाध्यक्षापदी आरती वाडेकर, घाटकोपर पूर्व तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी सुनील झोरे, 153 महिला आघाडी वार्ड अध्यक्ष मंदा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 

बैठकीसाठी सामाजिक नेत्या वनमाला खरात, दक्षिण मध्य मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वातीताई जमदाडे, शिवाजीनगर मानखुर्द तालुकाध्यक्ष समीर खान, चेंबुर विधानसभा अध्यक्ष अभय धारपवार, संभाजी भूसनर आदी उपस्थित होते.

आढावा बैठक व पद नियुक्ती प्रसंगीचे क्षणचित्रे 






















वृत्त व छायाचित्र संकलन : पी आबासो, मुंबई 

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025