Thursday, January 2, 2025

राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी शिवलिंगप्पा जोगीन यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी शिवलिंगप्पा जोगीन यांची नियुक्ती

Shivlingappa Jogin 
 Incharge Karnataka RSPs

बेंगलोर :  राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी शिवलिंगप्पा जोगीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. जोगीन बेंगलोरचे रहिवाशी आहेत, गत २५ वर्षापासून स्थानिक इलेक्ट्रोनिक कंपनीसोबत काम करतात. गदग जिल्ह्याचे ते भूमिपुत्र आहेत. श्री.जोगीन हे तरुण तडफदार युवा नेते आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे पाळेमुळे राज्यभर रुजवतील.कर्नाटक प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. जोगीन यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे आभार व्यक्त केलेत. 'यशवंत नायक'शी बोलताना श्री. जोगीन म्हणाले, पक्षाध्यक्ष महादेव जानकर, एस. एल. अक्कीसागर यांच्या सोबत भेट व्हायची. कर्नाटकात राष्ट्रीय समाज पक्ष पक्षाला अपेक्षित यश मिळालेली नाही. माझ्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यभरात संघटन बांधणीची जबाबदारी सोपवलेली आहे. कितीही आव्हाने असली तरी राष्ट्रीय समाज पक्षाने दिलेली जबाबदारी निभवू, असा विश्वास व्यक्त केला. 

श्री. जोगीन यांच्याकडे जबाबदारी मिळताच गदग, कोप्पल, दावनगेरे, शिवामोग्गा, नेलमंगला (बेंगलोर ग्रामीण), विजयनगर, चीत्रदुर्ग, कोलार, म्हैसुर, तुमकुर जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती यशवंत नायकशी बोलताना श्री. शिवलिंगप्पा जोगीन यांनी दिली. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याचे संकेत कर्नाटक रासप नेते धर्मांन्ना तोंटापुर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...