Saturday, January 18, 2025

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आज रायगड जिल्हा दौऱ्यावर

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आज रायगड जिल्हा दौऱ्यावर



#mahadevjankar_raigad_tour  #rashtriyasamajpaksha #tour2025 #maharashtra 

नवी मुंबई (१८/१/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या दिनांक १८ जानेवारी २०२५ वार शनिवार रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर येणार आहेत, अशी माहिती रासपचे माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी 'पत्रकरांशी' बोलताना दिली. 


पेण येथे जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांनी धनगर समाज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजीत केले आहे. स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून अहिल्यादेवीनगर पेण - बोरगाव रोड तालुका - पेण जिल्हा - रायगड येथे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर धनगर समाज भवन पेण तालुका' या वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार आहे.  दुपारी ४ : ००  वाजता पेण येथे श्री. महादेव जानकर यांचे आगमन होईल, तरी राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी/ कार्यकर्ते/राष्ट्रीय समाज बांधव, हितचिंतकानी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. दडस यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क: संतोष(तात्या) ढवळे- धनवीकर, कोकण नेते रासप मो.9757065600


रायगड जिल्ह्यातील नियोजीत दौरा पार पडल्यानंतर महादेवजी जानकर साहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर रवाना होतील.


रासप केंद्रिय कार्यालयाकडून कळविण्यात आलेला नियोजीत दौरा पुढीलप्रमाणे 

महाराष्ट्र राज्य 

18 जानेवारी  पुणे जिल्हा रवाना>>

19 जानेवारी 2025 शिरूर जिल्हा पुणे दौरा

20 जानेवारी 2025 इंदापूर जिल्हा पुणे दौरा 

21 जानेवारी 2025 राहुरी जिल्हा अहिल्यानगर दौरा

23, 24 जानेवारी 2025 कोल्हापूर जिल्हा दौरा 

कर्नाटक राज्य 

25, 26 जानेवारी बेळगाव जिल्हा कर्नाटक दौरा

संपर्क: श्री.धर्मांन्ना तोंटापुर - मो. 8861267886, श्री. शिवलिंगप्पा जोगीन - मो. 9916333308

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...