Saturday, January 18, 2025

रासप तर्फे नंदगड येथे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

रासप तर्फे नंदगड येथे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

मुंबई  :  राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी तर्फे 'आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना' राष्ट्रीय राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन नंदगड ता - खानापूर जिल्हा बेळगाव येथे केले असल्याची माहिती रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना दिली आहे. सन २००८ सालापासून येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यक्रम घेत आहे. २०२५ हे संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचे १७ वे वर्ष आहे. संगोळी रायन्ना समाधीस्थळी पहाटे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या शुभहस्ते राज्याभिषेक कार्यक्रम पार पडला जातो.  देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता फाशीस्थळावर जाऊन अभिवादनाचा कार्यक्रम पार पडतो. राष्ट्रीय राज्याभिषेक कार्यक्रमास देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी, तसेच विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संगोळी रायन्नाप्रेमी देशाभिमानी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सुशील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...