Monday, January 20, 2025

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सवाची रासपकडून जय्यत तयारी

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सवाची रासपकडून जय्यत तयारी 

२६ रोजी संगोळी रायन्ना समाधीस्थळी महादेव जानकर सहित देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार  : शिवलिंगप्पा जोगीन

बेळगाव (पी. आबासो) : दरवर्षीप्रमाणे नंदगड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथे आद्य स्वातंत्र्यवीर तथा स्वराज्य नायक राष्ट्रवीर संगोळी रायन्ना १७ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक l राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष रा-सेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, विशेष अतिथी आमदार विठ्ठल हलगेकर कर्नाटक विधानसभा सदस्य खानापूर उपस्थित राहणार आहेत.


सन्माननीय अतिथी म्हणून रासपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर, बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के प्रसन्नाकुमार (केरळ), राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राष्ट्रीय सचिव एम.जी माणिशंकर (तमिळनाडू), हेमंत पंड्या (गुजरात), राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चंद्रपाल (उत्तर प्रदेश), ईशान्य भारत प्रभारी डॉक्टर मनोज निगडकर, गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काशिनाथ शेवते, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक, मध्यप्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, मध्यप्रदेश राज्य अध्यक्ष श्रीलाल बघेल, आसाम प्रदेशाध्यक्ष गोपाल कहार, तेलंगणा प्रभारी रमाकांत करगटला, दिल्ली प्रभारी श्रीमती हेमलता पाल, उत्तर प्रदेश प्रभारी श्रीकांत गुरुजी, पश्चिम बंगाल प्रभारी महेश पॉल, मणिपूर संघटक प्रा. जॅक्शन खुमुकचम, तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष जी लायन राजा, मेघालय युवा प्रदेशाध्यक्ष अर्लो चिगन के संगमा, महाराष्ट्र महासचिव ज्ञानेश्वर सलगर, मध्य प्रदेश उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण, मध्य प्रदेश महासचिव रामविलास कीरार, मध्य प्रदेश सचिव मोहरसिंह केवट, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष नरेश वाल्मिकी,  सामाजिक नेते शंकर सोनळी,  जे के. रेझा, मुंबई  महिला आघाडी अध्यक्ष महक चौधरी, पत्रकार सुरेश दलाल, पत्रकार आप्पाजी पाटील, व अन्य प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कर्नाटक रासपाचे राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी दिली.

कर्नाटक राज्य प्रशासनाचे बेळगाव जिल्हाधिकारीसो, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकसो यांना कर्नाटक रासपने संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव कार्यक्रम संदर्भात भेट घेऊन सविस्तर निवेदन दिनांक १७ जानेवारी रोजी सादर केले आहे. रासप कर्नाटक राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली आहे. श्री. जोगीन यांनी रा-सेफ राष्ट्रीय अध्यक्ष सिध्दप्पा अक्कीसागर यांची बेळगाव शाहूनगर येथे जय मल्हार निवासस्थानी भेट घेतली. श्री. जोगीन यांना दंडनायक संत कनकदास किताब सिद्धप्पा अक्किसागर यांनी आठवण म्हणून दिली.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...