Saturday, January 18, 2025

नव्या वर्षाच्या सुरुवातीला रासेफची कॉन्फरन्स यशस्वी संपन्न

नव्या वर्षाच्या सुरुवातीला रासेफची कॉन्फरन्स यशस्वी संपन्न 


मुंबई (१४/१/२५) : मासिक विश्वाचा यशवंत नायक व राष्ट्रीय समाज एम्पलॉईज फेडरेशन यांच्या संयुक्तिक कॉन्फरन्सचे आयोजन महाराष्ट्र रासेफ तर्फे करण्यात आले होते. राष्ट्रीय समाजाच्या चळवळीचे मुखपत्र विश्वाचा यशवंत नायकच्या वाटचालीबद्दल अनेकांनी आपली मते मांडली. रासेफचाही संघटनात्मक कामात येणाऱ्या अडचणींचा आढावा कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. सदर कॉन्फरन्समध्ये बेळगावहून रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, जालनाहून महाराष्ट्र रासेफचे अध्यक्ष सतिश नाझरकर सर, मुंबईहून रासेफचे महाराष्ट्र महासचिव जयसिंग राजगे सर, नांदेडहून मदनेश्वर शूरनर, नवी मुंबईहून ए. एस. कुलकर्णी, पुणेहून राजेंद्र कोकरे सर, साताराहून काशीनाथ माळी, पुणेहून महावीर सरक आदी कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. नव वर्षाच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनची कॉन्फरन्स साधक बाधक चर्चा करत यशस्वी पार पडली.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...