Saturday, January 18, 2025

दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच! महादेव जानकरांचा निर्धार

दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच! महादेव जानकरांचा निर्धार

मुंबई (४/१/२५) :  दिल्लीची विधानसभा निवडणुक आहे, त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन ही आमची भूमिका नाही, तर वन नेशन वन एज्युकेशन अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकच शिक्षण पद्धतीनं शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही नाही. भाजपसोबत आम्ही नाही...भाजप सोबत आम्ही नाही हे वारंवार सांगितले आहे. बिहारची निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. किंबहुना मुंबई महापालिकेची तयारी देखील सुरू केलेली आहे. मुंबई सुद्धा आम्ही स्वबळावरून लढून आम्ही आमचं खातं खोलणार, यात काही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केला आहे. मुंबई आझाद मैदान येथील रासपच्या कार्यालयात महादेव जानकर 'विश्वाचा यशवंत नायक'शी बोलत होते. 

मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू

मुंबई आमची आहे, अशी नेहमी ज्याची मक्तेदारी राहिलेली आहे, त्यांना आम्ही यावेळेस धडा शिकवू, असा निर्धारही महादेव जानकर यांनी केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाई बाबत भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, बीड प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मंत्र्याचा राजीनामा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. कारण त्यावेळी ते होते की नाही? असा प्रश्न आहे. असेही ते म्हणाले. बीडमध्ये राजकीय नेत्यांनी दोन समाजात गैरसमज पसरवून तणाव निर्माण करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...