Sunday, January 19, 2025

रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात 

रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त













मुंबई (१९/१/२५) : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. ईशान्य मुंबई राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम गोवंडी वैभवनगर शैक्षणिक संकुल सभागृहात पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव जिवाजी लेंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई येथील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या करण्यात आल्या. ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी प्रकाश डांगे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिवपदी महेश बोडके, ईशान्य मुंबई जिल्हा सचिव पदी जयश्रीताई केंगार, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष पदी स्वाती जमदाडे, मानखुर्द शिवाजीनगर तालुकाध्यक्ष पदी समीर खान, मानखुर्द शिवाजीनगर महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी जयाताई सपकाळ, ईशान्य मुंबई महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी माधुरीताई गायकवाड, चेंबुर विधानसभा अध्यक्षपदी अभय धारपवार, 141 वार्ड महिला आघाडी अध्यक्षा कार्तिकी अहिवळे, 139 वार्ड महिला आघाडी अध्यक्षा ज्योती जोहारे, 135 वार्ड अध्यक्षपदी रवी गुप्ता, 135 वार्ड उत्तर भारतीय आघाडी अध्यक्षपदी ओमप्रकाश यादव आदींची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना निवडीचे पत्र जिवाजी लेंगरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयार करू, असे सांगितले. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संतोष (तात्या)ढवळे धनवीकर, रासपाचे ज्येष्ठ नेते महावीर(आण्णा) वाघमोडे, मोहन करडे, तुकाराम पाटील, शशिकांत धडस, एड. वनमाला खरात वाक्षे, जमीर पठाण यांनी उपस्थित राहून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सभासद नोंदणीचे अभियान हाती घ्यावे, असे श्री. जिवाजी लेंगरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...