राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी घोषित
फलटण (११/१/२५) : राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांची फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ, तसेच नवीन पदाधिकारी पदनियुक्ती कार्यक्रमांचे राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजन केले होते. यावेळी फुलेपिठावर राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे विराजमान होते. राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशउपाध्यक्षपदी डॉ. प्रल्हाद पाटील - अहील्यानगगर, डॉ. तोसिफ शेख - अमरावती, सोमनाथ मोटे - सोलापूर, डॉ. शिवाजी शेंडगे- बीड यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सरचिटणीसपदी प्रा. विष्णू गोरे - लातूर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सचिवपदी जिवाजी लेंगरे - मुंबई शहर, नरेशकुमार मंडल- नागपूर, राजाभाऊ पोथारे - नाशिक, सुनील बंडगर - सोलापूर, संजय कन्नावर - चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश कोषाध्यपदी सुदाम जरग - रायगड यांची फेरनिवड करण्यात आली. राज्य कार्यकारणी सदस्यपदी सय्यदबाबा शेख - अहिल्यानगर, बाळासाहेब कोकरे - पुणे, भाऊसाहेब वाघ - सातारा, विठ्ठल यमकर - मुंबई, मेजर भानुदास हाके - अहिल्यानगर, नानासाहेब मदने - धाराशिव, ज्ञानोबा ताटे - परभणी, सुनीताताई किरवे यांची नियुक्ती करण्यात आली. पश्चीम महाराष्ट्र अध्यक्षपदी किरण गोफणे - पुणे, संपर्क प्रमुख विनायक रुपनर - पिंपरी चिंचवड, प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे- सांगली, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सुवर्णाताई जऱ्हाड पाटील, मराठवाडा अध्यक्षपदी अश्रुबा कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष पुन्हा जोमाने जनतेचे प्रश्न हाती घेऊन मैदानात उतरेल. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू व यश मिळवू, असा आशावाद प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी व्यक्त केला आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार सक्रिय सभासद नोंदणीचे मिशन राबवू. तसेच राज्य कार्यकारणीचा विस्तार करण्याचे सूतोवाच श्री. शेवते यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment