Saturday, January 18, 2025

माळी म्हणून मागू नका, ओबीसी म्हणून मागा : छगन भुजबळ

माळी म्हणून मागू नका, ओबीसी म्हणून मागा : छगन भुजबळ

कळंबोली (४/१/२५)  : माळी समाज भवन बांधण्याची मागणी करणे त्यात गैर काही नाही. समाजाने मागायचे असेल तर माळी म्हणून मागू नये, तर ओबीसी म्हणून मागावे, असे प्रतिपादन समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ हे कळंबोली ता - पनवेल येथे संत सावता समाज विकास मंडळाने आयोजीत केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

श्री. भुजबळ म्हणाले, समाज रडणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहत नाही, तर लढनाऱ्यांच्या सोबत उभा राहतो. छ. शिवाजीराजे, महात्मा फुले लढले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दलित, आदिवासी, ओबीसी, खुले असे कायद्याद्वारे समाजघटक वेगळे केले आहेत. बजेट देताना या चार समाजघटकांचा विचार केला जातो. पण या घटकांची गणना झाली नसल्यामुळे सरकारकडे आकडेवारी नाही. प्रणव मुखर्जीच्या काळात गणना झाली, पण ती चुकीची झाली, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजाने नायगाव, पुणे येथे कार्यक्रमास एकत्र आले पाहिजे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...