Tuesday, January 7, 2025

उत्तर प्रदेशात आम्हाला आमचे सरकार बनवायचे आहे - महादेव जानकर

उत्तर प्रदेशात आम्हाला आमचे सरकार बनवायचे आहे - महादेव जानकर 

गाजियाबाद येथे बोलताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर

रासपचा गाजियाबाद येथे कार्यकर्ता मेळाव्याने राजकीय वातावरण तापले 

गाजियाबाद (६/१/२५) :  सर्वसामान्यांचा गळा घोटून भांडवलदारांचे हित पाहणारे 'चांगले आणि सुरक्षित सरकार' नको आहे, जनहित पाहणारे राष्ट्रीय समाजाच्या मनातले आम्हाला आमचे स्वतःचे सरकार उत्तर प्रदेशात बनवायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. श्री. जानकर दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आले होते.  गाजियाबाद तर विजयनगर 'उत्सव भवन' येथे रासपने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यात बोलताना श्री. जानकर पुढे म्हणाले, मोफत रेशन नको, आम्हाला आमचे शासन हवे आहे.. 'एक राष्ट्र - एक शिक्षण' आणि सर्वांसाठी मोफत उपचारचा नारा रासपने दिला आहे. उत्तर प्रदेश 2027 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकित जिंकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी करावी. श्री. जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची भविष्यातील रूपरेषा पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर मांडली. 

भारताच्या पहील्या आदर्श महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्यादेवी होळकर या मागणाऱ्या समाजाचे नाही तर देणाऱ्या समाजाचे प्रतिक आहेत, त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारताच्या राजधानीत लाखो लोक एकत्र यावेत. स्वाभिमानाची गर्जना करून संसदेच दार ठोठवावे लागेल. जनतेचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी दिल्लीची सत्ता हस्तगत करावी लागेल, त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी आजपासूनच प्रचाराला सुरुवात करावी. संपूर्ण देशाच्या कारभारात आणि प्रशासनात राष्ट्रीय समाजाचा सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक बनले आहे. सत्ताधारी पक्ष छोटी छोटी आश्वासने देऊन तुम्हाला आम्हाला झुलवत ठेवतात, असे श्री. जानकर यांनी सांगितले.

31 मे दिल्लीकडे मोर्चा वळवा : जानकर 


यावर्षी छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा 31 मे ला उपेक्षित राष्ट्रीय समाज घटकांना सोबत घेऊन दिल्लीकडे मोर्चा वळवावा. महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त रासपने आयोजीत केलेली भव्य दिव्य विशाल हक्क रॅली सर्वांच्या सोबतीने यशस्वी करावी, असे आवाहन महादेव जानकर यांनी सामाजिक संघटनांना केले. 

श्रीकांत गुरुजी यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर रासपचा पहिलाच मेळावा यशस्वी झाला, त्याबद्दल राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी समाधान व्यक्त केले. मेळाव्यात विनोद कुमार तेवतिया, गौरव यादव, सागर धनराज, भुरे सिंगजी, ओंकारसिंह बघेल, नरेशकुमार वाल्मिकी, नरेंद्र पाल, पूनम पाल, रामभुलजी, सोमपालजी, दिलशाद खान, वीरपाल सिंहजी यांनी अथक परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. ऐन थंडीत रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा दौरा झाल्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात छोठी मोठी राजकीय समीकरणे बदलून रासप उभारी घेईल का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.



No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025