Tuesday, January 14, 2025

राजस्थानात अर्ध्या अपुऱ्या योजनांवर पशुपालक संघाचे बहिष्कार आंदोलन

राजस्थानात अर्ध्या अपुऱ्या योजनांवर पशुपालक संघाचे बहिष्कार आंदोलन 

पाली(७/१/२५) : भटके, विमुक्त, अर्ध भटके समाजाला मिळणाऱ्या शासकीय योजनांवर बहिष्कार म्हणून राष्ट्रीय पशुपालक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह राईका यांच्या नेतृत्वात पाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. रेनके आयोग, दादा इदाते आयोगाने भटक्या व्युक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारला काही शिफारशी केले आहेत, मात्र त्या राजस्थान सरकारने अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. भटक्या विमुक्त समाजाची यादी बनवताना अनेक चुका झाल्या आहेत, असे मत लालसिंह राईका यांनी मांडले आहे. जसे रेबारी लिहिले आहे, पण त्यांचेच पर्यायी शब्द असणारे राईका, रायका, देवासी शब्द न लिहिल्यामुळे या समाजाचे ओळख पटत नाही, प्रमाणपत्र बनत नाही. बावरी लिहिले आहे, पण बागरीया लिहिले नाही. जोगी- कालबेलिया लिहले, परंतु जोगी आणि कालबेलिया वेगवेगळे आहेत.नायक आणि भोपा एक ही जात आहे, परंतु त्यांना वेगवेगळे दाखवले आहे. बंजारा, भाट आणि राव एकच आहेत, तिथेही चुका केल्यात. यादीत सुधारणा करावी यासाठी कैबिनेट मंत्री मदन दिलावर यांना निवेदन दिले आहे आजपर्यंत त्यांनी समाधान केलेले नाही. त्यामुळे सरकारच्या अर्ध्या अपुऱ्या योजनावर आम्ही आजच्या आंदोलनाद्वारे बहिष्कार टाकत आहे. झालाराम देवासी, भिकू सिंह राईका व अन्य समाजबांधव आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. आम्ही भीक मागत नाही तर हक्क मागतोय अशा आंदोलकांनी घोषणाही दिल्या.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...