आम्ही आमच्याच महात्मा फुले विचाराचे देशात सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू : महादेव जानकर
सातारा (०३/१२/२०२४) : आम्ही महविकास आघाडी आणि महायुती बरोबर नाही. आम्ही स्वत:चीच ताकद एक दिवस करू. आम्ही आमच्याच विचाराचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू. महात्मा फुलेना अभिप्रेत असलेल राज या देशात आणण्याचा प्रयत्न राष्ट्रीय समाज पक्ष करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. एक दिवस महात्मा फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री नायगावला येईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. महादेव जानकर हे सावित्रीबाईं फुले जन्मभूमी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवा नेते अजित पाटील यावेळी उपस्थित होते.
गेली ३२ वर्षापासून नायगावला येत आहे. केंद्र सरकारने 'सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न' द्यावा, असे विधान रासपच्यावतीने महादेव जानकर यांनी केले आहे. पुढे महादेव जानकर म्हणाले, विदेशात महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विदेशातील पुतळे पाहून मन भरून येत. केवळ महिलांना शिक्षण देणे इतकंच त्यांचं काम नव्हत, तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या देशात सामाजिक परिवर्तन करण्याची भूमिका केलेली आहे, ती जगात अजोड आहे. त्यांना वंदन करणे हे आमचं काम आहे, त्यासाठी दरवर्षी नायगावला इथे येत राहतो.
भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असे होत राहते. त्यासाठी स्वत:ची झोपडी बांधली पाहिजे. जोपर्यंत आपले घर बांधले जाणार नाही, तोपर्यंत आपल्यावर अन्याय होत राहणार, म्हणूनच आम्ही 2003 साली राष्ट्रीय समाज पक्ष नावाची स्वत:ची झोपडी बांधलेली आहे. भुजबळ साहेब आदरणीय नेते आहेत. नायगावचा विकास छगन भुजबळ यांनीच केलेला आहे. देशपातळीवर ओबीसित जागृती आणण्यात भूमिका केली, त्यात भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे. भुजबळ साहेब यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. धाकटा भाऊ म्हणून सांगेन, आपलं जर घर बांधण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या पुढच्या पिढीच चांगल होईल, असे मत जानकर यांनी नोंदवले.
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण, ओबीसी आरक्षण असेल, जोपर्यंत तुम्ही तुमचा दल मोठा होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. काँग्रेसने केले तेच भाजप करणार आहे. वेगळा काहीच दिवा लावणार नाही. राष्ट्रीय समाज पक्ष फुलेवादाचा विचार घेऊन चाललेला पक्ष आहे. माझा एक आमदार जिंकून आला, तिथे महायुतीला उमेदवार मिळाला नाही. राष्ट्रीय समाज पार्टी जिंकणारी पार्टी आहे, असे उद्गगार महादेव जानकर यांनी काढले.
No comments:
Post a Comment