मध्यप्रदेशात रासपचा राज्य कार्यकारणी विस्तार
शिवपुरी (७/१/२५) : मध्य प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाने राज्य कार्यकारणी पदाधिकारी नियुक्त केले आहेत. दिनारा जिल्ह्यातून मिठ्ठन लाल वशकार, करेरा जिल्ह्यातून रामकृष्ण विश्वकर्मा, शहडौल जिल्ह्यातून रामविशाल पाल, रामविशाल कौल, भितरभार जिल्ह्यातून हाकिम सिंह रावत यांची नियुक्ती केल्याचे प्रसिध्दी पत्रक रासप मध्यप्रदेश महासचिव रामविलास किरार यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रीय समाज नायक महादेव जानकर यांचे मध्यप्रदेशात हात बळकट करावेत, राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत रुजवावेत, अशी अपेक्षा मध्यप्रदेश रासप प्रभारी प्राणसिंह पाल यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणीने अनभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment