कारंड्या लाडीच चांगभल १६ फेब्रुवारीला चिंचणी मायाक्कादेवी यात्रा
#chinchanimayakkadevi #yatra #chinchali
मुंबई (१२/१/२५) : महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चिंचणी मायाक्कादेवीची यात्रा गुरूवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत यात्रा भरणार आहे. १६ फेब्रुवारी २०२५ वार- रविवार रोजी बोन्याचा (महानैवद्य) कार्यक्रम पार पडणार आहे. श्री मायाका देवस्थान ट्रस्ट कमिटी चिंचली तालुका रायबाग जिल्हा बेळगाव यांनी यात्रेचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्या भाविक भक्तांना मायाका देवस्थानसाठी देणगी द्यायची आहे, त्यांनी ट्रस्टमध्ये देणगी देऊन तशी पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माघी पौर्णिमेला चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला लाखो भाविकांचे ओढ लागलेले असते. कोरोना काळातील भारतातील सर्व यात्रा वर बंदी आली होती एकमेव चिंचली मायाका देवी यात्रा त्या काळात पार पडली होती, इतका महिमा मोठा चिंचणी मायाका देवी यात्रेचा आहे. उगार- कुडची येथे कृष्णा नदीत काचोळी पूजन व स्नान केल्यानंतर भाविक भक्त चिंचली मायाक्कादेवीच्या दर्शनाला जातात. दुधनळी नदीला(हल्याळ नदी) स्नान करून महानैवद्य तयार केला जातो. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातुन बैलगाडीने तर मुंबईसह, वसई, ठाणे जिल्ह्यातून भक्त ट्रॅव्हल्स, रेल्वेने येतात तर काही भक्त खासगी वाहनाने यात्रेला येतात.
No comments:
Post a Comment