Thursday, January 30, 2025

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारणार

मुंबई 30/1/2025 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारेल, असा विश्वास राष्ट्रीय समाज पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला. काल सायंकाळी 7 वाजता गोवंडी येथील वैभवनगर येथे ईशान्य मुंबई जिल्हा व दक्षिण मध्य मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाने आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच पक्षाचा संघटनात्मक विस्तार करून नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आली. मनोगत व्यक्त करताना सर्वच आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने पक्षाचे काम वाढवण्याचा निर्धार केला. आढावा बैठकीचे आयोजन ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश डांगे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव महेश बोडके यांनी केले होते. 

मुंबई प्रदेश कोषाध्यक्षपदी रासपचे एकनिष्ठ सैनिक महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई कामगार आघाडी सचिवपदी तुकाराम पाटील, मुंबई महिला आघाडी सचिवपदी बायाक्का उर्फ विद्या दुधाळ, विक्रोळी विधानसभा अध्यक्षपदी हेमंत पवार, मानखुर्द महिला आघाडी तालुकाध्यक्षापदी मंदाताई जानकर, विक्रोळी महिला आघाडी तालुकाध्यक्षापदी सविता आहिरे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निखिल गायकवाड, ईशान्य मुंबई युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी विजय जैयस्वार, मानखुर्द शिवाजीनगर वाहतूक आघाडी तालुकाध्यक्षपदी मोहन करडे, मानखुर्द महिला आघाडी तालुका उपाध्यक्षपदी वनिता देवळे, चेंबुर महिला आघाडी तालुकाध्यक्षापदी आरती वाडेकर, घाटकोपर पूर्व तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी सुनील झोरे, 153 महिला आघाडी वार्ड अध्यक्ष मंदा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 

बैठकीसाठी सामाजिक नेत्या वनमाला खरात, दक्षिण मध्य मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वातीताई जमदाडे, शिवाजीनगर मानखुर्द तालुकाध्यक्ष समीर खान, चेंबुर विधानसभा अध्यक्ष अभय धारपवार, संभाजी भूसनर आदी उपस्थित होते.

आढावा बैठक व पद नियुक्ती प्रसंगीचे क्षणचित्रे 






















वृत्त व छायाचित्र संकलन : पी आबासो, मुंबई 

Friday, January 24, 2025

चलो नंदगड चलो नंदगड

 चलो नंदगड चलो नंदगड 


आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वर्शिकोत्सव - 17 वा


स्थळ : संगोळी रायन्ना समाधीस्थळ, नंदगड, तालुका - खानापूर, जिल्हा बेळगाव, कर्नाटक


दिनांक : 26 जानेवारी 2025


*इस देश पर राज करने का जन्मसिद्ध अधिकार मेरा हैं, इन गोरे अंग्रेजों का नहीं. इन अग्रेंजो को राजसत्ता से हटाना, मेरे जिवन का मुख्य उद्देश है ! - राष्ट्रविर संगोळी रायन्ना*


*गोरे अंग्रेज गये अब काले अंग्रेज इस देश पर राज कर रहे हैं, ऐसा किसी ज्ञानी ने कहा हैं. इन काले अंग्रेजो को राजसत्ता से हटाना, मेरे जिवन का मुख्य उद्देश है ! - राष्ट्र नायक महादेव जानकर*



*आयोजक/निमंत्रक : "राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी" व "राज्य कार्यकारणी कर्नाटक"*

तळोजा जेल म्हणजे, मोठमोठे गुन्हेगार ठेवण्याची जागा ना?

 तळोजा जेल म्हणजे, मोठमोठे गुन्हेगार ठेवण्याची जागा ना?


मग तिथे हा अधिकारी लाच घेत होता म्हणजे काय नेमके काय करत होता?


... जेव्हा लोकसेवकाला अधिकाराचा विसर पडतो !


१ सरकारी अभिवक्ता वाय. एस. भोपी यांनी तळोजा तुरुंगात सुरु असलेला गैर आर्थिक व्यवहार आणि सामान्य घरातील आरोपींना भेटताना त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विषद केला.


२ बड्या घरातील आरोपींकडून पैसे घेवून त्यांना कारागृहात फाईव्ह स्टार सुविधा देताना कन्नेवाड यांना लोकसेवक अधिकाराचा विसर पडला आणि त्यांनी आरोपीकडून पैसे घेवून त्याला सुविधा पुरवून कारागृहाच्या कामकाजाला काळिमा फासला असल्याचे युक्तिवादातून भोपी यांनी न्या. वढाणे यांच्या निदर्शनास आणून दिले.


३ दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. वढाणे यांनी तुरुंगाधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत असल्याचे घोषित करताच त्यांची पुन्हा ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.


==============================

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन

RTI Human Rights Activist Association

Thursday, January 23, 2025

26ರಂದು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಮಹಾದೇವ ಜಾಂಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ನಾಡಿನ ಗಣ್ಯರು ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ : ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಜೋಗಿನ್

26ರಂದು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಮಹಾದೇವ ಜಾಂಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ನಾಡಿನ ಗಣ್ಯರು ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ : ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಜೋಗಿನ್

ರಾಷ್ಟ್ರವೀರ ಸಂಗೋಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮವನ್ನು RSP ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದೆ 


ಬೆಳಗಾವಿ (ಪಿ. ಅಬಾಸೋ): ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮಾಜ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ವತಿಯಿಂದ ಪ್ರಥಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ವೀರ ಹಾಗೂ ಸ್ವರಾಜ್ಯ ವೀರ ರಾಷ್ಟ್ರವೀರ ಸಂಗೋಳಿ ರಾಯಣ್ಣನವರ 17ನೇ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ನಂದಗಡ ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮಾಜ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಗೌರವಾನ್ವಿತ ಮಹದೇವ್ಜಿ ಜನ್ಕರ್, ಮಾಜಿ ಸಚಿವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆರ್‌ಎ-ಎಸ್‌ಇಎಫ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಿದ್ದಪ್ಪ ಅಕ್ಕಿಸಾಗರ, ವಿಶೇಷ ಅತಿಥಿ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಹಲಗೇಕರ, ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭಾ ಸದಸ್ಯ ಖಾನಾಪುರ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವರು.

    ಆರ್‌ಎಸ್‌ಎಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಶಿವಲೈಮಪ್ಪ ಕಿನ್ನೂರ್, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಘಟಕ ಗೋವಿಂದರಾಮ್ ಶೂರ್ನಾರ್, ಬಾಲಕೃಷ್ಣ ಲೆಂಗ್ರೆ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಕುಮಾರ್ ಸುಶೀಲ್, ಕೆ ಪ್ರಸನ್ನಕುಮಾರ್ (ಕೇರಳ), ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಖಜಾಂಚಿ ಮೋಹನ್ ಮಾನೆ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಎಂ.ಜಿ.ಮಣಿಶಂಕರ್ (ತಮಿಳುನಾಡು), ಹೇಮಂತ್ ಪಾಂಡ್ಯ (ಗುಜರಾತ್), ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸದಸ್ಯ ಚಂದ್ರಪಾಲ್ (ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ), ಈಶಾನ್ಯ ಭಾರತ ಉಸ್ತುವಾರಿ ಡಾ. ಮನೋಜ್ ನಿಗಡ್ಕರ್, ಗುಜರಾತ್ ರಾಜ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸುಶೀಲ್ ಶರ್ಮಾ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಕಾಶಿನಾಥ ಶೇವ್ಟೆ, ಬಿಹಾರ ರಾಜ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಗೋಪಾಲ್ ಪಾಠಕ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಪ್ರಭಾರಿ ಪ್ರಾಣ್ ಸಿಂಗ್ ಪಾಲ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಶ್ರೀಲಾಲ್ ಬಾಘೇಲ್, ಅಸ್ಸಾಂ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಗೋಪಾಲ್ ಕಹಾರ್, ತೆಲಂಗಾಣ ಉಸ್ತುವಾರಿ ರಮಾಕಾಂತ್ ಕಾರ್ಗಟ್ಲ, ದೆಹಲಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಶ್ರೀಮತಿ ಹೇಮಲತಾ ಪಾಲ್ , ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಉಸ್ತುವಾರಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಗುರೂಜಿ, ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಹೇಶ್ ಪಾಲ್, ಮಣಿಪುರ ಸಂಘಟಕ್ ಪ್ರೈ. ಜಾಕ್ಸನ್ ಖುಮುಚ್ಚಮ್, ತಮಿಳುನಾಡು ಪ್ರಾದೇಶಿಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಿ ಲಯನ್ ರಾಜಾ, ಮೇಘಾಲಯ ಯುವ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅರ್ಲೋ ಚಿಗನ್ ಕೆ ಸಂಗ್ಮಾ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಲ್ಗರ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಡಿ. ಎಸ್. ಚವ್ಹಾಣ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ರಾಮ್ ವಿಲಾಸ್ ಕಿರಾರ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮೊಹರ್ಸಿನ್ಹ್ ಕೇವತ್, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಮತ್ತು ಪಂಗಡಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ಅಧ್ಯಕ್ಷ ನರೇಶ್ ವಾಲ್ಮೀಕಿ, ಸಾಮಾಜಿಕ ಮುಖಂಡ ಶಂಕರ್ ಸೋನ್ಲಿ, ಜೆ.ಕೆ. ರೇಜಾ, ಮುಂಬೈ ಮಹಿಳಾ ಅಘಾಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಮಹಾಕ ಚೌಧರಿ, ಪತ್ರಕರ್ತ ಸುರೇಶ ದಲಾಲ್, ಪತ್ರಕರ್ತ ಅಪ್ಪಾಜಿ ಪಾಟೀಲ ಸೇರಿದಂತೆ ಪ್ರಮುಖರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುವರು ಎಂದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಸ್ಪ ರಾಜ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಜೋಗಿನ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು.

     ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಆಡಳಿತವು ಸಂಗೋಳಿ ರಾಯಣ್ಣ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ವಿವರವಾದ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಜನವರಿ 17 ರಂದು ಸಲ್ಲಿಸಿತು. ಆರ್ ಎಸ್ ಪಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸಭೆ ನಡೆದಿದೆ. ಶ್ರೀ. ಜೋಗಿನ್ ಅವರು RA-SEF ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಿದ್ದಪ್ಪ ಅಕ್ಕಿಸಾಗರ್ ಅವರನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ಶಾಹೂಂಗಾರ್‌ನಲ್ಲಿರುವ ಜೈ ಮಲ್ಹಾರ್ ಅವರ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾದರು. ಶ್ರೀ. ದಂಡನಾಯಕ್ ಸಂತ ಕನಕದಾಸ ಕಿತಾಬ್ ಸಿದ್ದಪ್ಪ ಅಕ್ಕಿಸಾಗರ ಜೋಗಿನ್ ಸ್ಮರಿಸಿದರು.

26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિત દેશભરમાંથી મહાનુભાવો ઉપસ્થિત રહેશેઃ શિવલિંગપ્પા જોગીન

RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 


26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિત દેશભરમાંથી મહાનુભાવો ઉપસ્થિત રહેશેઃ શિવલિંગપ્પા જોગીન

બેલગામ: દર વર્ષની જેમ, રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીની રાષ્ટ્રીય કાર્યકારિણી અને કર્ણાટક રાજ્ય કાર્યકારીએ નંદગઢ તાલુકા ખાનપુર જિલ્લા બેલગામ ખાતે પ્રથમ સ્વતંત્રતા નાયક અને સ્વરાજ્ય નાયક રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની 17મી રાજ્યાભિષેક જયંતિનું આયોજન કર્યું હતું. આ કાર્યક્રમના મુખ્ય મહેમાન અને માર્ગદર્શક રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ માનનીય મહાદેવજી જાનકર, પૂર્વ મંત્રી મહારાષ્ટ્ર રાજ્ય રહેશે. આ કાર્યક્રમમાં RA-SEFના રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ સિદ્ધપ્પા અક્કીસાગર, વિશેષ અતિથિ ધારાસભ્ય વિઠ્ઠલ હલગેકર, કર્ણાટક વિધાનસભાના સભ્ય ખાનપુર ઉપસ્થિત રહેશે.

આરએસએપીના રાષ્ટ્રીય ઉપાધ્યક્ષ શિવલીમપ્પા કિન્નુર, રાષ્ટ્રીય આયોજક ગોવિંદરામ શુરનાર, બાલકૃષ્ણ લેંગરે, રાષ્ટ્રીય મહામંત્રી કુમાર સુશીલ, કે પ્રસન્નકુમાર (કેરળ), રાષ્ટ્રીય ખજાનચી મોહન માને, રાષ્ટ્રીય સચિવ એમજી મણિશંકર (તામિલનાડુ), હેમંત પંડ્યા (ગુજરાત), રાષ્ટ્રીય કાર્યકારી સભ્ય ચંદ્રપાલ (ઉત્તર પ્રદેશ), પૂર્વોત્તર ભારતના પ્રભારી ડૉ. મનોજ નિગડકર, ગુજરાત રાજ્યના પ્રભારી સુશીલ શર્મા, મહારાષ્ટ્ર પ્રદેશ અધ્યક્ષ કાશીનાથ શેવતે, બિહાર રાજ્ય પ્રભારી ગોપાલ પાઠક, મધ્ય પ્રદેશ પ્રભારી પ્રાણ સિંહ પાલ, મધ્ય પ્રદેશ પ્રદેશ પ્રમુખ શ્રીલાલ બઘેલ, આસામ પ્રદેશ અધ્યક્ષ ગોપાલ કહાર, તેલંગાણાના પ્રભારી રમાકાંત કરગટલા, દિલ્હી પ્રભારી શ્રીમતી હેમલતા પાલ. , ઉત્તર પ્રદેશ પ્રભારી શ્રીકાંત ગુરુજી , પશ્ચિમ બંગાળના પ્રભારી મહેશ પોલ , મણિપુર સંગઠન પ્રા. જેક્સન ઘુમુકચમ, તમિલનાડુના પ્રદેશ પ્રમુખ જી લાયન રાજા, મેઘાલય યુવા પ્રદેશ પ્રમુખ આર્લો ચિગન કે સંગમા, મહારાષ્ટ્રના મહામંત્રી જ્ઞાનેશ્વર સલગર, મધ્યપ્રદેશના ઉપપ્રમુખ ડી. એસ. ચવ્હાણ, મધ્યપ્રદેશના મહામંત્રી રામવિલાસ કિરાર, મધ્યપ્રદેશના સચિવ મોહરસિંહ કેવટ, રાષ્ટ્રીય અનુસૂચિત જાતિ અને જનજાતિ જોડાણના પ્રમુખ નરેશ વાલ્મીકી, સામાજિક અગ્રણી શંકર સોનલી, જે.કે. રેઝા, મુંબઈ મહિલા અઘાડીના પ્રમુખ મહક ચૌધરી, પત્રકાર સુરેશ દલાલ, પત્રકાર અપ્પાજી પાટીલ અને અન્ય અગ્રણી મહાનુભાવો ઉપસ્થિત રહેશે, એમ કર્ણાટક RSPના રાજ્ય પ્રભારી શિવલિંગપ્પા જોગીને જણાવ્યું હતું.

કર્ણાટક રાજ્ય પ્રશાસન સાંગોલી રાયન્ના રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠ કાર્યક્રમના સંબંધમાં બેલગામ જિલ્લા કલેક્ટર, બેલગામ જિલ્લા પોલીસ અધિક્ષકને મળ્યા અને 17મી જાન્યુઆરીના રોજ વિગતવાર નિવેદન રજૂ કર્યું. RSP કર્ણાટક રાજ્ય કાર્યકારિણીની બેઠક યોજાઈ છે. શ્રી. જોગિન RA-SEF ના રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ સિદ્ધપ્પા અક્કીસાગરને બેલગામ શાહુનગરમાં જય મલ્હારના ઘરે મળ્યા હતા. શ્રી. દંડનાયક સંત કનકદાસ કિતાબ સિદ્ધપ્પા અક્કીસાગરે જોગીનને યાદ કરાવ્યું

यशवंत नायक : डिसेंबर 2024






 

Formost SwatantryaVeer & SwarajNayak RASHTRAVEER Sangolli Rayanna 17th Rajyabhishek Varshikotsav Ceremony to be held at Nandgad

Formost SwatantryaVeer & SwarajNayak RASHTRAVEER Sangolli Rayanna 17th Rajyabhishek Varshikotsav Ceremony to be held at Nandgad Khanapur Belgavi  

Belgavi : usual This year Foremost SwatantryaVeer & Swaj Nayak RASHTRAVEER Sangolli Rayanna 17th Rajyabhishek Varshikotsav Function will be held at Nandgad Tal. Khanapur Dist Belgaum Karnataka on 26th January 2025 at 9am onwards upto 12 noon. Rajyabhishek Puja will be held early in the morning. In between flag hoisting & garlanding at Rayanna Smarak will be held. 

Karnataka State RSP & NATIONAL RSP Party Executive Committee Meeting will be also held in Nandgad.

Shri Mahadev Jankar, the National President of RSP, MLC, and former Cabinet Minister of Maharashtra. Will remain present as the Main Margadarshak. 

Former National President RSP & National President of RA-SEF Shri Siddappa Akkisagar will be karyakram Adhyaksha. Shri Vitthal Halgekar MLA Khanpur will be attending the function as Special Guest.Many other honorable leaders guests are also invited.

Office bearers and activists of our party from all over India are coming to attend this Holy & NATIONAL function of party.

News matter in Kannada, Marathi English, Hindi and Urdu languages are attached/ enclosed.

We request you to publish this news in your through daily news papers/ TV CHANNELS. You are cordially invited for function.

With regards. 

Thanking you.

Yours faithfully,


Shri Shivlingappa Jogin

In Charge 

Contat No.

9916333308

Rashtriya Samaj Party, Karnataka State

Date: 23 January 2025

Monday, January 20, 2025

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सवाची रासपकडून जय्यत तयारी

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सवाची रासपकडून जय्यत तयारी 

२६ रोजी संगोळी रायन्ना समाधीस्थळी महादेव जानकर सहित देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार  : शिवलिंगप्पा जोगीन

बेळगाव (पी. आबासो) : दरवर्षीप्रमाणे नंदगड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथे आद्य स्वातंत्र्यवीर तथा स्वराज्य नायक राष्ट्रवीर संगोळी रायन्ना १७ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक l राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष रा-सेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, विशेष अतिथी आमदार विठ्ठल हलगेकर कर्नाटक विधानसभा सदस्य खानापूर उपस्थित राहणार आहेत.


सन्माननीय अतिथी म्हणून रासपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर, बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के प्रसन्नाकुमार (केरळ), राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राष्ट्रीय सचिव एम.जी माणिशंकर (तमिळनाडू), हेमंत पंड्या (गुजरात), राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चंद्रपाल (उत्तर प्रदेश), ईशान्य भारत प्रभारी डॉक्टर मनोज निगडकर, गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काशिनाथ शेवते, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक, मध्यप्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, मध्यप्रदेश राज्य अध्यक्ष श्रीलाल बघेल, आसाम प्रदेशाध्यक्ष गोपाल कहार, तेलंगणा प्रभारी रमाकांत करगटला, दिल्ली प्रभारी श्रीमती हेमलता पाल, उत्तर प्रदेश प्रभारी श्रीकांत गुरुजी, पश्चिम बंगाल प्रभारी महेश पॉल, मणिपूर संघटक प्रा. जॅक्शन खुमुकचम, तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष जी लायन राजा, मेघालय युवा प्रदेशाध्यक्ष अर्लो चिगन के संगमा, महाराष्ट्र महासचिव ज्ञानेश्वर सलगर, मध्य प्रदेश उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण, मध्य प्रदेश महासचिव रामविलास कीरार, मध्य प्रदेश सचिव मोहरसिंह केवट, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष नरेश वाल्मिकी,  सामाजिक नेते शंकर सोनळी,  जे के. रेझा, मुंबई  महिला आघाडी अध्यक्ष महक चौधरी, पत्रकार सुरेश दलाल, पत्रकार आप्पाजी पाटील, व अन्य प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कर्नाटक रासपाचे राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी दिली.

कर्नाटक राज्य प्रशासनाचे बेळगाव जिल्हाधिकारीसो, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकसो यांना कर्नाटक रासपने संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव कार्यक्रम संदर्भात भेट घेऊन सविस्तर निवेदन दिनांक १७ जानेवारी रोजी सादर केले आहे. रासप कर्नाटक राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली आहे. श्री. जोगीन यांनी रा-सेफ राष्ट्रीय अध्यक्ष सिध्दप्पा अक्कीसागर यांची बेळगाव शाहूनगर येथे जय मल्हार निवासस्थानी भेट घेतली. श्री. जोगीन यांना दंडनायक संत कनकदास किताब सिद्धप्पा अक्किसागर यांनी आठवण म्हणून दिली.

Sunday, January 19, 2025

रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात 

रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त













मुंबई (१९/१/२५) : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. ईशान्य मुंबई राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम गोवंडी वैभवनगर शैक्षणिक संकुल सभागृहात पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव जिवाजी लेंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई येथील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या करण्यात आल्या. ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी प्रकाश डांगे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिवपदी महेश बोडके, ईशान्य मुंबई जिल्हा सचिव पदी जयश्रीताई केंगार, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष पदी स्वाती जमदाडे, मानखुर्द शिवाजीनगर तालुकाध्यक्ष पदी समीर खान, मानखुर्द शिवाजीनगर महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी जयाताई सपकाळ, ईशान्य मुंबई महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी माधुरीताई गायकवाड, चेंबुर विधानसभा अध्यक्षपदी अभय धारपवार, 141 वार्ड महिला आघाडी अध्यक्षा कार्तिकी अहिवळे, 139 वार्ड महिला आघाडी अध्यक्षा ज्योती जोहारे, 135 वार्ड अध्यक्षपदी रवी गुप्ता, 135 वार्ड उत्तर भारतीय आघाडी अध्यक्षपदी ओमप्रकाश यादव आदींची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना निवडीचे पत्र जिवाजी लेंगरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयार करू, असे सांगितले. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संतोष (तात्या)ढवळे धनवीकर, रासपाचे ज्येष्ठ नेते महावीर(आण्णा) वाघमोडे, मोहन करडे, तुकाराम पाटील, शशिकांत धडस, एड. वनमाला खरात वाक्षे, जमीर पठाण यांनी उपस्थित राहून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सभासद नोंदणीचे अभियान हाती घ्यावे, असे श्री. जिवाजी लेंगरे यांनी सांगितले.

Saturday, January 18, 2025

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आज रायगड जिल्हा दौऱ्यावर

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आज रायगड जिल्हा दौऱ्यावर



#mahadevjankar_raigad_tour  #rashtriyasamajpaksha #tour2025 #maharashtra 

नवी मुंबई (१८/१/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या दिनांक १८ जानेवारी २०२५ वार शनिवार रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर येणार आहेत, अशी माहिती रासपचे माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी 'पत्रकरांशी' बोलताना दिली. 


पेण येथे जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांनी धनगर समाज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजीत केले आहे. स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून अहिल्यादेवीनगर पेण - बोरगाव रोड तालुका - पेण जिल्हा - रायगड येथे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर धनगर समाज भवन पेण तालुका' या वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार आहे.  दुपारी ४ : ००  वाजता पेण येथे श्री. महादेव जानकर यांचे आगमन होईल, तरी राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी/ कार्यकर्ते/राष्ट्रीय समाज बांधव, हितचिंतकानी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. दडस यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क: संतोष(तात्या) ढवळे- धनवीकर, कोकण नेते रासप मो.9757065600


रायगड जिल्ह्यातील नियोजीत दौरा पार पडल्यानंतर महादेवजी जानकर साहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर रवाना होतील.


रासप केंद्रिय कार्यालयाकडून कळविण्यात आलेला नियोजीत दौरा पुढीलप्रमाणे 

महाराष्ट्र राज्य 

18 जानेवारी  पुणे जिल्हा रवाना>>

19 जानेवारी 2025 शिरूर जिल्हा पुणे दौरा

20 जानेवारी 2025 इंदापूर जिल्हा पुणे दौरा 

21 जानेवारी 2025 राहुरी जिल्हा अहिल्यानगर दौरा

23, 24 जानेवारी 2025 कोल्हापूर जिल्हा दौरा 

कर्नाटक राज्य 

25, 26 जानेवारी बेळगाव जिल्हा कर्नाटक दौरा

संपर्क: श्री.धर्मांन्ना तोंटापुर - मो. 8861267886, श्री. शिवलिंगप्पा जोगीन - मो. 9916333308

दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच! महादेव जानकरांचा निर्धार

दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच! महादेव जानकरांचा निर्धार

मुंबई (४/१/२५) :  दिल्लीची विधानसभा निवडणुक आहे, त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन ही आमची भूमिका नाही, तर वन नेशन वन एज्युकेशन अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकच शिक्षण पद्धतीनं शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही नाही. भाजपसोबत आम्ही नाही...भाजप सोबत आम्ही नाही हे वारंवार सांगितले आहे. बिहारची निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. किंबहुना मुंबई महापालिकेची तयारी देखील सुरू केलेली आहे. मुंबई सुद्धा आम्ही स्वबळावरून लढून आम्ही आमचं खातं खोलणार, यात काही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केला आहे. मुंबई आझाद मैदान येथील रासपच्या कार्यालयात महादेव जानकर 'विश्वाचा यशवंत नायक'शी बोलत होते. 

मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू

मुंबई आमची आहे, अशी नेहमी ज्याची मक्तेदारी राहिलेली आहे, त्यांना आम्ही यावेळेस धडा शिकवू, असा निर्धारही महादेव जानकर यांनी केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाई बाबत भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, बीड प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मंत्र्याचा राजीनामा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. कारण त्यावेळी ते होते की नाही? असा प्रश्न आहे. असेही ते म्हणाले. बीडमध्ये राजकीय नेत्यांनी दोन समाजात गैरसमज पसरवून तणाव निर्माण करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले आहे.

शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन

शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन


मेंढपाळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महादेव जानकरांचा रासप, बच्चू कडूचा प्रहार आक्रमक

अमरावती (७/१/२५) :  विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत सरकार संवेदनशील दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ का येत आहे, असा प्रश्न प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला आहे. 

बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन करण्यात आले. यादरम्यान बच्चू कडू बोलत होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. मात्र, तरीही सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. त्यामुळेच आम्ही शेतकरी शेतमजूर आणि मेंढपाळांच्या समस्यांना घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत. आंदोलन आमच्यासाठी नवीन नाही, आमचा जन्म आंदोलनासाठी झाला, पदावर असो किंवा नसो आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या आंदोलनात बच्चू कडू आणि महादेव जानकर हे मेंढपाळांच्या वेशात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.

या मागण्यांसाठी आंदोलन

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या घोषणांची पूर्तता करावी, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, चराई करता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, मेंढपाळांसाठी धोरण निश्चित करण्यात यावे, खोट्या केसेस मागे घेण्यात याव्या, मेंढ्यांचे मोबाईल हॉस्पिटल तयार करण्यात यावे, घरकुलसह स्थायी निवारा देण्यात यावा, चेक पोस्टवर झालेल्या कार्यवाहीचा मागील दोन वर्षाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात यावा, आदी मागण्या वाडा आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आहेत.

रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, देशात १८ टक्के असलेल्या धनगर समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. आजपर्यंत लोकसभेत एकही लोकप्रतिनिधी या समाजातून खासदार म्हणून निवडून गेला नाही अथवा निवडून जाऊ दिला गेला नाही. जाती धर्माच्या नावाने निवडणूक केंद्रित करण्यात आल्या. सर्वसामान्य आणि लोकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पराभव करण्यात आला, अशी खंत महादेव जानकर यांनी व्यक्त केली.  सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी असलेल्या योजना करता पैसा दिला नाही, तर यापुढे मोठे जोरदार आंदोलन करू, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला. हा आजचा मोर्चा म्हणजे एक झलक असून, यानंतरही प्रशासन व पोलिसांकडून मेंढपाळ बांधवांवर दमन करण्यात आले तर ते खपवून घेणार नाही, अशा शब्दांत ठणकावले.  विशेष म्हणजे काँग्रेस हा गद्दार पक्ष असून भाजप हा महागद्दार असल्याचा  हल्लाबोल महादेव जानकर यांनी आंदोलनादरम्यान केला. श्री. जानकर पुढे म्हणाले, गद्दारांच्या मागे उभे राहू नका. प्रहार व राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी व मेंढपाळ यांच्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार आहे. अमरावतीचा मोर्चा ही याची सुरुवात आहे. पुणे, औरंगाबादलाही मोर्चा काढू, असे सांगितले.

आंदोलनात रासपचे पदाधिकारी/कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भाचे माजी अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, यवतमाळ माजी जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकूर, अकोला   जिल्हा माजी अध्यक्ष दादाराव ढगे, माजी कार्यकारणी महाराष्ट्र सदस्य नानाजी देशमुख, गणेश मानकर, आनंदराव घोटाकडे, विष्णू पाटील, मंगेश शेळके, प्रदिप गावंडे, किरण होले पाटील, अब्दुल भाई, यश सोनटक्के व अन्य राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी घोषित

राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी घोषित 

फलटण (११/१/२५)  : राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांची फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ, तसेच नवीन पदाधिकारी पदनियुक्ती कार्यक्रमांचे राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजन केले होते. यावेळी फुलेपिठावर राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे विराजमान होते. राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशउपाध्यक्षपदी डॉ. प्रल्हाद पाटील - अहील्यानगगर, डॉ. तोसिफ शेख - अमरावती, सोमनाथ मोटे - सोलापूर, डॉ. शिवाजी शेंडगे- बीड यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सरचिटणीसपदी प्रा. विष्णू गोरे - लातूर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सचिवपदी जिवाजी लेंगरे - मुंबई शहर, नरेशकुमार मंडल- नागपूर, राजाभाऊ पोथारे - नाशिक, सुनील बंडगर - सोलापूर, संजय कन्नावर - चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश कोषाध्यपदी सुदाम जरग - रायगड यांची फेरनिवड करण्यात आली. राज्य कार्यकारणी सदस्यपदी सय्यदबाबा शेख - अहिल्यानगर, बाळासाहेब कोकरे - पुणे, भाऊसाहेब वाघ - सातारा, विठ्ठल यमकर - मुंबई, मेजर भानुदास हाके - अहिल्यानगर, नानासाहेब मदने - धाराशिव, ज्ञानोबा ताटे - परभणी, सुनीताताई किरवे यांची नियुक्ती करण्यात आली. पश्चीम महाराष्ट्र अध्यक्षपदी किरण गोफणे - पुणे, संपर्क प्रमुख विनायक रुपनर - पिंपरी चिंचवड, प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे- सांगली, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सुवर्णाताई जऱ्हाड पाटील, मराठवाडा अध्यक्षपदी अश्रुबा कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष पुन्हा जोमाने जनतेचे प्रश्न हाती घेऊन मैदानात उतरेल. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू व यश मिळवू, असा आशावाद प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी व्यक्त केला आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार सक्रिय सभासद नोंदणीचे मिशन राबवू. तसेच राज्य कार्यकारणीचा विस्तार करण्याचे सूतोवाच श्री. शेवते यांनी दिले आहेत.

माळी म्हणून मागू नका, ओबीसी म्हणून मागा : छगन भुजबळ

माळी म्हणून मागू नका, ओबीसी म्हणून मागा : छगन भुजबळ

कळंबोली (४/१/२५)  : माळी समाज भवन बांधण्याची मागणी करणे त्यात गैर काही नाही. समाजाने मागायचे असेल तर माळी म्हणून मागू नये, तर ओबीसी म्हणून मागावे, असे प्रतिपादन समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ हे कळंबोली ता - पनवेल येथे संत सावता समाज विकास मंडळाने आयोजीत केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

श्री. भुजबळ म्हणाले, समाज रडणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहत नाही, तर लढनाऱ्यांच्या सोबत उभा राहतो. छ. शिवाजीराजे, महात्मा फुले लढले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दलित, आदिवासी, ओबीसी, खुले असे कायद्याद्वारे समाजघटक वेगळे केले आहेत. बजेट देताना या चार समाजघटकांचा विचार केला जातो. पण या घटकांची गणना झाली नसल्यामुळे सरकारकडे आकडेवारी नाही. प्रणव मुखर्जीच्या काळात गणना झाली, पण ती चुकीची झाली, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजाने नायगाव, पुणे येथे कार्यक्रमास एकत्र आले पाहिजे.

रासप तर्फे नंदगड येथे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

रासप तर्फे नंदगड येथे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

मुंबई  :  राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी तर्फे 'आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना' राष्ट्रीय राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन नंदगड ता - खानापूर जिल्हा बेळगाव येथे केले असल्याची माहिती रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना दिली आहे. सन २००८ सालापासून येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यक्रम घेत आहे. २०२५ हे संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचे १७ वे वर्ष आहे. संगोळी रायन्ना समाधीस्थळी पहाटे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या शुभहस्ते राज्याभिषेक कार्यक्रम पार पडला जातो.  देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता फाशीस्थळावर जाऊन अभिवादनाचा कार्यक्रम पार पडतो. राष्ट्रीय राज्याभिषेक कार्यक्रमास देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी, तसेच विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संगोळी रायन्नाप्रेमी देशाभिमानी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सुशील यांनी केले आहे.

आम्ही आमच्याच महात्मा फुले विचाराचे देशात सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू : महादेव जानकर

आम्ही आमच्याच महात्मा फुले विचाराचे देशात सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू : महादेव जानकर 

सातारा (०३/१२/२०२४) : आम्ही महविकास आघाडी आणि महायुती बरोबर नाही. आम्ही स्वत:चीच ताकद एक दिवस करू. आम्ही आमच्याच विचाराचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू. महात्मा फुलेना अभिप्रेत असलेल राज या देशात आणण्याचा प्रयत्न राष्ट्रीय समाज पक्ष करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. एक दिवस महात्मा फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री नायगावला येईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. महादेव जानकर हे सावित्रीबाईं फुले जन्मभूमी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवा नेते अजित पाटील यावेळी उपस्थित होते. 

गेली ३२ वर्षापासून नायगावला येत आहे. केंद्र सरकारने 'सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न' द्यावा, असे विधान रासपच्यावतीने महादेव जानकर यांनी केले आहे. पुढे महादेव जानकर म्हणाले, विदेशात महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विदेशातील पुतळे पाहून मन भरून येत. केवळ महिलांना शिक्षण देणे इतकंच त्यांचं काम नव्हत, तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या देशात सामाजिक परिवर्तन करण्याची भूमिका केलेली आहे, ती जगात अजोड आहे. त्यांना वंदन करणे हे आमचं काम आहे, त्यासाठी दरवर्षी नायगावला इथे येत राहतो. 

भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असे होत राहते. त्यासाठी स्वत:ची झोपडी बांधली पाहिजे. जोपर्यंत आपले घर बांधले जाणार नाही, तोपर्यंत आपल्यावर अन्याय होत राहणार, म्हणूनच आम्ही 2003 साली राष्ट्रीय समाज पक्ष नावाची स्वत:ची झोपडी बांधलेली आहे. भुजबळ साहेब आदरणीय नेते आहेत. नायगावचा विकास छगन भुजबळ यांनीच केलेला आहे. देशपातळीवर ओबीसित जागृती आणण्यात भूमिका केली, त्यात भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे.   भुजबळ साहेब यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. धाकटा भाऊ म्हणून सांगेन, आपलं जर घर बांधण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या पुढच्या पिढीच चांगल होईल, असे मत जानकर यांनी नोंदवले. 

मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण, ओबीसी आरक्षण असेल, जोपर्यंत तुम्ही तुमचा दल मोठा होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. काँग्रेसने केले तेच भाजप करणार आहे.  वेगळा काहीच दिवा लावणार नाही. राष्ट्रीय समाज पक्ष फुलेवादाचा विचार घेऊन चाललेला पक्ष आहे. माझा एक आमदार जिंकून आला, तिथे महायुतीला उमेदवार मिळाला नाही. राष्ट्रीय समाज पार्टी जिंकणारी पार्टी आहे, असे उद्गगार महादेव जानकर यांनी काढले.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...