धनगरांनो निवडणुकी पूर्वी "आरक्षण" मिळाले नाही तर समाजाची "वोट बँक" प्रस्थापित पक्ष सोडून "रासप" कडे वळवण्यास काय हरकत आहे....
✍️✍️रोख ठोक✍️✍️
अशोक पातोंड धनगर
अकोट जिल्हा अकोला
9881667678
🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭
भाजप, काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी या सर्वच प्रस्थापित पक्षांनी गेल्या 70 वर्षात आमच्या धनगर समाजाचा केवळ "वोट बँक" आणि सतरंज्या उचलण्यापुरताच उपयोग घेतला. राज्यात वरील चारही पक्षांचे सरकारे आलीत आणि गेलीत. मात्र आमचा "धनगर ST आरक्षणा"चा प्रश्न काही सुटला नाही. जो पक्ष सत्तेवर येतोय तो केवळ आमच्या जमातीला धतूराच दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केल्या गेला. तरीही आम्ही त्यापासून बोध काही घेतला नाही. सात पिढ्या आमच्या बरबाद झाल्यावरही आमचा समाज जाती सोबत माती खायला तयारच नाही. उलट प्रस्थापित पक्षांच्या आहारी जाऊन आम्ही एकमेकांच्या आपसातच तंगड्या ओढायला लागलो. प्रस्थापित पक्षांचे मात्र त्यातून चांग भलंच झालं. कुठेतरी हे थांबले पाहिजे आणि यापुढील काळात निदान जातीसाठी सर्वांनी पाणीदार बनणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे.
बांधवांनो सांगायचे म्हणजे काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो की, शिवसेना हे सर्वच प्रस्थापित पक्ष आमच्या फुटीचा पुरेपूर फायदा घेऊन समाजात "तोडा आणि फोडाची" नीती वापरून आम्हाला कामापुरते वापरू लागलेत. हे मात्र आमच्या कुठल्याच धनगर नेत्यांच्या वा कार्यकर्त्यांच्या 70 वर्षात लक्षात आले नाही. आणि येणार पण नाही. कारण आमच्या जमातीला जी 70 वर्षाची लाचारी व गुलामी करण्याची सवय लागलेली आहे. ती मला वाटते एकदाचे स्मशानात गेल्याशिवाय तर काही सुटणे नाही. आमच्या जमातीची अवस्था आज रोजी अशी झाली की, गाढवाला 🫏त्याच्या मालकाने कितीही सुधारण्याचे प्रयत्न केले, तरी तो त्याच्या वागणुकीत बदल करण्याचे नाव घेत नाही. भर उन्हाळ्यात मातीत लोळल्याशिवाय गाढवाला 🫏जसे समाधान होत नाही. तसेच आमच्या जमातीला 70 वर्ष प्रबोधनकारांनी प्रकाश टाकण्याचे काम केल्यावरही आमच्या लोकांच्या मेंदूत फरक पडला नाही. मी तर म्हणेल आमच्या जमातीच्या लोकांचे खरोखर डोकी ठिकाणावर असती तर 70 वर्ष आमच्या हातून व्यर्थ वाया गेलेच नसते. मी तर म्हणेल की, आमची जमात हल्ली "सुखी जरूर असेल पण सुती" अजिबातच नाही. म्हणून हा सर्व घोळ आहे.
बांधवांनो असे म्हणतात की, आमच्या पेक्षा मेंढरं 🐑🐑तरी बरी. कमीत कमी रस्त्याने चालतांना ते सरळ रेषेत तरी चालतात. मात्र आमच्या जमातीतील लोकांना डोकं असल्यावरही डोक्याचा योग्य वापर जमातीसाठी करीत नाहीत. हे खूप मोठे दुर्दैव आमच्या जमातीचे आहे.
बांधवांनो गेल्या 70 वर्षात आपण काँग्रेस, भाजप, सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व प्रस्थापित पक्षांना अजमावले असून यापैकी एकाही राजकीय पक्षांनी आमच्या जमातीसाठी "आरक्षण"च काय तर कुठलेच सामाजिक प्रश्न सोडविले नाही. तरीही आम्ही वरील सर्व पक्षांसाठी मागचा पुढचा विचार न करता 70 वर्ष चपला झिजवल्यात. आमच्या हाती काय लागले तर केवळ धतूरा.... मग आता तरी आमच्या जमातीने सुधरायला नको का...?? वागणुकीत बदल करायला नको का...?? जमातीसाठी माती खाणार की नाही...?? समाजासाठी पाणीदार बनून लाचारी व गुलामीचा अंत करणार की नाही....?? त्यासाठी एकच करावं लागेल. वरील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना येणाऱ्या निवडणुकीत एकाही धनगराने मतदान न करता आमच्या हक्काचा आणि घरचा पक्ष, "राष्ट्रीय समाज पक्ष" याच पक्षाला मतदान करून महादेवराव जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यास काही हरकत नाही. जेणेकरून प्रस्थस्पित पक्षांना यातून धडा मिळेल आणि महत्वाचे म्हणजे आमच्या धनगर जमातीची "वोट बँक" सुद्धा यातून प्रस्थापितांना कळेल. आमची "वोट बँक" पक्की असली तर पुढील काळात प्रस्थापित राजकीय पक्ष भविष्यात आमच्या जमातीचा विचार तरी करतील. म्हणून माझी हात जोडून तमाम धनगरांना नम्र विनंती आहे की, आपापसात असलेले मान-पान, रुसवे-फुगवे, पक्ष, संघटना, गट-तट विसरून गेल्या 70 वर्षांचा हिशोब प्रस्थापित पक्षांकडून घेण्यासाठी तयारी ठेवा. हीच अपेक्षा करतो.
धन्यवाद.
🪷🙏🏾
No comments:
Post a Comment