Monday, December 25, 2023

बारामती लोकसभा मतदार क्षेत्रातील जनतेमुळेच राष्ट्रीय समाज पक्षाचा दबदबा : एस. एल. अक्कीसागर

बारामती लोकसभा मतदार क्षेत्रातील जनतेमुळेच राष्ट्रीय समाज पक्षाचा दबदबा :  एस. एल. अक्कीसागर

बारामती : (२७/११/२०२३) यशवंत नायक ब्यूरो

बारामती लोकसभा मतदार क्षेत्रातील जनतेमुळेच देशाच्या राजकारणात दबदबा वाढला, असल्याचे प्रतिपादन रासपचे संस्थापक सदस्य एस. एल अक्कीसागर यांनी केले. जेजुरी व नाझरे तालुका पुरंदर येथील जनतेच्या गाठीभेटी घेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या पाठीशी मतांचे पाठबळ उभे केले, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचा देशाच्या राजकारणात दबदबा वाढला. नाझरे गावचे सरपंच व गावकऱ्यांनी महादेव जानकर यांना मताधिक्य दिल्याबद्दल श्री. अक्कीसागर यांनी आभार मानले.  येणाऱ्या २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना कोणत्याही परिस्थितीत आपणास संसदेत पाठवायचेच आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. 

यावेळी पुरंदर बाजार समिती सदस्य मालन नाझिरकर, ज्येष्ठ नेते गोविंदराव शुरनर, अशोक गाढे, रासेफ महाराष्ट्र अध्यक्ष सतिश नाझरकर, चित्रपट निर्माते घनश्याम येडे, यशवंत नायकचे आबासो पुकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...