Thursday, December 28, 2023

एस. एल. अक्कीसागर म्हणजे ज्ञानाचा महासागर

एस. एल. अक्कीसागर 

ज्ञानाचा महासागर 



आज एस. एल. अक्कीसागर साहेबांचा वाढदिवस त्यानिमित्त....!

महादेव जानकर आजचे संगोळी रायन्ना- 

होय ! आजचे संगोळी रायन्ना महादेव जानकर साहेब आहेत हे अक्कीसागर साहेब यांनी कर्नाटकातील कुरुबा समाजाला ठासून सांगितलंय.  ते म्हणतात, संगोळी रायन्ना आज हयात नसताना रायन्नाचे पुतळे बांधण्यासाठी समाज खर्च करतो, पण आजचे संगोळी रायन्ना महादेव जानकर आहेत. कर्नाटकातील कुरुबा समाजाने आजच्या संगोळी रायन्नांना अर्थातच जानकर साहेबांना साथ द्यावी. आता जर जानकरांच्या कार्याला साथ न देता  उद्या जर कोणी महादेव जानकरांचा कर्नाटकात पुतळा बांधला तर तो तोडून टाकण्यासाठी मी पहिला पुढे येईल, असा इशारा अक्कीसागर साहेब यांनी कुरुबा समाजाला दिलाय ; असे संगोळी रायन्ना युवा संघटनेचे बेंगलोर निवासी शिवा कुरुबा सांगतात.

२९ सप्टेंबरला मासिक विश्वाचा यशवंत नायकला २५ वर्ष पूर्ण झाली. आज महाराष्ट्रातील राष्ट्रिय समाजात वैचारीक, बौद्धिक विचाराची घुसळण पहायला मिळत आहे, त्यापाठीमागे यशवंत नायक अंकातुन अक्कीसागर साहेब यांनी अखंडपणे केलेले लिखाण आहे. राष्ट्रिय समाजात प्रचार- प्रसार करण्यासाठी महाराज यशवंतराव होळकर यांच्या नावाने मासिक पत्र चालू करुन ऐतिहासिक असे मोठे कार्य केले. नुकतीच महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती देशभरात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराजांचा फोटो यशवंत नायक अंकातून प्रसिद्ध करुन इतिहासाच्या उदरात गडप केलेल्या राष्ट्रविराला प्रकाश झोतात आणण्याचे कार्य अक्कीसागर यांनी केले.  यशवंत नायक अंकाचे संपादन कार्यात ते २५ वषापसून कार्यरत आहेत. ते उत्कृष्ट संपादक आहेत. 


अक्कीसागर साहेब दोन वर्षापूर्वी रिझर्व बँकेच्या मुख्यालयातू जनरल मँनेजर पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तिनंतर लोक समाजकार्याकडे वळतात, पण अक्कीसागर साहेब यांनी सुरुवातीपासूनच समाज कार्यात  झोकुन देऊन काम केले आहे. आजही पायाला भिंगरी बांधून देशभर वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रिय समाज पक्षाचे संघटन बांधणीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.


अक्कीसागर साहेब ऑल इंडिया रिझर्व बँक ओबीसी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. रिझर्व बँक एसईबीसी एम्प्लॉईज, मुंबई चे संस्थापक अध्यक्ष,  राष्ट्रिय यशवंत सेनेचे राष्ट्रिय सचिव, 'यशवंत नायक' मासिकपत्राचे कार्यकारी संपादक, लेखक, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल, दिल्ली चे सदस्य, श्री. कागिनेली महासंस्थान कनक गुरुपीठ, कर्नाटक सदस्य, राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष आहेत. 


महाराष्ट्रातील धनगर, राष्ट्रिय समाजात दहा- पंधरा वर्षापासून सामाजिक, राजकिय व अन्य क्षेत्रात जो बदल घडत आहेत तो सहजासहजी घडत नाही, त्यासाठी मोठी ताकद खर्ची पडलेली आहे याचे ते साक्षीदार व भागिदार आहेत.


अक्कीसागर साहेब यांचा सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, ऐतिहासिक, राजकिय, सांस्कृतिक अभ्यास खूप मोठा आहे. अक्कीसागर यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. देशभरातल्या विविध राज्यात त्यांना ओळखणारा,  विचाराला मानणारा समाज घटक आहे. अक्कीसागर साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वावर लिहण्यासारख, बोलण्यासारखं खुप काही आहे पण आज एवढेच म्हणेन की, अक्कीसागर साहेब म्हणजे ज्ञानाचा महासागर आहेत.  नदीचा अंदाज करता येतो पण सागराचा नाही, अक्कीसागर साहेब तर महासागर आहेत. माझ्यासारख्या युवकाला तर इतक्या कमी वेळात त्यांच्या ज्ञानरूपी व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होणार नाही, याची मला खात्री आहे.

थोर विचारवंत, उत्तम संघटक, अभ्यासक, पत्रकार, राष्ट्रप्रेमी, मानवतावादी नेतृत्व, लेखक, कवी एस. एल. अक्कीसागर साहेब यांनी शतायुषी व्हावे अशा त्यांना ६२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.  

शुभेच्छुक :  ए. एस. पुकळे व पुकळे परिवार.

५- १२- २०१८

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...