मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढला
भोपाळ : राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत 14/11/2023 रोजी करैरा विधानसभा व पिछोर विधानसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार मीना कोरी व रामसिंह पाल तसेच सुरेश कुशवाहा मैदानात लढले. कोळी, माळी आणि धनगर असे तीन राष्ट्रीय समाजाचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी रासप सुप्रीमो महादेव जानकर यांनी जनसभेला संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील,अवध प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रपाल सहित अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान सर्किट हाउस झांसी येथे माननीय महादेव जानकर, झांशी पूर्व जिला पंचायत अध्यक्ष राकेश पाल, संजय पाल, डॉ राजेश पाल जी, एडवोकेट भरत पाल, जुगल किशोर पाल, राम बाबू पाल व अन्य काही सामाजिक व राजकीय मुलाकात केली. मध्य प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष प्राणसिंह पाल यांच्या घरी महादेव जानकर यांनी भाई दूज साजरी केली.
No comments:
Post a Comment