भुजबळ साहेब जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही तोपर्यंत ओबीसींचे भल करू शकणार नाही : महादेव जानकर
इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यात रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर व समोर विराट जनसमुदाय |
इंदापूर (९/१२/२३) : आबासो पुकळे
"सत्तेशिवाय शहानपणा नाही. जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही, तोपर्यंत भुजबळ साहेब आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नाही. आपला मालक जर दुसरा असेल आणि चालवणारे आपण असू तर हित होणार नाही, असे रोखठोक विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर, माजी मंत्री यांनी केले. आ. जानकर इंदापूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंचावर ना. छगन भुजबळ- कॅबिनेटमंत्री, माजी आ. प्रकाश आण्णा शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, शब्बीर अन्सारी, माजी खा. समीर भुजबळ, लक्ष्मण गायकवाड आदी मंचावर उपस्थित होते.
महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले, सगळ्यांची भाषण ऐकली. अंतिम सत्य हे येतेय की, सत्तेविना सकळ कळा ! झाल्या अवकळा!! सत्ता नसल्यामुळे आपल्या सर्वांची अवकळा झालेली आहे. महात्मा फुलेंनी सत्ता पाहिजे असे सांगितले आहे. सत्ता आपली (ओबीसींची) पाहिजे, पंतप्रधान आपला पाहिजे, मुख्यमंत्री आपला पाहिजे, पक्ष आपला पाहिजे त्यावेळेस हे शक्य होणार आहे. म्हणून प्रस्थापितांच्या दुसऱ्याच्या पक्षात बसून सल्ला देत असू तर हे शक्य होणार नाही. निवडणुकीच्या आधी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. गावागावात अतिशय वातावरण चांगला आहे चांगला प्रतिसाद मिळत आहे. साळी, माळी, कोळी, तेली, धनगर, वडार, बेलदार, लोणारी, मुसलमान, कैकाडी, सर्व समाज आदराने वागत आहेत. एकत्र येत आहेत. सर्व ओबीसींना काहीतरी आशेचा किरण दिसतोय. अंतिम सत्य हेच आहे, सत्तेशिवाय शहानपणा नाही. जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही, तोपर्यंत भुजबळ साहेब आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नाही. आपला मालक जर दुसरा असेल आणि चालवणारे आपण असू तर हित होणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे. आमचे तुम्ही नेते आहेत. तुम्ही वडीलधारी आहात. महाराष्ट्रात पहिल्यांदा भुजबळ साहेबांकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर आम्ही शांत बसणार नाही असा सांगणारा पहिला महादेव जानकर आहे. म्हणून सांगू इच्छितो, 'आय एम नॉट डिमांडर वुई आर कमांडर. भीक मागणारी आमची औलाद नाही, देणार अवलाद बनलं पाहिजे. म्हणून तुम्ही अभ्यास करा. ओबीसींचे आयएएस कुठे आहेत?, आयपीएस कुठे आहेत, तुमचे गव्हर्नर कूठे आहेत?, तुमच्या क्लास वन च्या जागा कुठे भरल्या गेल्यात? आकडेवारी नाही. आमचा थिंक टँक हरी नरके असल्यामुळे पाच मिनिटात देत होता. हरी नरके नसल्यामुळे ते दु:ख आज आम्हाला सहन कराव लागतय, बांधवांनो. म्हणून बुद्धीवादी विचारांने चला. बुद्धीजिविनी बुद्धीनेच उत्तर देत चला. गावगाड्यातील लोकांनी एकत्र यायचा प्रयत्न करा. नुसती जिल्हा परिषद, पंचायत समितीची चर्चा करू नका, खासदारा पासून सुरवात करा आणि आमदारावर शेवट करा. तरच तुमचं भल झाल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ साहेब मी नेहमी तुमच्याबरोबर असणार आहे. Don't worry. आपण तुमच्या बरोबर असणार आहे. पक्षाचा मालक मीच असणार आहे. माझा मालक दुसरा कुणी नसणार आहे. माझा मालक फक्त महात्मा फुले आहेत.
No comments:
Post a Comment