Monday, December 18, 2023

एस. एल. अक्कीसागर सत्यशोधक समाज वाहक पुरस्काराने सन्मानित

एस. एल. अक्कीसागर सत्यशोधक समाज वाहक पुरस्काराने सन्मानित

जेजुरी (२७/११/२०२३) : राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर साहेब यांना सत्यशोधक समाज वाहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिशन मौर्य क्रांती महासंघाचे अधिवेशन जेजुरी येथे पार पडले. या अधिवेशनात कै. मारुतीमामा पिसाळ यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार देण्यात आला. सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. अक्कीसागर यांना पुरस्कार प्रदान करताना कार्यक्रमस्थळी उत्सहाचे वातावरण तयार झाले.

श्री. अक्कीसागर यांना घुंगराची काठी, घोंगडे, होळकरी पगडी, महाराजा यशवंतराव होळकर यांचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.  तसेच सिद्धप्पा अक्कीसागर यांनी आपल्या भाषणात बुध्दीजिविंची भूमिका स्पष्ट करून दिली. सन्मान केला त्याबद्दल महासंघाचे आभार व्यक्त केले. यावेळी शिवाजी शेंडगे, गोविंदराव शूरनर, घनश्याम येडे, गोविंद गोरे, बलभीम माथेले, सतिश नजरकर, राजीव हाके, महेश पिंगळे, अशोक गाडे, आबासो पुकळे, राजेंद्र बरकडे आदी उपस्थीत होते.

अक्कीसागर साहेब यांचे भाषण ऐकन्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा>> अक्कीसागर साहेब संपूर्ण भाषण 


No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...