Sunday, December 3, 2023

भक्ती शक्तीचा संगम साधत कळंबोली शहरात संत कनकदास व महाराजा यशवंतराव होळकर यांना अभिवादन

भक्ती शक्तीचा संगम साधत कळंबोली शहरात संत कनकदास व महाराजा यशवंतराव होळकर यांना अभिवादन 


कळंबोली : यशवंत नायक ब्यूरो

आज दिनांक ३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर आणि संत कनकदास महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करत कळंबोली शहरात धनगर समाजाने भक्ती शक्तीचा संगम साधला. कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्कादेवीची आरती पार पडल्यानंतर दंडनायक संत कनकदास महाराज व यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास मार्गदर्शन करताना सामाजिक राजकीय विचारवंत सुदर्शन अक्कीसागर (बेळगांव) म्हणाले, संत कनकदास यांनी युद्धामध्ये भाग घेतला होता. त्यांच्याकडे सर्वस्व असताना भक्तिमार्ग स्वीकारून विद्या प्राप्त केली. विद्येच्या जोरावर तथाकथित पंडितांना आव्हान दिले.  महाराजा यशवंतराव होळकर यांचा तर पराक्रमाचा इतिहास असताना, महाराष्ट्रात चुकीचा इतिहास लिहला गेला, शालेय अभ्यासक्रमात त्यांना स्थान नाही, याकडे आपले लक्ष नसल्याची खंत व्यक्त केली. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे सत्ता होती, म्हणून त्यांनी देशभर गौरवशाली काम केले. आपण सत्ताहिन असल्याने महाराष्ट्रात धनगर समाजाची अवहेलना होत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचा खासदार संसदेत जावा, यासाठी प्रयत्न करावेत.

प्रा. एन. पी. खरजे सर यांनी समाज जागृती करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणे गरजेचे आहे. संत कनकदास यांची भक्ती बुध्दीची, आचरणाची, युक्तीची होती. त्यातून आपण आदर्श घेतला पाहिजे, असे विचार मांडले. अक्कीसागर यांनी सांगितले त्याप्रमाणे आपण आपला इतिहास शालेय अभ्यासक्रमात यावा यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अहिल्याकन्याफेम सौ. शितलताई दिंडे यांनी कार्यक्रमास उपस्थिती दाखवून संत कनकदास महाराज यांच्या जीवनातील अनेक पैलू विषद केले. संत कनकसदास यांच्या नावाने उडपी येथील श्रीकृष्ण मंदिर प्रसिद्ध आहे. संत कनकदास यांचे घराणे दंडनायक असून त्यांचे मूळ नाव तिमप्पा होते.  

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजस्थान राज्यात तीन धनगर समाजाचे उमेदवारांनी विजय मिळवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून महाराष्ट्रात देखील धनगर समाजाचे ३० आमदार जिंकावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी मंदीर कमिटीचे श्री. व्हरकाटेमामा, श्री. सरकमामा, सुदामशेठ जरग, आण्णासाहेब वावरे, शरदभाऊ दडस, आशुतोष शेंडगे, तुकाराम सरक, शशिकांत मोरे, श्री. कोळेकर, ऋषिकेश जरग, चैतन्य जरग व अन्य शेकडो समाज बांधव उपस्थित होते.











No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...