मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल : महादेव जानकर
म्हसवड : यशवंत नायक ब्यूरो
शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण चांगल्या प्रकारे मुलांना मिळाले पाहिजे. मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल. शिक्षणामुळेच क्रांती करता येईल. शिकेल तोच टिकेल. जिल्हा परिषद येथून गरीब, शेतकरी व सामान्यांचीच मुले शिकत आहेत. श्रीमंताची, आमदार, खासदाराची मुले चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेऊन, पुढे इंग्लंड अमेरिकेत शिक्षणासाठी जात आहेत. सामान्यांची मुले शिकले पाहिजेत, त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी माझी तळमळ असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. वीरकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेकरता त्यांच्या फंडातून बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेल्या कामाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जानकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार जंगम, मार्केट कमिटी उपसभापती वैशालीताई विरकर, माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, ग.शि. लक्ष्मण पिसे, किसन वीरकर, ईश्वरा खोत, डॉक्टर बाळाराजे वीरकर, आप्पासाहेब पुकळे, गुलाबराव उगलमुगले, बबनदादा वीरकर, दादासाहेब दोरगे, जगन्नाथ विरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या गावी आले नसते तर आम्ही शिकलो नसतो. गावात एक वेळ रस्ता नसला तरी चालेल पण मुले चांगली शिकली पाहिजेत गावकरी समाज मंदिरासाठी ज्याप्रमाणे पुढाकार घेत आहेत त्याचप्रमाणे शाळा सुधारण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत.
No comments:
Post a Comment