धन्य ते पिता
महादेव जैसा पुत्र दिला
ज्याचा तीही लोकी झेंडा
जगन्नाथ मारुती जानकर (आबा) यांना ११ व्या स्मृतिदिनानिमित्त यशवंत नायक परिवार तर्फे विनम्र अभिवादन..!🌷
१५ डिसेंबर २०१२ रोजी जगन्नाथ मारुती जानकर (आबा ) यांचे वृद्धापकाळाने म्हसवड ता- माण जिल्हा सातारा येथे निधन झाले. समस्त बहुजन राष्ट्रीय समाज मनावर शोक संदेश पोहचला. निधनापूर्वी सहा महिन्याचा कालावधी असेल, जगन्नाथ जानकर (आबा) यांना म्हसवड येथे डॉ. बाबर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते, त्यावेळी माझे मित्र सागर जानकर यांच्यामुळे मला जानकर साहेबांच्या वडिलांना पाहता आले, त्यांचे दोन शब्द ऐकता आले. त्यांचा आवाज हा कणखर आणि स्वाभिमानी वाटला. जानकर साहेबांचा आवाज हा त्यांच्या वडिलांच्या सारखा आहे. महान तपस्वी विशाल हृदयाच्या मानवाला भेटलो म्हणून थोडेसे बरे वाटले, मनात मात्र दू:ख झाले होते. कारण तेथे मला जानकर साहेब त्यांच्या वडिलांच्या जवळ दिसले नाहीत. जानकर साहेब यांनी घरी न येण्याची शपथ घेतली आहे. ते घरी येत नाहीत, असे लोकांमध्ये ऐकायचो. मग मी त्यांना विचारायचो, जानकर साहेब आईवडिलांना भेटायला येत नाहित का? मग ते कसे भेटतात? असे अनेकांना विचारायचो. त्याकाळी असे सांगितले जायचे, जानकर साहेबांची म्हसवडला सभा असली की, लोक साहेबांच्या आई वडीलांना सभेच्या ठिकाणी घेऊन यायचे. जानकर साहेब सभास्थळी आल्यावर आई वडील साहेबांना दुरून फक्त पाहायचे. आज जिकडे पहावे तिकडे स्वार्थ साधण्यासाठी लोक प्रसंगी कोणत्याही थराला जायला तयार असतात. पण गुणाई जानकर व जगन्नाथ जानकर हे दांपत्य मळलेल्या वाटेने न जाता स्वतःच्या नव्या पायवाटेने चालणारे होते. आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या कमाईवर जीवन जगण्याची आशा न ठेवता, समाज परिवर्तनाच्या चळवळीत झोकून देण्यासाठी मुलांना पूर्णवेळ धाडण्याच धाडस दाखवतात, यातूनच जानकर साहेबांचे आई वडीलांचे मन आभाळाहून मोठे असल्याचे जाणवते.
स्व. जगन्नाथ जानकर (आबा) हे एक सर्वसामान्य कुटुंबप्रमुखासारखे जीवन जगले. एक मेंढपाळ या नात्याने वर्षातले आठ महिने परमुलखात, चार महिने गावात असा त्यांचा जीवनक्रम राहिला आहे. दुष्काळात तर त्यांची खूप उपेक्षा झाली. प्रसंगी अवहेलना, वेदना झेलत विस्थापित जीवन जगले. दरम्यान मेंढरे घेऊन भटकंती करणाऱ्या आबांची आणि तिर्थरूप कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. पुढे त्यांनी आपला मुलांना रांत्रदिवस कष्ट करून मुलांना दर्जेदार शिक्षण दिले, मात्र उगळणाऱ्या चंदनाप्रमाणे ते स्वत: झिजले आणि खचखळग्यातून चालणाऱ्या राष्ट्रीय समाजाला सुगंध देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आज राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांसारखा सूर्य प्रकाशा इतका स्वच्छ, आत्मसन्मान जागृत असणारा, स्वाभिमानी, सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन राजकारणाची दिशा बदलण्याची धमक असलेला नेता राष्ट्रीय समाजाला दिला. होऊ घातलेल्या २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत महादेवजी जानकर साहेब आणि राष्ट्रीय समाज पक्ष संसदेत पोहचवण्याचा संकल्प करून स्व. जगन्नाथ मारुती जानकर (आबा) यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली...!
- शेफर्ड ए. पी, मुंबई.
माता पिता से जन्म जीवन
पुत्र महादेव का
समाज और देश के लीये स्वबलिदान
महादेव जानकर
राष्ट्रीय समाज पार्टी के
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
अपनी खुद राजनैतिक पार्टी बनाकार
17 राज्य मे ले जाने वाले
केवल एक ही एक
महादेव जानकर ☝🏾
उनके पिता
कै. जगन्नाथ जानकर☝🏾
विनम्र अभिवादन 💐🙏👏🏿
- एस एल अक्कीसागर, बेळगांव
No comments:
Post a Comment