रासप राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचा परभणी लोकसभा दौरा
जिंतुर : (७,८-१२-२३) प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर, ओमप्रकाश चीतळकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघात दौरा केला. दौऱ्यात पाथरी विधानसभा कार्यकर्ता बैठक, जिंतूर विधानसभा कार्यकर्ता बैठक, जिंतूर शहर कार्यकर्ता बैठक, परभणी विधानसभा कार्यकर्ता बैठक, सेलू कार्यकर्ता बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेऊन काही ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्त्या केल्या.
यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानोबा ताटे, परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाणे, पाथरी तालुका अध्यक्ष हिंगे, पाथरी तालुका युवक अध्यक्ष गोपाळ नरवटे, तालुका उपाध्यक्ष अकबर, तालुका संपर्क प्रमुख गोपाळ आव्हाड , तालुका युवक उपाध्यक्ष आव्हाड, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष तोफिक अन्सारी, पाथरी शहर अध्यक्ष अशोक पितळे, सोगे, लक्ष्मण लव्हाळे व अन्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment