Tuesday, December 5, 2023

बुध्दीचा महासागर : सिद्धप्पा अक्कीसागर

बुध्दीचा महासागर : सिद्धप्पा अक्कीसागर

🌷🎂🌷

आज ५ डिसेंबर अक्कीसागर साहेब यांना ६७ वा वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना यशवंत नायक परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! यापूर्वी त्यांना शुभेच्छ्या देत असताना 'ओबिसी चळवळीचे दिशादर्शक',  'मला समजलेले अक्कीसागर साहेब' असे लिखाण केले आहे. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे, पण यापूर्वीचे लिखाणाचे मथळे (Title) मला व्यक्तिशः चुकीचे वाटतात. कारण ते केवळ ओबीसी चळवळीचे दिशादर्शक नसून 'राष्ट्रीय समाजाचे दिशादर्शक', मार्गदर्शक आहेत. मला समजायला ते तितकस सोपे नाहीत. त्यांचे खूप मोठे काम, कष्ट आहे. 

भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील झाला. स्वातंत्र्योत्तर भारतात कित्येक समाजाची उपेक्षा झाली, आजही ती चालू आहे. सगळीकडे आक्रोश सुरू आहे. पण देशभरात जो आक्रोश सुरू आहे तो अक्कीसागर साहेब यांना मान्य नाही. तो आक्रोश लहानाचे मोठे होत असताना त्यांनी बघितला. ते पाहत थांबले नाहीत. त्यांना अगदी योग्य वेळी नोकरी, पुढे लग्न सर्व काही  मिळाले. पण त्यांचे मन मात्र अस्वस्थ होत. कारण त्यांनी राष्ट्रिय समाजाची होत असलेली अवहेलना पाहून, आक्रोशाला उत्तर म्हणून 'आपला पक्ष, आपला नेता हे स्वप्न पाहिले. पुढे काही काळातच राष्ट्रीय समाज पक्ष आणि नेता महादेव जानकर साहेब यांच्या रूपाने ते साध्य झाले.

जिथे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला व विद्येच्या जोरावर या देशातील विषम व्यवस्थेवर, कार्यातून लेखणीतून वाभाडे काढले. महात्मा फुले कर्मभूमीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. महात्मा फुले यांनी तमाम भातीयांना ज्ञानाअमृत दिले. पण आमचा राष्ट्रीय समाज अमृतकुंभातील अमृतज्ञान घ्यायचे सोडून कुंभाची माती चाळत बसला, हे राष्ट्रिय समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल. कन्नड भाषिक मातृ पितृ असलेल्या अक्कीसागर साहेब यांचे संत तुकाराम महाराज यांच्या सारखी मराठी भाषेवर कमांड आहे. त्यांनी यशवंत नायकच्या माध्यमातून मराठीत अनेक शब्दांची भर घातली आहे, हे मला यशवंत नायकचा वाचक म्हणून आवर्जून नमूद करावे लागेल.

जन स्वराज यात्रे दरम्यान यशवंत नायकशी बोलताना अक्कीसागर साहेब म्हणाले होते, नेल्सन मंडेला म्हणतात, दान दिल्याने गरिबी हटत नाही, तर न्यायामुळे गरिबी हटते.  तर महादेव जानकर म्हणतात, सत्तेमुळे न्याय मिळतो. न्याय पाहिजे असेल तर  सत्ता पाहिजे. "सत्तेविना सकळ कळा ! झाल्या अवकळा" !! या शब्दांत महात्मा फुलेनीं राष्ट्रिय समाजाला सावध केले असल्याचे अक्कीसागर साहेब सांगतात. 'फुलेवाद' या लेखाद्वारे महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल लीहताना 'राष्ट्रिय समाज पक्ष' हाच लोकशाही भारतातील फुलेवादावर चालणारा एकमेव राजकीय पक्ष आहे, असे अक्कीसागर साहेब ठामपणे सांगतात.

भारतात दिली जाणारी विद्या ही सत्याच्या उलट शिकवली जाते. संस्कृत ही कुत्रिम (artificial) भाषा आहे, पण संस्कृत ही पाकृत भाषा असल्याचे सांगून खोटी विद्या दिली जात असल्याकडे अक्कीसागर साहेब लक्ष वेधतात. शाळेत शिकत असताना माझा नेता म्हणून निबंध लिहायला सांगतात. नेता ही शिक्षकच सांगतात, मला शिक्षकांनी सांगितलेले ते माझे नेते नव्हते. पण आज माझा नेता महादेव जानकर आहेत, हे सांगताना गर्व होतो. अभिमान वाटतो, आनंद होतो अशा प्रकारचे उदगार अक्कीसागर साहेब काढतात.

आजवर त्यांच्यासोबत अनेकवेळा प्रवास करण्याचे भाग्य मिळाले. नुकतेच २७ नोव्हेंबरला अक्कीसागर साहेबांना मौर्य क्रांती महासंघाचा सत्यशोधक समाज प्रवाहक पुरस्कार प्रदान करून जीवन गौरव करण्यात आला, त्या क्षणाचा साक्षीदार होता आले. त्यांचा सन्मान होणार होता, पण त्यांचे सर्व लक्ष हे आपला नेता महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष, मिशन लोकसभा याकडे होते. तब्येत ठीक नसतानाही त्यांनी जेजुरी गडावर पोहचून महानायक खंडोबा पावन भूमीत राष्ट्रीय समाज पक्षाचा संसदेत प्रवेश व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली, पुढे त्यांनी विश्वासू शिलेदारांना सोबत घेऊन बारामती लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन माझ्या नेत्याला ताकद, बळ दिले याबद्दल आभार मानले. 

अक्कीसागर साहेब आंदोलनबाबत सांगतात, राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वात मोठे आंदोलन हे लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आहे. रिझर्व्ह बँकेत नोकरीस असताना, राष्ट्रीय समाज पक्षाचे कामाबद्दल त्यांना एकदा आरएसएसच्या व्यक्तीने तुम्ही चांगली समाजसेवा करता, याबद्दल उपरोधाने कौतुक केले, पण अक्कीसागर साहेब यांनी आपण समाजसेवक नसून स्वयंसेवक असल्याचे सांगत त्यास बुचकळ्यात पाडले. (ग्यानबाची मेख). 

 ज्ञान सत्ता ही सगळ्यात मोठी सत्ता आहे. ब्रम्ह आणि भ्रम यातला फरक ओळखता आला पाहिजे. ज्याची चर्चा होत नाही, किंबहुना तसा कुणी विचारही करत नाही. अक्कीसागर यांच्या जवळ ज्ञानाचा सागर आहे. अक्कीसागर साहेब ही केवळ व्यक्ती नसून बुद्धीचा महासागर आहे. त्यांच्या भेटीतून, बोलण्यातून काहीना काही तरी नवे ज्ञान मिळत असते. राष्ट्रिय समाजावर जीवापाड प्रेम करणारे श्री. सिध्दप्पा अक्कीसागर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य लाभो, आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष, महादेव जानकर साहेब यांच्या विजयाची गाथा लिहण्याची संधी मिळावी, हीच सदिच्छा व्यक्त करतो..

- चंद्रगुप्त मौर्याच्या सैन्यातील सेनापती

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025