रासपच्या महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी सुदामशेठ जरग
कळंबोली : (२२/१२/२०२३) यशवंत नायक खास प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी कळंबोली नवी मुंबई येथील सुदामशेठ जरग यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी समाज माध्यमात प्रसिद्धीस दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे कळंबोली, सातारा,सांगली, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील रासप पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे. श्री. जरग हे कलर कार्यकर्ते नसून राष्ट्रीय समाज पक्षाचे पीलर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
श्री. जरग हे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांचे विश्वासू शिलेदार आहेत. पक्ष स्थापनेपासून त्यांनी पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. २००४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत श्री. जरग यांच्या मार्गदर्शनात पनवेल विधानसभा मतदासंघात रासपच्या उमेदवाराने लक्षणीय मते मिळवली होती. श्री. जरग यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी केली आहे. पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होऊन पक्षाची शान वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आपला पक्ष व आपला नेता या त्यांच्या निष्ठेमुळे पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. सुदामशेठ जरग यांची निवड योग्य आणि सार्थ असल्याची प्रतिक्रिया यशवंत नायक कार्यकारी संपादक यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment