Monday, December 18, 2023

ओबीसींनी सत्ताधारी व्हायचा विचार करावा ; हिंगोलीत महादेव जानकर गरजले

ओबीसींनी सत्ताधारी व्हायचा विचार करावा ; हिंगोलीत महादेव जानकर गरजले

हिंगोली (२६/११/२०२३) : उत्तर प्रदेशात राज्य कुणाचं आलं. बिहारमध्ये कुणाचं आलं, तामिळनाडूत कुणाचं आलं याचा विचार ओबीसींनी केला पाहिजे. भुजबळ साहेब तुम्ही आमचे नेते आहात. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर इकडे मुख्यमंत्री म्हणून आला असता, असं विधान रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलं आहे. हिंगोलीत ओबीसी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महादेव जानकर यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. तसेच आपली स्वत:ची राजकीय मोट बांधण्याचं आवाहनही केलं. ओबिसीनो, सत्ताधारी व्हायचा विचार करावा.

भूतकाळात आमच्या काही चुका झाल्या आहेत. आता कुणाला शिव्या देण्यात वेळ घालवू नका. आता सत्ताधारी झालं पाहिजे. आपल्याला महात्मा फुले यांचा वारसा आहे. अमेरिकेत गेलो होतो. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बघून तासभर थांबलो होतो, असं सांगतानाच आम्ही 100 मध्ये 85 असू तर छोट्या लोकांना तिकीट का मागायचं? आपण मागणारे नाही. तर देणारे झालो पाहिजे, असं आवाहन महादेव जानकर यांनी केलं आहे.

आमदार, खासदारच व्हा

आपण कोणत्या धर्मावर जातीवर टीका करू नये. यापुढे सत्ताधारी व्हायचा विचार करा. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा नगरसेवक होण्यापेक्षा फक्त आमदार आणि खासदारच होईल याचा विचार केला पाहिजे. मी छोटा माणूस आहे. माझ्या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली. मी चार आमदार निवडून आणले. 93 जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात चर्मकार समाजाच्या बहेनजी मायावती यांना मुख्यमंत्री बनवले. तेव्हा सर्व उच्च पदस्थ अधिकारी दलीत समाजाचेच झाले. तेव्हा आपणही राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. भुजबळ  साहेब पुढच्या वेळेस दलित आणि मुस्लीम यांना देखील सोबत घ्या, असं जानकर यांनी म्हटलं. आज आमचं काय म्हणणं? महाराष्ट्र कुणाला तिकीट मागत आहोत? भुजबळ साहेब कंमाडर बना, असं जानकर म्हणाले.

हडपसरला हाड पाडणाऱ्या यशवंतराव होळकरचेच आम्ही वारसदार आहोत. तुम्ही जर आम्हाला चॅलेंज देत असाल तर आम्ही तुम्हाला चॅलेंज देऊ. ज्याला आमच्याबरोबर यायचं असेल तर या. आमची सर्वाना सोबत घेऊन जाण्याची भुमिका आहे. ओबिसिनोसमाजकारण बाजूला ठेवा आणि राजकारणी व्हा. भुजबळांसाहेब आम्ही तुमच्या बरोबर युती करणार. आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही, असे महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. कुणावरही अँक्शनला रिअक्शन देऊन उपयोग नाही. आम्हाला बुध्दीने राजकारण करावं लागेल. आपणास समता युग आणावं लागणार आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, नाना पटोले, जयदत्त क्षीरसागर, बबनराव तायवाडे, विजय चौगुले, प्रा. टी. पी. मुंडे, शब्बीर अहमद अन्सारी, सुनील महाराज, लक्ष्मणराव गायकवाड, मच्छिद्र भोसले, चंद्रकांत बावकर, कल्याण दळे, राजेश राठोड यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...