आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रवीर आहेत : महादेव जानकर
'राष्ट्रीय समाज पक्ष'तर्फे १५ वा राज्यभिषेक वर्षिकोत्सव उत्सहात पार
नंदगड : यशवंत नायक ब्यूरो
आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा हे केवळ कर्नाटकचे पुत्र नसून भारताचे राष्ट्रपुत्र आहेत. संगोळी रायण्णा फक्त कुरबा समाजापुरते मर्यादित नसून ते ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम हिंदू आधी सर्व जातीधर्मियांसाठी लढणारे महान योद्धे होते. त्यांनी सामान्य प्रजेच्या न्याय हक्कासाठी ब्रिटिशाविरुद्ध युद्ध छेडले. सामान्य लोकांतून सैन्य उभारत ब्रिटिशाविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. संगोळी रायन्ना कर्नाटकचे कन्नडवीर नसून भारताचे राष्ट्रवीर आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले.
श्री. जानकर नंदगड ता- खानापूर जिल्हा बेळगाव येथे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा राज्याभिषेक व वार्षिकोत्सव कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय एम्प्लॉज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख रामकुमार पाल, रामदुर्ग येथील स्वामी, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, क्रांतिवीर संगोळी रायण्णा स्मारक समितीचे अध्यक्ष शंकर सोनोळी, पत्रकार सुरेश दलाल आदी मान्यवर उपस्थित होते.
संगोळी रायन्ना पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुतळ्यासमोर ध्वजारोहन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना महादेव जानकर पुढे म्हणाले, सर्वप्रथम सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा. पंधरा वर्षांपूर्वी येथून राज्याभिषेकाला सुरुवात केली. संगोळी रायण्णा यांच्या नावे मिलिटरी स्कूल व्हावे, अशी कर्नाटक राज्य शासनास सूचित करतो. या भूमीला माता राणी चेनम्मा व त्यांचे सरसेनापती आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे. नंदगड येथे 26 जानेवारीला देशाचे प्रधानमंत्री आले पाहिजेत. पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करत श्री. जानकर म्हणाले, महाराष्ट्र - कर्नाटक यांच्यात झगडा लावला जातो, मात्र राष्ट्रीय समाज पक्ष मराठी- कन्नड भाषिकांना जोडण्याचे काम करत आहे. संगोळी रायन्ना यांचा स्मृतीदिवस कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ राज्यात रासपतर्फे केला जात आहे. नंदगड येथे येण्यापूर्वी रासपचे आमदार शून्य होते. संगोळी रायण्णा यांच्या आशीर्वादाने रासपचे चार आमदार झाले.
दरम्यान संगोळी रायन्ना समाधीस्थळी महादेव जानकर यांच्याहस्ते व विविध जातीधर्मातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याभिषेक करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराम शुरणर, रासपचे महाराष्ट्र प्रदेश काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर, उत्तर कर्नाटक प्रदेश प्रभारी सुनील बंडगर, विजयपुर जिल्हाध्यक्ष रविचंद्रन डोंबाळे, बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी, गुुलबर्गा देवानानद कोळी, पुणे जिल्हाध्यक्ष, वीनायक रुपनवर, बेळगांव प्रभारी प्रकाश मुुधोल, अंकुश देवडकर, अजित पाटील, शरद दडस आदी मान्यवर उपस्थित होते. नंदगड येथे पोहचन्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आदी लोक कित्तुर, संगोळी आदी परिसरात भेट देऊन २५ जानेवारीच्या सायंकाळी नंदगड येथे पोहचले.
|प्रा. आबासो पुकळे, मुंबई.
No comments:
Post a Comment